पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना विकसित भारत युवा नेते संवादाचा भाग बनणे सुनिश्चित करणाऱ्या प्रश्नमंजुषामध्ये भाग घेण्याचे केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
27 NOV 2024 2:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तरुणांना ऐतिहासिक विकसित भारत युवा नेते संवादाचा भाग बनणे सुनिश्चित करण्यासाठी प्रश्नमंजुषामध्ये भाग घेण्याचे आवाहन केले. आपले विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यात युवकांचे योगदान अमिट असेल, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
X या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे:
"माझ्या तरुण मित्रांनो,
एक मनोरंजक प्रश्नमंजुषा आहे, जी तुम्हाला 12 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या ऐतिहासिक विकसित भारत युवा नेते संवादाचा भाग बनवण्याची संधी प्रदान करेल.
mybharat.gov.in
तुमच्या नवोन्मेषी कल्पना सरकारच्या सर्वोच्च स्तरावरील अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्याची ही एक नामी संधी आहे.
विकसित भारताचे आपले ध्येय साध्य करण्यात तुमचे हे योगदान अमिट ठरेल.”
H.Akude/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2077869)
आगंतुक पटल : 62
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam