राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती निलयम, 29 डिसेंबरपासून 15 दिवसांचा पुष्प आणि फलोत्पादन महोत्सव करणार आयोजित
Posted On:
18 DEC 2024 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2024
राष्ट्रपती निलयम, बोलारम, सिकंदराबाद येथे 29 डिसेंबर 2024 पासून 15 दिवसांचा पुष्प आणि फलोत्पादन महोत्सव 'उद्यान उत्सव' आयोजित करणार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल मॅनेजमेंट (मॅनेज) हैदराबाद आणि भारतीय कृषी संशोधन परिषद, यांच्या सहकार्याने हा उद्यान उत्सव आयोजित केला जाणार आहे. लोकांच्या सहभागातून निसर्गोत्सव साजरा करणे, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वततेला प्रोत्साहन देणे हे या उत्सवाचे उद्दिष्ट आहे. संकल्पनात्मक दालनांना भेट देऊन तसेच कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन नागरिक शेती आणि फलोत्पादनातील नाविन्यपूर्ण आणि तांत्रिक विकासाबद्दल जाणून घेऊ शकतील.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (18 डिसेंबर 2024) उद्यान उत्सवाच्या तयारीचा आणि पाहुण्यांसाठीच्या सुविधांचा आढावा घेतला. राष्ट्रपती निलयमच्या अभ्यागत सुविधा केंद्रातील मिट्टी कॅफे मधील भोजनालयाचे आणि स्मरणिका विक्री केंद्राचे राष्ट्रपतींनी उद्घाटन केले. राष्ट्रपतींनी प्रांगणातील सेंद्रीय खत केंद्राला भेट दिली आणि सेंद्रीय खत बनवण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. बागेतील कचऱ्यापासून सेंद्रीय खत तयार करून हे सेंद्रीय खत केंद्र सर्वांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींच्या दक्षिणेतील वास्तव्याव्यतिरिक्त इतर दिवशी राष्ट्रपती निलयम वर्षभर जनतेसाठी खुले असते. राष्ट्रपती निलयमला भेट देण्यासाठी अभ्यागत https://rashtrapatibhavan.gov.in वर त्यांची भेटीची वेळ ऑनलाइन बुक करू शकतात
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2085794)
Visitor Counter : 18