माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वेव्हज 2025 मधील क्रिएट इन इंडिया चॅलेंज पर्व -1 मध्ये शिक्षण आणि गेमिंगचा मिलाफ


तुमच्या शहराबद्दल इत्यंभूत माहिती आहे ? मग सहभागी व्हा शहर प्रश्नमंजूषेत

Posted On: 10 FEB 2025 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025

 

जर तुम्हाला तुमच्या शहराच्या शाश्वत विकास ध्येयांवरील (एसडीजी) प्रगतीबद्दल सखोल माहिती असेल, तर राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्याची तुम्हाला संधी आहे. जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्ह्ज) 2025 ही त्यांच्या शहराचे शाश्वत प्रयत्न, आव्हाने आणि कामगिरी समजून घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक अनोखी संधी देते.

'सिटी क्वेस्ट: शेड्स ऑफ भारत', अर्थात भारताच्या रंगछटा ही शहर संबंधित प्रश्नमंजुषा म्हणजे एक नाविन्यपूर्ण शैक्षणिक खेळ आहे जो वेव्ह्ज 2025 अंतर्गत सुरू असलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंज (भारतातील निर्मिती आव्हान) चा एक प्रमुख घटक आहे. हा आकर्षक खेळ शाश्वत विकास ध्येयांच्या (SDGs) दृष्टिकोनातून शहरी विकासाच्या मापदंडाचे गेमिंग करून तरुणांना शिक्षित आणि प्रेरित करण्यासाठी आखण्यात आला  आहे. बालपणीच्या ट्रम्प कार्ड खेळाचा आनंद पुन्हा अनुभवत देशभरातील 56 शहरांची ताकद आणि आव्हाने यांचा धांडोळा यातून घेता येतो. 

यातील विजेत्यांचा सत्कार 1-4 मे 2025 दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्ह्ज 2025 मध्ये विजेत्यांचा सत्कार केला जाईल.

या खेळाविषयी

या शहर विषयक प्रश्नमंजुषेचा खेळ एकट्यानेच खेळायचा असून यात सिटी कार्ड्सच्या डेकचा वापर करून संगणक प्रतिस्पर्ध्याशी स्पर्धा करायची आहे. परस्परसंवादी खेळाद्वारे, ही स्पर्धा खेळाडूंना 56 भारतीय शहरांच्या विकासात्मक आव्हाने आणि कामगिरीबद्दल अवगत करते आणि शाश्वत पद्धतींच्या परिणामावर भर देते.

खेळाडू सिटी क्वेस्टद्वारे प्रत्येक शहराच्या वैशिष्ट्यांचा धांडोळा घेत असताना, त्यांना वैयक्तिक आणि सामूहिक कृती जागतिक स्तरावर भारताच्या एकूण शाश्वत कामगिरीवर कसा लक्षणीय परिणाम करू शकतात याबद्दल इत्यंभूत माहितीही मिळते.

   

ही शहर विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा सर्व वयोगटातील सर्व व्यक्तींच्या सहभागींसाठी खुली असून जुन्या कार्ड गेमची अनुभूती देत भारताच्या महत्वपूर्ण शहरांबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी प्रदान करते. 

  

 

सिटी क्वेस्ट: आयआयटी बॉम्बेच्या ई-समिट 2025 मध्ये  सर्जनशीलतेला चालना

‘सिटी क्वेस्ट: शेड्स ऑफ भारत’, हा शाश्वत विकास उद्दिष्टांवर 56 भारतीय शहरांची तुलना करणारा आयआयटी बॉम्बेच्या ई- सेलचा वार्षिक पथदर्शी कार्यक्रम गेल्या आठवड्यात, नुकत्याच संपलेल्या ई-समिट 2025 मध्ये प्रदर्शित करण्यात आला.

 आयआयटी बॉम्बेच्या ई-समिट 2025 मध्ये, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने सिटी क्वेस्टचे नेतृत्व करणाऱ्या ई गेमिंग फेडरेशन (ईजीएफ) ने गेमिंग, स्टार्टअप्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावरील प्रमुख चर्चांचे नेतृत्व केले.

आयआयटी बॉम्बे येथे संवादी कथाकथनाद्वारे एसडीजी सहभाग 

भारतीय शहरांबद्दल संवादी कथाकथनाद्वारे आणि एसडीजी जागतिक क्रमवारीत भारताच्या कामगिरीला लक्षणीयरीत्या चालना देण्यासाठी दैनंदिन कृतींद्वारे भारतीय नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व या उपक्रमाद्वारे सिटी क्वेस्टने विद्यार्थ्यांना एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव प्रदान केला.

विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या गावांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून सिटी क्वेस्ट ट्रम्प कार्ड्सद्वारे एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी रोमांचक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या. निवडक विजेत्यांना दिवसाच्या प्रत्येक तासाला सिटी क्वेस्ट डेकची विशेष आवृत्ती प्रदान करण्यात आली.

सिटी क्वेस्टचे ठळक मुद्दे: भारताच्या विविध छटा:

  • नवोन्मेषी गेमप्ले, तफावत  भरून काढणे.    

वेव्हज 2025

केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आगामी जागतिक ऑडिओ व्हिज्युअल मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज 2025) तारखा आणि ठिकाण जाहीर केले आहे. सर्जनशील उद्योगांमध्ये भारताला जागतिक नेतृत्व  म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी सज्ज असलेला हा ऐतिहासिक कार्यक्रम 1 मे 2025 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत आयोजित केला जाणार आहे.

हा गेम सध्या गुगल प्लेद्वारे अँड्रॉइड डिव्हाइसवर विनामूल्य उपलब्ध असून हा गेम देशभरातील खेळाडूंना महत्त्वपूर्ण सामाजिक मुद्द्यांबाबत बोलण्यासाठी एक सुलभ व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि सोबतच शहरी विकास तसेच सामूहिक आकलनात  योगदान देतो.

 

 

 

* * *

N.Chitale/Vasanti/Shraddha/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2101560) Visitor Counter : 13