पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन 
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                06 NOV 2024 4:06PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2024
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.भारत-अमेरिकेतील समावेशी जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या हेतूने सहयोग पुनर्स्थापित करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘एक्स’ या समाज माध्यमाव्दारे पाठवलेल्या  संदेशात मोदी यांनी लिहिले आहे,
“माझे मित्र @realDonaldTrump यांचे निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. आपण याआधीच्या कार्यकाळातील कारकीर्दीच्या यशामध्ये अधिक भर घालत आहात,अशावेळी  भारत आणि अमेरिका व्यापक वैश्विक आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या हेतूने सहयोग पुनर्स्थापित करण्यासाठी मी उत्सुक आणि तत्पर आहे.आपल्या जनतेच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धी  प्रस्थापित व्हावी यासाठी  प्रोत्साहन देण्यासाठी आपण एकत्र  येऊन काम करूया.”
 
S.Bedekar/R.Bedekar/P.Malandkar
 
 
 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
 
                
                
                
                
                
                (Release ID: 2071158)
                Visitor Counter : 87
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali-TR 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam