पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐतिहासिक दुसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
आम्ही परस्परांना लाभदायक आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी वचनबद्ध; आपल्या लोकांच्या कल्याणासाठी तसेच जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्रित काम करू - पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
27 JAN 2025 9:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या ऐतिहासिक दुसऱ्या कार्यकाळासाठी अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही परस्परांना लाभदायक आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्रित काम करू.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट केले;
“माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष @realDonaldTrump @POTUS यांच्याशी संवाद साधताना आनंद वाटला. त्यांच्या ऐतिहासिक दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांचे अभिनंदन केले. आम्ही परस्पर हित आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या लोकांच्या कल्याणासाठी तसेच जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्रित काम करू.”
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2096860)
आगंतुक पटल : 72
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada