पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान अँटिग्वा आणि बर्बुडाच्या पंतप्रधानांना भेटले

प्रविष्टि तिथि: 22 NOV 2024 3:29AM by PIB Mumbai

गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या अनुषंगाने तेथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी अँटिग्वा आणि बर्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यापार आणि गुंतवणूक तसेच एसआयडीएस म्हणजेच लहान द्वीपकल्पीय विकसनशील देशांमध्ये क्षमता निर्मिती सारख्या क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली. पंतप्रधान ब्राऊन यांनी पंतप्रधान मोदी यांनी भारत-कॅरीकॉम भागीदारी बळकट करण्यासाठी मांडलेल्या सात कलमी योजनेची प्रशंसा केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याला दिलेल्या पाठींब्याचा पंतप्रधान ब्राऊन यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

***

JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2075846) आगंतुक पटल : 77
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam