इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भाषिणीने पुरवली बहुभाषिक सुलभता
महाकुंभात भाविकांच्या सहाय्यासाठी यूपी 112 हेल्पलाइनने भाषिणीच्या 'कॉन्व्हर्स (वार्तालाप) वैशिष्ट्याचा अवलंब करून भाषेचा अडथळा केला दूर
Posted On:
14 JAN 2025 4:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025
प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सुरु राहणाऱ्या महाकुंभमध्ये, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने,बहुभाषिक सुलभतेसाठी ‘भाषिणी’ या अँड्रॉइड अॅप्लिकेशनसमवेत समन्वय साधत तांत्रिक सहाय्य उपलब्ध केले आहे.
'डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सोल्युशन (हरवलेल्यांना शोधण्यासाठी डिजिटल उपाय):
'डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सोल्युशन'च्या माध्यमातून जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक संमेलनात सहभागी होणाऱ्यांना भाषिणीची भाषांतर परिसंस्था पुढील प्रमाणे उपयोगी ठरेल
1. बहुभाषिक सहाय्य
a. हरवलेल्या/सापडलेल्या वस्तूंची माहिती आवाजाद्वारे आपल्या स्वतःच्या भाषेत नोंदवणे.
b. सुलभ संवादासाठी मजकूर/आवाजाचे तात्काळ भाषांतर.
2. चॅटबॉट समर्थन: प्रश्न आणि किऑस्क नेव्हिगेशनसाठी बहुभाषिक चॅटबॉट.
3. मोबाइल अॅप / किऑस्क एकत्रीकरण: मार्गदर्शक सूचनांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर.
4. पोलिस सहकार्य: अधिकाऱ्यांशी अखंड संवाद सुलभ करणे.
कुंभ सहाय्यक (Sah’AI’yak) चॅटबॉट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेला कुंभ सहाय्यक (Sah’AI’yak) हा एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)-संचालित, बहुभाषिक, आवाज-सुलभ चॅटबॉट असून, तो महाकुंभ 2025 ला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना सहाय्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. बॉट ला अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचे (उदा. लामा एलएलएम) पाठबळ आहे.
यात्रेकरूंना उपयुक्त माहिती देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करणे, तसेच त्यांच्यासाठी महाकुंभ 2025 चा सोहळा अविस्मरणीय बनवून यात्रेदरम्यान पुरवल्या जाणाऱ्या मदतीचा नवा मापदंड प्रस्थापित करणे, हे कुंभ Sah’AI’yak चे उद्दिष्ट आहे.
कुंभ सहायक चॅटबॉट सर्वांना अखंड, अद्ययावत माहिती आणि दिशादर्शन सहाय्य प्रदान करून यात्रेकरूंना चांगला अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
भाषिणीचे भाषांतर हिंदी, इंग्रजी आणि इतर 9 भारतीय भाषांसह 11 भाषांमध्ये चॅटबॉटला समर्थन देते.
यूपी 112 इमर्जन्सी हेल्पलाइन
महाकुंभ मध्ये येणाऱ्या देशभरातल्या तसेच परदेशी यात्रेकरूंना प्रयागराज आणि शेजारच्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषा समजून घेण्यासाठी मदतीची आवश्यकता भासेल. भाषिणी मोबाइल एप्लिकेशनच्या 'कॉन्व्हर्स' (वार्तालाप) या वैशिष्ट्यामुळे भाविकांना अखंड संवाद साधता येईल आणि या भव्य कार्यक्रमात तैनात असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या 112 या आपत्कालीन हेल्पलाइनच्या युनिटबरोबर सहज संवाद साधता येईल.
उत्तरप्रदेशच्या पोलीस विभागाने भाषिणी या अॅपबरोबर सहयोग केला असून, भाषेचा अडथळा आल्यावर मदत मागणाऱ्या भाविकांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अॅपमधील कॉन्व्हर्स फीचरचा वापर करण्याचे दिले आहे.
अशाप्रकारे महाकुंभ 2025 ला भेट देणाऱ्या भाविकांच्या प्रश्नांना उत्तर देऊन दिशादर्शन करण्यासाठी बहुभाषिक सहाय्य प्रदान करून, त्यांना महाकुंभाचा अविस्मरणीय अनुभव देणे, हे भाषिणीचे उद्दिष्ट आहे. एकूणच, भाषिणीच्या भाषांतर परीसंस्थेने भाविकांना सुरळीत आणि समावेशक अनुभव सुनिश्चित केला असून, यामधून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची तांत्रिक आणि नवोन्मेश सुलभतेप्रति असलेली वचनबद्धता प्रतिबिंबित होते.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2092806)
Visitor Counter : 29