पंतप्रधान कार्यालय
स्पेनच्या अध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान (ऑक्टोबर 28-29, 2024) जारी करण्यात आलेले भारत-स्पेन संयुक्त निवेदन
Posted On:
28 OCT 2024 6:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ 28-29 ऑक्टोबर, 2024 रोजी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर होते. अध्यक्ष सांचेझ यांची ही पहिली भारत भेट होती आणि 18 वर्षांनंतर स्पेनचे अध्यक्ष भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत परिवहन आणि शाश्वत गतिशीलता मंत्री, उद्योग आणि पर्यटन मंत्री आणि एक उच्चस्तरीय अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळ होते.
या भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना ऊर्जा मिळाली असून नवीन गती मिळाली आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील वाढत्या सहकार्याच्या नवीन युगाची सुरुवात झाली आहे असे दोन्ही नेत्यांनी नमूद केले. 2017 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या स्पेन भेटीनंतर द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. उभय नेत्यांनी आपापल्या प्रतिनिधींना द्विपक्षीय अजेंडा आणखी उन्नत करण्याचे तसेच राजकीय, आर्थिक, सुरक्षा, संरक्षण, दोन्ही देशांच्या जनतेमधील संबंध आणि सांस्कृतिक सहकार्याच्या सर्व पैलूंमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या सूचना दिल्या.
(Release ID: 2069302)
Visitor Counter : 28
Read this release in:
Odia
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam