महिला आणि बालविकास मंत्रालय
रांची येथे 7व्या राष्ट्रीय पोषण माह समारोप समारंभात 20 राज्यांमधील 11 हजाराहून अधिक सक्षम अंगणवाडी केंद्रांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन
Posted On:
30 SEP 2024 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2024
झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांच्या उपस्थितीत आज झारखंडमधील रांची, येथे 7 व्या राष्ट्रीय पोषण माह 2024 चा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे तसेच आणि झारखंड राज्य सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महिनाभर सुरू असलेल्या या उत्सवादरम्यान देशभरात आयोजित करण्यात आलेले विविध संवेदनशील उपक्रम दाखवणारी पोषण माहवरील चित्रफीत प्रेक्षकांना दाखवण्यात आली.
यानंतर एक प्रेरणादायी लघुपट "आओ तोडें: कुपोषण चक्र" दाखवण्यात आला. या लघुपटातून झारखंडमधील जीवनचक्र दाखवले आहे. मुले, किशोरवयीन मुली आणि गर्भवती आणि स्तनदा महिला यांच्या पोषणाची स्थिती सुधारण्याचे महत्व या लघुपटाने अधोरेखित केले. देशातील 20 राज्यांमधील 11 हजाराहून अधिक सक्षम अंगणवाडींचे आज दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. सक्षम अंगणवाड्यांमुळे सुधारित पोषण आणि मुलांची बालपणात घ्यावयाची काळजी (ईसीसीई) या संकल्पनेचे दर्शन घडवणारा लघुपटही दाखवण्यात आला.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, यावेळी भाषणात म्हणाल्या, “पोषण माह दरम्यान सर्व संबंधितांनी दाखवलेल्या व्यापक सहभागाने आणि उत्साहाने आपण भारावून गेले आहे. विविध पोषण-संबंधित संकल्पनेवर पोषण माह दरम्यान 13.95 लाख अंगणवाडी केंद्रांमध्ये एकूण 12.86 कोटी संवेदीकरण उपक्रम आयोजित केले गेले. या पोषण-केंद्रित जनआंदोलनाने संपूर्ण देशाला संवेदनशील बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ‘एक पेड माँ के नाम’ च्या माध्यमातून पर्यावरण शाश्वततेवर विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती.
झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांनी आपल्या मुख्य भाषणात कुपोषणमुक्त भारताच्या दिशेने सर्वांगीण परिसंस्था निर्माण करण्यासाठी सर्व विभाग आणि इतर भागधारकांमधील अभिसरण आणि भागीदारीच्या महत्त्वाकडे सर्वांचे लक्ष वेधले.
* * *
S.Kane/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2060348)
Visitor Counter : 42