पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची थायलंडच्या पंतप्रधानांसोबत भेट
Posted On:
11 OCT 2024 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2024
पूर्व आशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंडच्या पंतप्रधान श्रीमती पेटोंगटार्न शिनावात्रा यांची, आज 11 ऑक्टोबर 2024 रोजी व्हिएंटियान येथे भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.
थायलंडच्या पंतप्रधानांनी पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.त्याचप्रमाणे मोदी यांना, त्यांच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळासाठी थायलंडच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली. त्यांनी प्रादेशिक,उप-प्रादेशिक, आणि बहुपक्षीय मंचांवर घनिष्ठ सहकार्य निर्माण करण्याच्या विविध मार्गांविषयी विचार विनिमय केला. या संदर्भात त्यांनी बिमस्टेकच्या (BIMSTEC) माध्यमातून प्रादेशिक सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केली.
भारताचे थायलंडसोबतचे संबंध हे भारताच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणाचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे, ज्यास यंदाच्या वर्षी एक दशक पूर्ण होत आहे तसेच भारताच्या इंडो-पॅसिफिकच्या व्यापक दृष्टीकोनाचाही एक भाग आहे.
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2064180)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam