पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देते - पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 11 DEC 2024 11:27AM by PIB Mumbai

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देणारे धोरण आहे ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशावर प्रतिसाद देतांना ही बाब अधोरेखित केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक्स या समाज माध्यमावरील प्रतिसाद :

" केंद्रीय शिक्षणमंत्री @dpradhanbjp यांनी लहान मुलांमध्ये संपूर्ण आकलनासह शिकण्यासाठी, त्यांची सर्जनशीलता जोपासण्यासाठी आणि त्यांच्या सांस्कृतिक मुळांचे जतन करण्यासाठी त्यांना मातृभाषेतून शिकविण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या संकल्पनेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाची जोड देत कशा रितीने पाठबळ दिले जात आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली आहे. - अवश्य वाचा".

***

NM/TusharP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2083098) आगंतुक पटल : 98
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Manipuri , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam