पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सुगम्य भारत अभियानाला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा
दिव्यांग भगिनी आणि बंधूंसाठी सुलभता,समानता आणि संधी वाढवण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार
आपल्या दिव्यांग भगिनी आणि बंधूचे मनोधैर्य आणि कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे: पंतप्रधान
Posted On:
03 DEC 2024 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुगम्य भारत अभियानाला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. दिव्यांग भगिनी आणि बंधूंसाठी सुलभता,समानता आणि संधी वाढवण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.दिव्यांग भगिनी आणि बंधूंच्या मनोधैर्याचे आणि कर्तृत्वाचे कौतुक करताना मोदी यांनी आपल्या सर्वांना त्याचा अभिमान वाटतो असे नमूद केले.
मायगव्हइंडिया आणि मोदी अर्काइव्ह हँडल्सद्वारे X वर पोस्ट मालिकेला प्रतिसाद देताना मोदींनी लिहिले:
"आज, आपण #9YearsOfSugamyaBharat पूर्ण करत आहोत आणि आपल्या दिव्यांग भगिनी आणि बंधूंसाठी सुलभता,समानता आणि संधी वाढवण्याप्रति आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो."
"आपल्या दिव्यांग भगिनी आणि बंधूचे मनोधैर्य आणि कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. पॅरालिम्पिकमधले भारताचे यश हे याचे एक अतिशय ज्वलंत उदाहरण आहे. हे दिव्यांग व्यक्तींची 'कॅन डू' भावना दर्शवते. #9YearsOfSugamyaBharat"
"खरंच एक अविस्मरणीय आठवण! #9YearsOfSugamyaBharat"
"दिव्यांग व्यक्तींचा अधिकार कायदा 2016 ऐतिहासिक रूपात पारित होणे याकडे दिव्यांगांच्या सक्षमीकरणाप्रति आमच्या वचनबद्धतेचा स्पष्ट संकेत म्हणून पाहता येऊ शकते.#9YearsOfSugamyaBharat"
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2080322)
Visitor Counter : 56
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam