गृह मंत्रालय
लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिनी’ आयोजित केली जाणारी ‘रन फॉर युनिटी’ या वर्षी 29 ऑक्टोबर रोजी आयोजित केली जाणार
Posted On:
27 OCT 2024 9:04PM by PIB Mumbai
लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिनी’ आयोजित केली जाणारी ‘रन फॉर युनिटी’ या वर्षी 29 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात या संदर्भात घोषणा केली. यावर्षी 31 ऑक्टोबर रोजी लोह पुरुष सरदार पटेल यांची जयंती दीपावलीच्या सणासोबत आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. दरवर्षी 31 ऑक्टोबरला ‘राष्ट्रीय एकता दिन’ निमित्त ‘रन फॉर युनिटी’ आयोजित केली जाते, असेही त्यांनी सांगितले. मात्र यावर्षी 31 ऑक्टोबरला दीपावली असल्यामुळे 29 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी ‘रन फॉर युनिटी’ होणार आहे. देशातील जनतेने यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आणि देशाच्या एकात्मतेच्या मंत्रासोबतच तंदुरुस्तीचा मंत्र सर्वत्र पसरवावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
‘राष्ट्रीय एकता दिवस’ निमित्त लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेण्याचे कार्यक्रम 31 ऑक्टोबर रोजी आयोजित केले जातील.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2068769)
Visitor Counter : 79