पंतप्रधान कार्यालय
गयानामध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरा जोमाने बहरत आहेत : पंतप्रधान
पंतप्रधानांनी सरस्वती विद्या निकेतन शाळेला दिली भेट; भारत आणि गयाना यांच्यातील सांस्कृतिक संबंध आणखी दृढ करण्यासाठीचे प्रयत्न म्हणून स्वामी अक्षरानंदजी यांनी केलेल्या कार्याची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
22 NOV 2024 3:06AM by PIB Mumbai
भारत आणि गयाना यांच्यातील सांस्कृतिक संबंध आणखी दृढ करण्यासाठीचे प्रयत्न म्हणून स्वामी अक्षरानंदजी यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरस्वती विद्या निकेतन शाळेला भेट दिली आणि ते म्हणाले की, गयानामध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरा जोमाने बहरत आहेत.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“गयानामध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरा जोमाने बहरत आहेत. मला अशा एका स्थानाला भेट देण्याची संधी मिळाली जे सांस्कृतिक बंध तसेच जनतेतील परस्पर संबंध यांना चालना देण्यात आघाडीवर आहे- ते स्थान आहे सरस्वती विद्या निकेतन शाळा. या शाळेशी जोडलेल्या सर्वांची मी प्रशंसा करतो तसेच भारत आणि गयाना यांच्यातील सांस्कृतिक संबंध आणखी दृढ करण्यासाठीचे प्रयत्न म्हणून स्वामी अक्षरानंदजी यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करतो.”
***
SonalT/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2075848)
Visitor Counter : 11
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam