माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ताज्या दमाच्या प्रतिभावंतांसह क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो इफ्फी 2024 मध्ये चमकण्यासाठी सज्ज
इफ्फीची संकल्पना ”युवा चित्रपटनिर्माते हेच भविष्य आहेत” वर केंद्रित
क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो मंच मागच्या महोत्सवातील 75 कलावंतांऐवजी आता 100 युवा प्रतिभावंताना संधी देणार
5 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो चॅम्पियन्स त्यांच्या उल्लेखनीय प्रवासासाठी ओळखले जात आहेत
गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2024 दरम्यान आयोजित 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परिवर्तनशील क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो (सीएमओटी ) उपक्रमासह भारतीय चित्रपटाचे भविष्य केंद्रस्थानी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या "आझादी का अमृत महोत्सव" बॅनरखाली सुरू करण्यात आलेला हा उपक्रम चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात भारतातील युवा प्रतिभावंतांचा शोध घेणारा आणि त्यांची जडणघडण करणारा एक दीपस्तंभ बनला आहे.
सीएमओटी हा अशा प्रकारचा सर्वात मोठा मंच असून तो उदयोन्मुख निर्माते आणि चित्रपट उद्योगातील दिग्गजांमध्ये परस्परसंवाद, सहभाग आणि शिकण्यास प्रोत्साहन देतो.
या वर्षीच्या सीएमओटी कार्यक्रमात 13 फिल्ममेकिंग प्रकारातील 100 युवा प्रतिभावंतांचे स्वागत करून लक्षणीय विस्तार करण्यात आला आहे आणि मागील महोत्सवातील 75 प्रतिभावंतांऐवजी आता 100 तरुण प्रतिभावंताचा समावेश करण्यात आला आहे.
उद्योग क्षेत्राचा प्रभाव
नवोदित म्हणून सुरुवात केल्यापासून ते जागतिक ख्यातीपर्यंत, सीएमओटी’च्या माजी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या यशोगाथांना सीमांचे बंधन नाही. ड्यून , निमोना आणि मेग 2 सारख्या कोट्यवधी डॉलर्सच्या हॉलीवूड ब्लॉकबस्टर्समधील योगदान असो किंवा कान, टोरंटो, बर्लिन आणि आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये प्रशंसा मिळवणे असो, या प्रतिभावंतांनी सर्जनशीलतेवर आपला एक अमिट ठसा उमटवला आहे, जागतिक मंचावर आपले अस्तित्व जाणवून दिले आहे.
या वर्षी, इफ्फीमध्ये पाच उत्कृष्ट सीएमओटी चॅम्पियन्सना मानवंदना दिली जाणार आहे, ज्यांचा प्रवास दृढ निर्धार , सर्जनशीलता आणि उत्कृष्टतेचे उदाहरण आहे :
चिदानंद एस. नाईक – कान मधील पुरस्कार विजेता
सुबर्ण दास – टीआयएफएफ , एसएक्स एसडब्ल्यू आणि बर्लिन मध्ये चित्रपटांचा प्रीमियर
अक्षिता वोहरा - पुरस्कारप्राप्त प्रकल्पांसाठी मिळवली प्रशंसा
अखिल दामोदर लोटलीकर – विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये निवड
कृष्णा दुसाने - आंतरराष्ट्रीय यशाचा भाग
हे मार्गदर्शक इफ्फी मधील शॉर्ट फिल्म मेकिंग चॅलेंज दरम्यान पाच सीएमओटी टीमना मार्गदर्शन करतील, त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातील सूचना सामायिक करतील.
उदयोन्मुख सर्जनशील कलावंतांसाठी एक व्यासपीठ
स्थापनेपासूनच या महत्त्वपूर्ण उपक्रमाने ईशान्य भारतातील राज्ये आणि जम्मू आणि काश्मीरसह भारताच्या कानाकोपऱ्यातील 225 युवा सर्जनशील प्रतिभावंतांना आकर्षित केले आहे. जागतिक स्तरावर अशा प्रकारचे सार्वधिक पाठिंबा असलेले हे व्यासपीठ सिनेमाच्या माध्यमातून कथा सांगणाऱ्या भावी पिढीची जडणघडण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा दाखला आहे.
100 क्रिएटिव्ह माइंड्सची निवड
यावर्षी ओरिसा, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, झारखंड, मेघालय, मिझोराम ही राज्ये आणि पाँडेचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटे यांसारख्या केंद्रशासित प्रदेशांसह भारताच्या कानाकोपऱ्यातून 13 वेगवेगळ्या चित्रपट प्रकारांमधील सुमारे 1,070 प्रवेशिकांसह सीएमओटीला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. दिग्दर्शन श्रेणीमधून सर्वाधिक प्रवेशिका आल्या, त्याखालोखाल केशभूषा आणि मेक-अप आणि सिनेमॅटोग्राफीसाठी आल्या.
निवड प्रक्रियेमध्ये दोन टप्प्यातील मूल्यांकन समाविष्ट होते:
निवड परीक्षक : चित्रपट उद्योगातील पुरस्कार-विजेत्या व्यावसायिकांनी लघुपट, शो रील, पोर्टफोलिओ आणि म्युझिक फाईल्ससह सर्व प्रवेशिकांचा आढावा घेतला , त्यातून विविध प्रकारात सुमारे 300 जणांची निवड करण्यात आली.
ग्रँड ज्युरी: चित्रपट उद्योगातील दिग्गज आणि ज्येष्ठ चित्रपटकर्मींचा समावेश असलेल्या, ग्रँड ज्युरीने चित्रपटांच्या सर्व प्रकारांमधील अंतिम 100 सहभागींची निवड करण्यासाठी छाननी केलेल्या अर्जांचे बारकाईने मूल्यांकन केले.
विस्तारित चित्रपट निर्मिती प्रकार
आपला आवाका आणखी वाढवत सीएमओटी 2024 ने 13 विशेष चित्रपट निर्मिती प्रकारांवर लक्ष केंद्रित करून आपली क्षितिजे विस्तारली आहेत, ज्यामध्ये नव्याने समावेश केलेले व्हॉईस ओव्हर/डबिंग श्रेणी तसेच स्वतंत्र केशभूषा आणि मेकअप विभाग आहेत. कार्यक्रमात आता पुढील बाबींचा समावेश आहे :
- दिग्दर्शन
- अभिनय
- सिनेमॅटोग्राफी
- एडिटिंग आणि सबटायटलींग
- पटकथालेखन
- पार्श्वगायन
- संगीत रचना
- वेशभूषा
- कला दिग्दर्शन
- ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स), ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर), आणि व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर)
- केशभूषा आणि मेकअप
- साउंड रेकॉर्डिंग
- व्हॉईस ओव्हर/डबिंग
उत्कंठावर्धक कार्यक्रम आणि संधी
सीएमओटी 2024 हा सहभागींसाठी उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारा अनुभव असेल. 100 सीएमओटी गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत एका समृद्ध प्रवासाला निघतील, आणि एका व्यापक कार्यक्रमात सहभागी होतील, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
दिग्गजांबरोबर मास्टरक्लासेस: या वर्षीच्या सीएमओटी कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या नेतृत्वाखालील मास्टरक्लास पहायला मिळणार आहे. या सत्रांमध्ये अभिनय, पिचिंग, लेखन आणि पोस्ट-प्रॉडक्शनसह चित्रपट निर्मितीच्या विविध बाबींचा समावेश आहे. यामध्ये :
- अभिनयाच्या कलेवर प्रभुत्व मिळवणे: भारतातील आघाडीचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांचे अस्सल कला सादरीकरणासाठी मार्गदर्शन
- द आर्ट ऑफ पिचिंग: द स्टोरी इंकचे संस्थापक सिद्धार्थ जैन यांचे निर्माते, वितरक आणि गुंतवणूकदारांसाठी परफेक्ट पीच साठी मार्गदर्शन
- क्राफ्टिंग सिनेमॅटिक हार्मनी: ब्रिज पोस्टवर्क्स (ऑनलाइन) येथील प्रख्यात कलरिस्ट पृथ्वी बुद्धवरपू यांचे डीआय आणि कलर ग्रेडिंग संदर्भात मार्गदर्शन
- लेखकाची प्रक्रिया: प्रख्यात पटकथालेखक चारुदत्त आचार्य यांचे संशोधन ते दृश्य लेखन याबाबत मार्गदर्शन
- जागतिक मान्यता मिळवण्याचा राजमार्ग : अ लिटिल अनार्की फिल्म्सचे संस्थापक कोवल भाटिया यांचे स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि प्रयोगशाळांचा शोध यावर मार्गदर्शन
- रिअल टू रील: वायआरएफ स्टुडिओजमधील चित्रपट निर्माते सैफ अख्तर यांचे माहितीपट निर्मितीची कला आणि वाव यावर मार्गदर्शन
48-तासांचे फिल्ममेकिंग चॅलेंज: सहभागींना 20 सदस्यांच्या पाच टीममध्ये विभागले जाईल, जे 48 तासांच्या आत “तंत्रज्ञानाच्या युगातील नातेसंबंध” या संकल्पनेवर लघुपट तयार करतील. ही स्पर्धा 21 ते 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पणजीच्या 4 किलोमीटरच्या परिघात 12 ठिकाणी पार पडेल.
महोत्सवाच्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित केले जातील आणि ग्रेट ग्रँड ज्युरी द्वारे त्याचे मूल्यांकन केले जाईल, विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले जातील.
ब्रिटन स्थित शॉर्ट्स इंटरनॅशनलच्या सहकार्याने फिल्ममेकिंग चॅलेंज चे आयोजन करण्यात आले आहे. सर्जनशीलता, टीमवर्क आणि कठोर डेडलाइन अंतर्गत कथाकथनाची ही एक अनोखी संधी आहे.
टॅलेंट कॅम्प: सहभागींना रॉय कपूर फिल्म्स, ब्रिज पोस्टवर्क्स, वी आर युवा, मुकेश छाबरा कास्टिंग कंपनी, द स्टोरी इंक यासह 11 पेक्षा जास्त आघाडीच्या मीडिया आणि एंटरटेनमेंट कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर आपले कौशल्ये दाखवण्याची आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याची विशेष संधी मिळणार आहे. हा महत्वपूर्ण कार्यक्रम अर्थपूर्ण संभाषण आणि संभाव्य सहकार्य सुलभ करतो, उद्योग क्षेत्रातील सहभागींचे भविष्य उज्वल बनवतो. विशेष म्हणजे, 100 क्रिएटिव्ह माइंड्स व्यतिरिक्त, 225 प्रतिभावान माजी विद्यार्थी आणि चित्रपट निर्मात्यांना उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित प्रतिभावंत भागीदारांसोबत जोडले जाण्याची संधी मिळेल.
इफ्फी आणि फिल्म बझारचा दौरा : सहभागी 55 व्या इफ्फीच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील आणि भारतातील प्रमुख सिने मार्केटप्लेस, फिल्म बझारला भेट देतील. 24 नोव्हेंबर 2024 रोजी, फिल्म बझारचा एक मार्गदर्शित दौरा सिनेमा उद्योगाविषयी माहिती देईल, तसेच संपूर्ण महोत्सवात विविध चित्रपट प्रदर्शित होतील.
निष्कर्ष:
या चौथ्या आवृत्तीत, सीएमओटी युवा कलाकार, चित्रपट निर्माते आणि सर्जनशील निर्मात्यांची प्रतिभा आणि महत्त्वाकांक्षा साजरे करणारे एक व्यासपीठ म्हणून आपला नावलौकिक अधिक मजबूत करत आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या दिग्गजांकडून शिकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देऊन, सीएमओटी सहभागींना त्यांचे कौशल्य विस्तारण्यासाठी , त्यांची क्षितिजे विस्तारण्यासाठी आणि जागतिक चित्रपट उद्योगात दीर्घकाळ संबंध टिकवून ठेवण्यासाठी सक्षम करणारे आहे. हा उपक्रम केवळ त्यांच्या क्षमतेला वाव देत नाही तर जागतिक स्तरावर कथा सादरीकरणाच्या भविष्याला आकार देत स्वप्नांना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आवश्यक साधने आणि मार्गदर्शन देत सक्षम करतो.
संदर्भ:
https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=2072918®=3&lang=1
https://iffigoa.org/cmot/about-cmot
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2052589#:~:text=Best%20Debut%20Director%20Award%3A%20A,talent%20in%20the%20film%20industry
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2071321
***
M.Pange/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2073945)
Visitor Counter : 43
Read this release in:
English
,
Urdu
,
Konkani
,
Hindi
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam