गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उद्या नवी दिल्ली येथे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या 119 व्या वार्षिक सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करणार
वार्षिक सत्राची संकल्पना आहे ‘विकसित भारत @ 2047: प्रगतीच्या शिखराकडे आगेकूच'
Posted On:
09 OCT 2024 5:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह गुरुवार, 10 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या 119 व्या वार्षिक सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करतील. 'विकसित भारत @ 2047: प्रगतीच्या शिखराकडे आगेकूच' ही वार्षिक सत्राची संकल्पना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे आणि संपूर्ण देश समर्पण आणि निष्ठेने त्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
भारत जगातील अव्वल 5 अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
119 व्या सत्रात उद्योग जगतातील सुमारे 1500 व्यावसायिक, सनदी लेखापाल, बँकर्स, वकील इत्यादी सहभागी होणार आहेत.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2063568)
Visitor Counter : 63