पंतप्रधान कार्यालय
आपले सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार
2025 ची पहिली मंत्रिमंडळ बैठक आपल्या शेतकऱ्यांची समृद्धी वाढवण्यासाठी समर्पित आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
01 JAN 2025 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025
2025 या वर्षातील पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमधील महत्त्वाच्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आपले सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे:
आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. देशाचे पोट भरण्यासाठी कष्ट करणाऱ्या आपल्या सर्व शेतकरी भगिनी आणि बांधवांचा आम्हाला अभिमान आहे. 2025 वर्षातील पहिली मंत्रिमंडळ बैठक आपल्या शेतकऱ्यांची समृद्धी वाढवण्यासाठी समर्पित आहे. यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्याचा आनंद आहे.”
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2089447)
आगंतुक पटल : 108
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam