माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वेव्हस युवा चित्रपटनिर्मात्यांसाठी आव्हान


भावी पिढीतील सर्जनशीलतेला पुढच्या स्तरावर नेणे

Posted On: 12 FEB 2025 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025


परिचय

माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे आयोजित केलेले, वेव्हस यंग फिल्ममेकर्स चॅलेंज अर्थात वेव्हस युवा चित्रपटनिर्मात्यांसाठी आव्हान,12 ते 19 वर्षे वयोगटातील नवोदित कथाकारांना चित्रपट निर्मितीच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. याची रचना सर्जनशीलतेला चालना देणे, डिजिटल साक्षरता वाढवणे आणि कथाकथनाची कौशल्ये वाढवण्याच्या हेतूने केली असून याअंतर्गत युवा चित्रपट निर्मात्यांना 60-सेकंदांचे आकर्षक चित्रपट तयार करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (WAVES) चा एक महत्त्वाचा भाग म्हणून, हे आव्हान लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीचा शोध घेण्यास आणि लघु कथाकथनाद्वारे त्यांचा दृष्टिकोन सामायिक करण्यास प्रोत्साहित करते.

मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स, येथे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत आयोजित वेव्हस हे माध्यम आणि मनोरंजन उद्योगात चर्चा, सहकार्य आणि नवोन्मेषाला चालना देणारे एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करेल. हा कार्यक्रम नवीन संधी शोधण्यासाठी, आव्हाने सोडवण्यासाठी आणि भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या वृद्धीसाठी उद्योजक, हितधारक आणि नवोदितांना एकत्र आणेल.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा प्रमुख उपक्रम, क्रिएट इन इंडिया चॅलेंज हा वेव्हजचा मुख्य उद्देश आहे. 70,000 हून अधिक स्पर्धकांनी यासाठी नोंदणी केली असून 31 आव्हानांसह, या उपक्रमाने जगभरातील सर्जनशील विचारवंतांना आकर्षित केले आहे. नवोन्मेषाला अनुकूल परिसंस्था विकसित करून भारताला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील जागतिक केंद्र म्हणून उदयाला आणण्याचा या आव्हानाचा उद्देश आहे.

मुख्य उद्देश्य

·सर्जनशीलतेला प्रेरणा देणे :  

·कथाकथनाला प्रोत्साहन देणे:  

·आत्मविश्वास निर्माण करणे:

·विविधता साजरी करणे :  

निर्णयाचे निकष

·सर्जनशीलता

·प्रेक्षकांशी जोडले जाण्याची क्षमता

·संदेशाची स्पष्टता

·एकूण प्रभाव

·ज्युरी

नोंदणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे

स्पर्धा श्रेणी

कनिष्ठ गट 12 ते 15 वर्षे

वरिष्ठ गट 16 ते 19 वर्षे

संकल्पना : सहभागी तंत्रज्ञान आणि मानवता किंवा त्यातील भिन्नता या संकल्पनेवर आधारित आशय तयार करू शकतात.

भाषा : चित्रपट कोणत्याही भाषेत तयार केला जाऊ शकतो.

प्रवेश : प्रत्येक सहभागी किंवा संघ (चार सदस्यांपर्यंत) तीन कलाकृती सादर करू शकतात.

कालावधी : चित्रपट क्रेडिट्ससह 60 सेकंदांपेक्षा जास्त कालावधीचे नसावेत.

तंत्रज्ञान : स्मार्ट फोन किंवा कॅमेरा यांसारख्या कोणत्याही उपकरणाचा वापर करून चित्रपटाचे चित्रीकरण केले जाऊ शकते.

सादर करण्याची पद्धत : चित्रपटांच्या फाईलसह सार्वजनिकरित्या अ‍ॅक्सेसेबल लिंक (यु ट्यूब , गुगल ड्राइव्ह इ.), एक संक्षिप्त सारांश (50-100 शब्द) आणि सहभागी सदस्यांचा तपशील सादर करावा.

कार्यक्रमाची रूपरेषा

· सप्टेंबर 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालेल.

· पहिल्या फेरीत चित्रपट निर्मिती, सर्जनशीलता आणि सांघिक कार्य यावर भर दिला जातो.

· मुंबईतील व्हिस्लिंग वुड्स इंटरनॅशनल, येथे 7 आणि 8 मार्च 2025 रोजी चित्रपट निर्माते अमोल गुप्ते यांच्यासोबत दोन दिवसीय कार्यशाळेत प्रत्येक श्रेणीतील अव्वल 10 जण सहभागी होतील.

·निवडलेले संघ त्यांचे चित्रपट पुन्हा चित्रित करू शकतात आणि 15 एप्रिल 2025 पर्यंत अंतिम आवृत्ती सादर करू शकतात.

पुरस्कार आणि मान्यता

·निवडलेले चित्रपट एका समर्पित वेव्हज सत्रात प्रदर्शित केले जातील, जिथे विजेत्यांची घोषणा केली जाईल.

·प्रत्येक वयोगटातील विजेत्यांना वेव्हजमध्ये सहभागी होण्यासाठी मोफत प्रवास आणि निवास सुविधा मिळेल.

· विजेत्यांना ओळख, मार्गदर्शन, शिष्यवृत्तीच्या संधी, ऑनलाइन फिल्म मेकिंग कोर्सेसमध्ये प्रवेश आणि कामगिरीचे प्रमाणपत्र दिले जाईल.

· युवा  चित्रपट निर्माते म्हणून त्यांच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी  सर्व सहभागींना अभिप्राय दिला जाईल.

संदर्भ:

 ·  https://wavesindia.org/challenges-2025

·   https://whistlingwoods.co.in/WAVES/


Click here to see PDF:

 

N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2102535) Visitor Counter : 38