प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
azadi ka amrit mahotsav

प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार


फ्रान्समधील पॅरिस येथे आर्टफिशियल इंटलीजन्स अ‍ॅक्शन समिट 2025 समवेत दुसरी भारत-फ्रान्स एआय पॉलिसी गोलमेज परिषद आयोजित

Posted On: 11 FEB 2025 12:27AM by PIB Mumbai

भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार (PSA) कार्यालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगळुरू, इंडिया एआय मिशन अँड सायन्सेस पो पॅरिस यांच्या भागीदारीत 10  फेब्रुवारी 2025 रोजी सायन्सेस पो पॅरिस विद्यापीठाच्या परिसरात दुसरी भारत-फ्रान्स एआय पॉलिसी गोलमेज परिषद' हा एआय अॅक्शन समिट 2025  समवेत एक अधिकृत कार्यक्रम आयोजित केला होता.

गोलमेज चर्चेची सुरुवात पीएसए प्राध्यापक अजय कुमार सूद यांच्या उद्घाटनपर  भाषणाने झाली. यावेळी  त्यांनी जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणि प्रशासन यासंदर्भात  भारताच्या प्राधान्यांवर प्रकाश टाकला. यामध्ये एआयचा जबाबदारीपूर्ण  विकास आणि  वापर , समान लाभ वाटप, एआय प्रशासनासाठी तांत्रिक-कायदेशीर चौकटीचा अवलंब, इंटरऑपरेबल डेटा फ्लो आणि एआय सुरक्षा, संशोधन आणि नवोपक्रम यावरील सहकार्य यांचा समावेश आहे.

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सायबर डिप्लोमसी/मुत्सद्देगिरी  विभागाचे संयुक्त सचिव अमित ए शुक्ला आणि फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या डिजिटल व्यवहार विभागाचे राजदूत हेन्री व्हर्डियर या सह-अध्यक्षांनी काही प्राधान्य क्षेत्र यावर प्रकाश टाकणाऱ्या  टिप्पणी केल्या:

(अ) एआयसाठी डीपीआय; (ब) एआय फाउंडेशन मॉडेल्स; (क) जागतिक एआय प्रशासन आणि (ड) जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एआयचे एकात्मीकरण.

सह-अध्यक्षांच्या भाषणानंतर, अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली यात डॉ. प्रीती बंजल (सल्लागार/शास्त्रज्ञ जी श्रेणी , प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार);  कविता भाटिया (वैज्ञानिक 'जी' श्रेणी  आणि गट समन्वयक, एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि भाषिणी, एमईआयटीवाय, भारत सरकार);   क्लेमेंट बाच्ची (इंटरनॅशनल डिजिटल पॉलिसी लीड, डायरेक्टरेट जनरल ऑफ एंटरप्राइजेस, अर्थव्यवस्था आणि वित्त मंत्रालय);  हेलेन कोस्टा (प्रकल्प संचालक, फ्रेंच पर्यावरणीय संक्रमण मंत्रालय);   अभिषेक अग्रवाल (वैज्ञानिक 'डी'श्रेणी , एआय आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजीज ग्रुप, एमईआयटीवाय, भारत सरकार); शरद शर्मा (सह-संस्थापक, iSPIRT फाउंडेशन); फ्रान्सिस रौसो (AI, iSPIRT फाउंडेशनवरील आंतरराष्ट्रीय तांत्रिक तज्ञ); डॉ. सरयू नटराजन (संस्थापक, आप्ती संस्था);   चारबेल-राफेल सेगेरी (कार्यकारी संचालक, केंद्र pour la Sécurité de l'IA);   सौरभ सिंग (डिजिटल आणि एआय पॉलिसी प्रमुख, एडब्ल्यूएस इंडिया आणि दक्षिण आशिया); अलेक्झांड्रे मारियानी (आंतरराष्ट्रीय व्यवहार व्यवस्थापक, सायन्सेस पो पॅरिस);   कपिल वासवानी (मुख्य संशोधक, मायक्रोसॉफ्ट रिसर्च);   सुनू इंजिनियर (उद्योजक, सह-संस्थापक, ट्रान्सफॉर्मिंग. लीगल);आणि विवेक राघवन (सहसंस्थापक, सर्वम ए.आय.) यांचा समावेश होता.

या चर्चेत तंत्रज्ञान-कायदेशीर चौकटींचे महत्त्व ओळखून कृत्रिम बुद्धिमत्ता संसाधनांपर्यंत लोकशाहीकृत प्रवेश आणि क्षमता निर्माण करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. सहभागींनी सार्वभौम एआय मॉडेल्सचे महत्त्व, कृत्रिम बुद्धिमत्तेचा  नैतिक वापर आणि जागतिक स्तरावर स्वीकृत शब्प्रयोग  आणि मानके परिभाषित करण्याची गरज यावर प्रकाश टाकला. वक्त्यांनी बहुभाषिक एलएलएम, संघटित एआय कंप्यूट इन्फ्रास्ट्रक्चर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन, डेटासेट आणि उच्च-कार्यक्षमता असलेल्या संगणकीय संसाधनांमध्ये इंटरऑपरेबल प्रवेश अॅक्सेस या बद्दल देखील विचार व्यक्त केले. या संभाषणात एआयचा सामाजिक प्रभाव, डेटा प्रशासन आणि एआय सुरक्षा चौकटींना आकार देण्यात जागतिक संस्थांची भूमिका यावरही चर्चा झाली.

25 जानेवारी 2025 रोजी ‘तंत्रज्ञान संवाद 2025’  दरम्यान आयआयएससी, बेंगळुरू येथे आयोजित पहिल्या गोलमेज परिषदेतील प्रमुख उद्दिष्टांवर आधारित ही दुसरी गोलमेज परिषद होती. पहिल्या गोलमेज चर्चेत समावेशक एआय फ्रेमवर्क, विविध डेटासेट, पायाभूत सुविधा आणि कौशल्ये आणि पायाभूत मॉडेल्सवर लक्ष केंद्रित केले गेले. अधिक माहितीसाठी, https://technologydialogue.in/ai-rt-feb.html ला भेट द्या.

***

JPS/HK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2101681) Visitor Counter : 50