माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्र सरकारच्या दिनदर्शिका 2025 चे केले अनावरण
Posted On:
07 JAN 2025 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 7 जानेवारी 2025
केंद्र सरकारने परिवर्तनात्मक शासनाच्या तत्वांना अधोरेखित करत 2025 च्या दिनदर्शिकेची केंद्रीय संकल्पना म्हणून 'जनभागीदारी से जनकल्याण' (लोकसहभागातून लोककल्याण) ची निवड केली आहे. आज रेल भवन येथे दिनदर्शिकेचे अनावरण करताना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, गेल्या दशकात विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या परिवर्तनात्मक शासनाचा दृश्य प्रभाव अधोरेखित केला. गरीबांचे कल्याण, महिलांचे सक्षमीकरण आणि संपूर्ण देशात पायाभूत सुविधांचा विकास करण्यात परिवर्तनात्मक शासनाच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू, पत्रसूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा आणि केंद्रीय संचार ब्युरोचे संचालक योगेश बावेजा यावेळी उपस्थित होते.
देश 2014 ते 2025 या सुशासनाच्या 11 व्या वर्षात प्रवेश करत असताना, केंद्र सरकारची दिनदर्शिका 2025 हे देशाची प्रगती आणि परिवर्तनकारी कारभार अधोरेखित करण्यासाठी या माध्यमाचा वापर करण्याच्या दीर्घकालीन परंपरेतील आणखी एक अध्याय आहे. केंद्रीय संचार ब्युरोने डिझाइन आणि तयार केलेली ही दिनदर्शिका केवळ दिवस आणि महिन्यांसाठी मार्गदर्शक नाही तर सरकारच्या सर्वसमावेशकता, पारदर्शकता आणि सहभागात्मक शासनाप्रति वचनबद्धतेचे प्रतिबिंब देखील आहे.
दिनदर्शिकेत चित्रांद्वारे केंद्र सरकारचा सहभागात्मक दृष्टिकोन अधोरेखित केला आहे जो विकसित भारताच्या दिशेने वाटचालीसाठी पूरक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या केंद्रस्थानी असलेल्या सहभागात्मक शासनाचे महत्त्वही ते अधोरेखित करते. आपल्या देशाची ताकद येथील जनतेच्या सामूहिक उर्जा आणि प्रयत्नांमध्ये आहे यावर ते भर देते. स्वच्छतेचे देशव्यापी चळवळीत रूपांतर करणाऱ्या स्वच्छ भारत अभियान सारख्या कार्यक्रमांपासून, ते 68 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या आयुष्मान भारत सारख्या उपक्रमांपर्यंत, नागरिकांचा सहभाग सरकारी योजनांच्या यशामध्ये केंद्रस्थानी राहिला आहे.
केंद्र सरकारच्या दिनदर्शिका 2025 च्या प्रमुख संकल्पना
दिनदर्शिकेची सुरुवात सर्वेषां मंगलं भूयात् अर्थात सर्वांचे कल्याण या ब्रीदवाक्याने होते. आणि त्यानंतर देशाच्या प्रगतीमध्ये कृषी , महिला सक्षमीकरण, युवक यांचे योगदान आणि क्षमता वृद्धी अधोरेखित केली आहे. अन्न का वर्धन हो म्हणजे अन्नधान्य उत्पादन वाढो , शक्तीरूपेण संस्थिता म्हणजे महिलांना शक्ती संबोधित करून त्यांना राष्ट्र उभारणीचे श्रेय देणे आणि तरुणांना जागृत होऊन ज्ञान मिळवण्याचे आवाहन करणे, हा मंत्र दिनदर्शिकेच्या सुरुवातीच्या चार महिन्यांमध्ये प्रतिबिंबित होतो.ही दिनदर्शिका पायाभूत सुविधांसंदर्भात "राष्ट्राची भरभराट होते" हा मंत्र प्रतिबिंबित करते आणि स्वच्छतेवर देखील भर देते, जे मे महिन्यातील "मनाची शुद्धता बाह्य स्वच्छतेकडे नेते" या ब्रीदवाक्यातून प्रतिबिंबित होते. दिनदर्शिकेचे जुलै महिन्याचे पृष्ठ "तंदुरुस्तीसाठी व्यायाम हाच सर्वोत्तम उपाय" या ब्रीदवाक्यावर आधारित आहे तर स्वातंत्र्य दिनाच्या महिन्याच्या संकल्पनेनुसार निरोगी जीवनशैलीच्या माध्यमातून शंभर वर्षे दीर्घायुष्य लाभण्यासाठी शुभेच्छा देणारे आहे.
भारताचे पंतप्रधान भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदानाची पावती म्हणून ‘उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि’ या सुविचाराद्वारे उद्योगांना प्रेरणा देत असल्याचे चित्रण ही दिनदर्शिका करते. एकता दिवस साजरा केल्या जाणाऱ्या महिन्याचे चित्रण या दिनदर्शिकेत, पंतप्रधान भारताचे लोहपुरुष सरदार पटेल यांना अभिवादन करत आहेत असे केले आहे.
मातृभूमीप्रती कृतज्ञता अधोरेखित करणाऱ्या नोव्हेंबर महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी गौरव दिवस. दिनदर्शिकेचा शेवट डिसेंबरच्या पानावरील तांत्रिक नवोन्मेषावर "अपरमितं भव्यम्" ( भविष्यात अमर्याद शक्यता दडलेल्या आहेत) या संदेशाचे होणार आहे. हे पान मानवी सहभागातून प्रशासनामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर दर्शवण्याच्या सकारात्मक मंत्राचे दर्शन घडवते.
भारत सरकारच्या दिनदर्शिकेबाबत माहिती
गेल्या काही वर्षांत, भारत सरकारची दिनदर्शिका सार्वजनिक संवादाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. ही दिनदर्शिका केवळ तारखा न दाखवता वर्धित संवाद साधणारे माध्यम बनले आहे. ही दिनदर्शिका भारताने केलेल्या सामूहिक प्रगतीचे प्रेरणादायी स्मरण म्हणून काम करणारे सरकारचे प्रमुख कार्यक्रम, उपक्रम आणि कामगिरी अधोरेखित करते. भारत सरकारची 2025 या वर्षाची दिनदर्शिका देखील, ज्यामुळे देशाच्या प्रगतीला चालना मिळते अशा पारंपरिक ज्ञान प्रणालीचा परिवर्तनात्मक शासनाचा मंत्र म्हणून स्वीकार करते.
13 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित या दिनदर्शिकेची सर्वसमावेशकता प्रत्येक भाषिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतील नागरिकांशी जोडण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे. या दिनदर्शिकांचे वितरण ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचल्याने, अगदी दुर्गम भागापर्यंत संपर्क साधण्यासाठी हे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. यामुळे तळागाळातील समुदायांना सरकारच्या दूरदृष्टीची माहिती मिळते आणि उपक्रमांमध्ये सहभागी होता येते. ही दिनदर्शिका केवळ एक व्यावहारिक संसाधन नाही तर आपल्या राष्ट्राची एकता आणि सामर्थ्य यांचे प्रतीक आहे.
लाखो घरे, कार्यालये आणि सार्वजनिक संस्थांपर्यंत पोहोचणारे दस्तऐवज म्हणून, ही दिनदर्शिका पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकासासाठी सरकारची अटल वचनबद्धता दर्शवते. ही दिनदर्शिका केवळ कामगिरींचा इतिहासच नाही तर प्रत्येक नागरिकाने स्वावलंबी आणि प्रगतीशील भारताच्या निर्मितीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहनही आहे.
हे 1.4 अब्ज भारतीयांच्या सामूहिक शक्तीचे आणि सामायिक आकांक्षांचे प्रतीक आहे. आपली व्यापक पोहोच आणि शक्तिशाली संदेशासह, ही दिनदर्शिका राष्ट्राला उज्ज्वल, अधिक समावेशक उद्याच्या दिशेने प्रेरणा देते आणि मार्गदर्शन करत आहे. जन कल्याणच्या दिशेने देशाचा प्रवास पुढे नेणाऱ्या जनभागीदारीच्या परिवर्तनवादी शक्तीचा हा पुरावा आहे.
2025 या वर्षाच्या भारत सरकारच्या इंग्रजी आणि हिंदी दिनदर्शिकेची लिंक खाली दिलेली आहे.
S.Patil/S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2091035)
Visitor Counter : 98
Read this release in:
Malayalam
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada