पंतप्रधान कार्यालय
निक्षय मित्रसारखे उपक्रम आणि कमी कालावधीच्या परिणामकारक उपचारांमुळे क्षयरुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली, क्षयरोग बरा होण्याचे प्रमाण वाढले आणि क्षयरोग निर्मूलनातील भारताचे जागतिक नेतृत्व सिद्ध झाले - पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
07 DEC 2024 12:39PM by PIB Mumbai
निक्षय मित्रसारखे उपक्रम आणि कमी कालावधीच्या परिणामकारक उपचारांमुळे क्षयरुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली, क्षयरोग बरा होण्याचे प्रमाण वाढले आणि क्षयरोग निर्मूलनातील भारताचे जागतिक नेतृत्व सिद्ध झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रिय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या X या समाज माध्यमावरील संदेशाला दिलेल्या प्रतिक्रियेत पंतप्रधान म्हणाले,
‘निक्षय मित्र उपक्रमातून पोषक आहार योजना राबवण्यात आल्यामुळे भारताच्या क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये कमालीची सुधारणा दिसून येत असल्याचं केंद्रिय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी नमूद केलं आहे. निक्षय मित्र सारखे उपक्रम आणि कमी कालावधीच्या परिणामकारक उपचारांमुळे क्षयरुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. क्षयरोग बरा होण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि भारताच्या क्षयरोग निर्मूलनाबाबतीतल्या जागतिक पातळीवरील नेतृत्वक्षमतेवर शिक्कामोर्तब झालं आहे.’
***
H.Akude/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2081948)
आगंतुक पटल : 81
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam