अर्थ मंत्रालय
व्यापार दस्तऐवजीकरण आणि वित्तपुरवठा उपायांसाठी ‘भारतनेट’ हे आंतरराष्ट्रीय व्यापार एकसंध व्यासपीठ तयार केले जाईल: केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26
भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्यासाठी देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणार
उद्योग 4.0 संधीचा लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकार देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक उपकरण उद्योगाला पाठबळ देणार
उदयोन्मुख द्वितीय श्रेणी शहरांमध्ये जागतिक क्षमता केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांना राष्ट्रीय रचनात्मक चौकट देणार
Posted On:
01 FEB 2025 1:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2025
सर्व क्षेत्रांच्या समतोल विकासाला चालना देत ‘सब का विकास’ या तत्त्वाची जाणीव ठेवून आपली वाटचाल होत आहे. या प्रवासात निर्यातीची गणना भारताच्या यशोगाथेच्या शक्तिशाली इंजिनांपैकी एक अशी करता येईल.
संसदेत आज केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांनी 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. देशांतर्गत उत्पादन क्षेत्रात परिवर्तन करणाऱ्या सुधारणा करणे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला जागतिक पुरवठा साखळीशी जोडणे हे या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट आहे.
भारतट्रेडनेट
आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा- भारतट्रेडनेट’ (बीटीएन) या व्यासपीठाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. व्यापार दस्तऐवजीकरण आणि वित्तपुरवठा उपायांसाठीचे हे एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करेल. “भारतट्रेडनेट’ हे युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्मला पूरक असेल आणि आंतरराष्ट्रीय पद्धतींशी सुसंगत असेल.” असे अर्थमंत्री म्हणाल्या.
जागतिक पुरवठा साखळीशी भारताची अर्थव्यवस्था जोडणार
भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्यासाठी देशांतर्गत उत्पादन क्षमता विकसित करण्यासाठी मदत केली जाईल, त्यासाठी वस्तुनिष्ठ निकषांवर क्षेत्रे निश्चित केली जातील असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. निवडक उत्पादने आणि पुरवठा साखळींसाठी वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग प्रतिनिधींच्या सहभागासह सुविधा गट तयार करावेत असा प्रस्तावही आहे.
उद्योग 4.0 शी संबंधित संधींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली उच्च दर्जाची कौशल्ये आणि प्रतिभा भारतातील तरुणांकडे आहेत, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले. "केंद्र सरकार युवकांच्या कल्याणासाठी अशा संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक उपकरण उद्योगाला पाठिंबा देईल", अशी ग्वाही त्यांनी दिली.
जागतिक क्षमता केंद्रांसाठी राष्ट्रीय रचनात्मक चौकट
उदयोन्मुख द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये जागतिक क्षमता केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन म्हणून एक राष्ट्रीय रचनात्मक चौकट तयार केली जाईल. त्यात गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता वाढवणे, इमारत-उपनियम सुधारणा आणि उद्योगांच्या सहकार्यासाठी यंत्रणा असे 16 उपाय सुचवले जातील, असाही प्रस्ताव आहे.
For related information on Exports, Click here -https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2098447
* * *
JPS/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2098671)
Visitor Counter : 18