पंतप्रधान कार्यालय
सर्वात कमी वयाचा जागतिक बुद्धिबळ विजेता ठरल्याबद्दल गुकेश डी याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2024 9:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात कमी वयाचा जागतिक बुद्धिबळ विजेता ठरलेल्या गुकेश डी याचे आज अभिनंदन केले. त्याची कामगिरी ऐतिहासिक आणि अनुकरणीय असल्याचे सांगून कौतुकाचा वर्षाव केला.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या X वरील पोस्टवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले,
“ऐतिहासिक आणि अनुकरणीय!
गुकेश डी याच्या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे अभिनंदन. त्याची अतुलनीय प्रतिभा, कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाचे हे फलित आहे.
त्याच्या विजयामुळे त्याचे नाव बुद्धिबळाच्या इतिहासात कोरले गेले आहे आणि त्याचबरोबर लाखो युवा मनांना मोठे स्वप्न पाहण्याची आणि सर्वोत्कृष्टतेकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्या उत्तमोत्तम शुभेच्छा. @DGukesh”
* * *
S.Patil/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2083975)
आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam