माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पहिल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेच्या आधी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे इन्फ़्लुएन्सर्स,पॉडकास्टर्स, अॅनिमेशन मेकर्स तसेच गेम डेव्हलपर्स इत्यादींसारख्या कार्यक्रम सर्जकांसाठी सर्वोच्च पुरस्कारांची घोषणा


केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते, वेव्हज बाजार या सर्जक आणि सर्जनशील सामग्रीविषयक व्यवहार करणाऱ्या कंपन्या यांना एकत्र आणण्यासाठी सुरु करण्यात येणाऱ्या ई-मार्केटप्लेसचे उद्घाटन

शास्त्रीय आणि उप-शास्त्रीय संगीतविषयक आव्हान ‘वाह उस्ताद’ तसेच खादीची जाहिरात यांचा वेव्हज तर्फे सुरु करण्यात आलेल्या तीन क्रिएट इन इंडिया आव्हानांमध्ये समावेश; पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा प्रोत्साहक कार्यक्रम आव्हानाची देखील घोषणा

वेव्हज भारताला कंटेट निर्मिती क्षेत्रातील जागतिक राजधानी म्हणून स्थापित करेल; विवेकानंदांच्या वारशाचे दर्शन घडवत भारताचा सांस्कृतिक वारसा जागतिक स्तरावर उंचावेल: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

कलाप्रेमींसाठी वेव्हज हा एक महत्त्वाचा मंच असून तो आपल्या समृध्द सांस्कृतिक वारशाचे जगासमोर कथन करण्यासाठी भारतीय सर्जकांना प्रेरित करेल: केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत

Posted On: 27 JAN 2025 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जानेवारी 2025

 

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेच्या (वेव्हज) आयोजनात पुढाकार घेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज महत्त्वाचा टप्पा गाठला. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय माध्यम केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते काही प्रमुख उपक्रमांची सुरुवात करण्यात आली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू, केंद्रीय संस्कृती सचिव अरुणीश चावला, भारतीय चित्रपट निर्माते शेखर कपूर तसेच प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी देखील यावेळी उपस्थित होते.

भारताचे सर्जक अर्थव्यवस्थेची जागतिक राजधानी म्हणून रुपांतर

दावोस आर्थिक मंचाप्रमाणेच जागतिक दृकश्राव्य परिषदेला (वेव्हज) जागतिक प्रतिष्ठेचा मंच म्हणून प्रस्थापित करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले की हा उपक्रम म्हणजे भारताच्या सर्जक अर्थव्यवस्थेला ठळकपणे मांडण्याच्या विस्तृत धोरणाचा भाग असून  ऑरेंज इकॉनोमी म्हणून जागतिक  स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या परंपरा, कथाकथन आणि सांस्कृतिक महत्त्व या घटकांच्या बाबतीत समृध्द आहे. 

“स्वामी विवेकानंदांच्या माध्यमातून शिकागोच्या जागतिक मेळाव्याच्या सभागृहात एकेकाळी दुमदुमलेली आपली समृद्ध संस्कृती आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे योग, संस्कृती, सर्जनशीलता आणि आयुर्वेद यांच्यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक मंचावर पुढे नेण्यात येत आहे,” केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. “वेव्हज हा याच प्रयत्नांचा विस्तार असून भारताला कार्यक्रम निर्मिती क्षेत्रातील जागतिक राजधानी म्हणून स्थापित करणे हा त्याचा उद्देश आहे,” ते पुढे म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी वेव्हज बाजार, 3 क्रिएट इन इंडिया आव्हाने, वेव्हज पारितोषिके यांची सुरुवात केली तसेच आणखी एका आव्हानाची घोषणा देखील केली.

वेव्हज बाजार: सर्जक अर्थव्यवस्थेच्या क्षमतांचा वापर

या कार्यक्रमात भारतातील प्रचंड सर्जनशील प्रतिभेच्या साठ्याला आंतरराष्ट्रीय बाजारांशी जोडण्यासाठी निर्माण केलेल्या वेव्हज बाजार या जागतिक ई-मार्केटप्लेस या पथदर्शी मंचाचे उद्घाटन झाले. हा मंच वापरकर्त्यांना त्यांची सामग्री सादर करण्यासाठी, प्रकल्प सुरु करण्यासाठी, तसेच भौगोलिक सीमारेषांच्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण संबंध जोडण्यासाठी सक्षम करेल. तयार साधने आणि संसाधने देऊ करून हा मंच जागतिक व्यापार व्यवहार सोपे करेल  आणि यातून सर्जक तसेच व्यापारी यांना वाढ आणि यशासाठी नव्या संधींचा शोध घेतानाच स्वतःची पोहोच विस्तारता येईल.

या प्रसंगी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी सांगितले की वेव्हज बाजार हा परिवर्तनकारी मंच असून तो निर्माते, खरेदीदार तसेच चित्रपट, संगीत, ईक्रीडा, अॅनिमेशन, दृश्य परिणाम, गेमिंग आणि हास्यकथा यांसारख्या विविध मनोरंजनात्मक क्षेत्रांमध्ये सहयोग करण्यात उपयुक्त ठरेल. सर्जकांना त्यांची कलाकृती सादर करताना जाणवणारी भौगोलिक दरी हा मंच भरून काढेल आणि अर्थपूर्ण बीटूबी म्हणजेच दोन व्यापारी घटकांमधील संवाद वाढवेल.

वेव्हज बाजार ब्रँड सहयोग, निधी आणि वितरण यासाठी पाठबळ देईल आणि सर्जकांना त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी लागणारे पाठबळ पुरवण्यात मदत करेल. ही सर्वसमावेशक ई-मार्केटप्लेस भारतातील नवोदित सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या क्षमतेचा वापर करून घेण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरेल. हा मंच सर्जकांना त्यांची उत्पादने, संकल्पना तसेच कौशल्ये यांचे विपणन करण्याची क्षमता प्राप्त करून देईल.

वेव्हज पुरस्कार

वेव्हज पुरस्काराना 15 फेब्रुवारी, 2025 रोजी नामांकनांसह प्रारंभ  होणार आहे. विविध सर्जनशील विषयांमधील उत्कृष्टता साजरी करणाऱ्या व्हेव्ह्ज पुरस्कारांमध्ये गेम ऑफ द इयर, फिल्म ऑफ द इयर आणि ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन ऑफ द इयर यांसारख्या  श्रेणी आहेत. तसेच पुरस्कारांमध्ये विशेष निवड पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार  आणि तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रभावासारख्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रभावांचाही समावेश आहे.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत तीन नवीन आव्हाने

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत तीन नवीन आव्हानांचा प्रारंभ , उदा. " रेसोनेट: द ईडीएम चॅलेंज", "मेक द वर्ल्ड वेअर खादी" आणि "वाह उस्ताद".

1. वाह उस्ताद

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची कल्पना तसेच सांस्कृतिक मंत्रालय आणि दूरदर्शनच्या सहकार्याने प्रतिष्ठित "दिल्ली घराणा" द्वारे संचालित, "वाह उस्ताद" हे आव्हान युवा, शास्त्रीय शिक्षण घेतलेल्या  गायकांना त्यांचे असाधारण  कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो. हे आव्हान आंतरराष्ट्रीय सहभागींसह  18 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील सहभागींसाठी खुले आहे. ही दोन-टप्प्यांमधील  स्पर्धा असून वेव्हज  2025 मधील महा राष्ट्रीय अंतिम फेरीत त्याची सांगता होणार असून यासाठीची नोंदणी आज प्रसार भारतीच्या (https://prasarbharati.gov.in/wah-ustad/) संकेतस्थळावर सुरु करण्यात आली  आहे.

2. "मेक द वर्ल्ड वेअर खादी"

हे आव्हान जाहिरात व्यावसायिक आणि फ्रीलान्सर्सना खादीला जागतिक ब्रँड म्हणून प्रस्थापित करणाऱ्या अभिनव मोहिमा विकसित करण्यासाठी आमंत्रित करते. आंतरराष्ट्रीय सहभागासाठी हे आव्हान खुले असून याचा उद्देश खादीचा भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करणे हा आहे. सहभागींना विविध स्वरूपांमध्ये (उदा., डिजिटल, प्रिंट, व्हिडिओ, अनुभवात्मक) नाविन्यपूर्ण डिझाइन संकल्पना शोधायच्या आहेत. खादीची ब्रँड प्रतिमा उंचावण्यासाठी आणि ग्राहकांच्या सहभागाला चालना देण्यासाठी   "मेक द वर्ल्ड वेअर खादी" हे आव्हान सर्जनशील विचार आणि धोरणात्मक दृष्टिकोनांना प्रोत्साहन देते.

3. रेसोनेट: द ईडीएम  चॅलेंज: इंडियन म्युझिक असोसिएशन द्वारे आयोजित  रेझोनेट हे आव्हान  जगभरातील कलाकार, गीतकार , संगीतकार आणि कलाकारांना इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (ईडीएम ) निर्मितीमध्ये त्यांची असाधारण प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करते. हे आव्हान सर्व देशांसाठी खुले आहे.

भारताचा सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन आव्हान

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी  भारतातील समृद्ध पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा चित्रित करणाऱ्या  चित्रपटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एका नवीन आव्हानाही घोषणा केली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी हे आव्हान चित्रपट निर्मात्यांना देशाच्या चैतन्यदायी सांस्कृतिक विश्वाचा  सखोल अभ्यास करण्याचे आव्हान देतो. या आव्हानांचा उद्देश सर्जनशीलता, नवोन्मेष  आणि जागतिक सहभागाला चालना देणे हा आहे.

वेव्हज: जागतिक स्तरावर भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याचे प्रदर्शन

या प्रसंगी बोलताना, केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत यांनी भारताचे वर्णन कथाकार, संगीतकार, सामग्री निर्माते आणि धार्मिक विविधता तावून-सुलाखून पाहण्याची जागा असे केले. "आपला सांस्कृतिक वारसा हा  आपल्या भूतकाळाचा केवळ दाखला नाही तर जागतिक स्तरावरील आपल्या भविष्याचा कणा आहे," असे शेखावत म्हणाले. या समृद्ध सांस्कृतिक प्रतिभेचा लाभ उठवण्यासाठी  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वेव्हज सुरु केले आहे. हा एक गतिशील मंच आहे जो  भारतातील सर्जनशील प्रतिभा प्रदर्शित करण्याच्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुरूप  आहे.

आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये भारत प्रगती करत असतानाच आपले सांस्कृतिक सामर्थ्य  ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाप्रति कृतज्ञता व्यक्त करत, ते म्हणाले की, वेव्हज द्वारे भारताच्या सांस्कृतिक विविधतेला जागतिक स्तरावर मान्यता मिळेल ज्यासाठी तो पात्र आहे तसेच सांस्कृतिक सर्जनशील अर्थव्यवस्थेला जागतिक औपचारिक अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून स्थान मिळेल. हा उपक्रम भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याचे प्रदर्शन आणि त्याचा विस्तार करण्यात वेव्हजची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो आणि आपल्या सर्जनशील निर्मात्यांना जगभरात आदर आणि ओळख मिळवून देण्यासाठी एक मंच  प्रदान करतो.

भारत: कथाकथनाची भूमी

प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनीही त्यांच्या भाषणात  सर्वात मोठी आशय  निर्मिती आणि वापर  करणारा देश म्हणून भारताचे स्थान  अधोरेखित केले. "भारत हे केवळ एक केंद्र नाही तर चित्रपटांपासून गेमिंगपर्यंतच्या सांस्कृतिक आणि डिजिटल आशय सामग्रीचे मोठे केंद्र  आहे. यालाच आम्ही आमची 'सॉफ्ट पॉवर' म्हणून संबोधतो," असे कपूर यांनी नमूद केले.

प्रथमच अशा शिखर परिषदेची रचना करण्यात आली आहे, ज्यात ऑडिओ, व्हिडिओ आणि मनोरंजन एकाच व्यासपीठावर उपलब्ध असेल, जे अशा प्रकारे जगभरातील निर्मात्यांना विस्तार, सहकार्य  आणि त्यांचे सर्जनशील सामर्थ्य प्रदर्शित करण्याची अनोखी संधी प्रदान करते. वैष्णव यांनी सर्व आशय निर्मात्यांना वेव्हज मध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आणि ही एक संधी आहे जी गमवू नका  यावर भर दिला.

 

* * *

N.Chitale/Sanjana/Sushma/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2096863) Visitor Counter : 26