पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रिय शेतकरी पप्पामल यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

Posted On: 28 SEP 2024 7:35AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मश्री पुरस्कारप्राप्त सेंद्रिय शेतकरी पप्पामल यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पप्पामल यांनी शेतीत विशेषत: सेंद्रिय शेतीत आपला विशेष ठसा उमटवला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. लोकांनी त्यांची नम्रता आणि त्यांचा दयाळू स्वभाव याबद्दल नेहमीच प्रशंसा केल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात लिहिले आहे;

पप्पामल जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. त्यांनी शेतीत विशेषत: सेंद्रिय शेतीत आपला विशेष ठसा उमटवला आहे.   नम्रता आणि दयाळू स्वभावासाठी लोकांनी त्यांचे नेहमी कौतुक केले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि शुभचिंतक यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.”

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2059768) Visitor Counter : 5