पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

विल्मिंग्टन घोषणापत्र , ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेच्या नेत्यांचे संयुक्त निवेदन

Posted On: 22 SEP 2024 8:15AM by PIB Mumbai

 

आज, आम्ही—ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान किशिदा फ्युमियो आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन , ज्युनियर -  विल्मिंग्टन, डेलावेयर येथे अध्यक्ष बायडेन द्वारा आयोजित चौथ्या वैयक्तिक क्वाड लीडर्स शिखर परिषदेत सहभागी झालो.

क्वाडला नेतृत्व -स्तरीय प्रारूपमध्ये  उन्नत केल्यापासून चार वर्षांनंतर   क्वाडने  पूर्वीपेक्षा अधिक धोरणात्मकरित्या परस्पर ताळमेळ स्थापित केला आहे आणि ही एक अशी ताकद आहे जी हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी वास्तविक, सकारात्मक आणि चिरकाल  चांगला प्रभाव पाडते. आम्ही ही वस्तुस्थिती  साजरी करतो की अवघ्या चार वर्षांत, क्वाड देशांनी एक महत्त्वपूर्ण आणि चिरकाल टिकणारा  प्रादेशिक गट स्थापन  केला आहे जो पुढील अनेक दशकांपर्यंत हिंद-प्रशांत क्षेत्राला बळकटी देईल.

सामायिक मूल्यांच्या आधारे , आम्हाला  कायद्याच्या नियमावर आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करायचा आहे.  आम्ही एकत्रितपणे सुमारे दोन अब्ज लोकांचे  आणि जागतिक स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या एक तृतीयांशपेक्षा अधिक चे  प्रतिनिधित्व करतो. आम्ही सर्वसमावेशक आणि लवचिक अशा खुल्या आणि मुक्त हिंद-प्रशांत क्षेत्राप्रति  आमच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. आमच्या सहकार्याच्या माध्यमातून , क्वाड  सरकारांपासून ते खाजगी क्षेत्र तसेच लोकांमधील परस्पर संबंधांपर्यंत आमच्या सर्व सामूहिक सामर्थ्याचा आणि संसाधनांचा वापर करत आहे, जेणेकरून हिंद-प्रशांत क्षेत्रातील लोकांपर्यंत मूर्त लाभ पोहोचवून प्रदेशाच्या शाश्वत विकास, स्थिरता आणि समृद्धीला पाठिंबा देता येईल.

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील चार प्रमुख सागरी लोकशाही म्हणून, जागतिक सुरक्षा आणि समृद्धीचा एक अपरिहार्य घटक म्हणून या गतिशील  प्रदेशात आम्ही शांतता आणि स्थैर्य  राखण्यासाठी निर्विवादपणे उभे आहोत. कोणत्याही अस्थिरता निर्माण करणाऱ्या  किंवा एकतर्फी कारवाईंना आम्ही ठामपणे विरोध करतो ज्या बळजबरीने किंवा जबरदस्तीने विद्यमान स्थिती बदलू पाहत आहेत. या क्षेत्रातील अलिकडच्या अवैध  क्षेपणास्त्र प्रक्षेपणांचा आम्ही निषेध करतो ज्यांनी सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उल्लंघन केले आहे.  सागरी क्षेत्रातील अलीकडील धोकादायक आणि आक्रमक कारवायांबाबत आम्ही गंभीर चिंता व्यक्त करतो. आम्हाला  असा प्रदेश हवा आहे जिथे कोणत्याही देशाचे वर्चस्व नसेल आणि कोणत्याही देशावर वर्चस्व गाजवले जाणार नाही - जिथे सर्व देश दबावापासून  मुक्त असतील आणि आपले  भविष्य निश्चित करण्यासाठी आपल्या संसाधनांचा  वापर करू शकतील. आम्ही स्थिर आणि खुली आंतरराष्ट्रीय प्रणाली टिकवून ठेवण्याच्या आमच्या वचनबद्धतेमध्ये आम्ही एकजूट आहोत, ज्यामध्ये मानवाधिकार, स्वातंत्र्याचे तत्त्व, कायद्याचे राज्य, लोकशाही मूल्ये, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता, विवादांवर शांततापूर्ण तोडगा  आणि संयुक्त राष्ट्र सनदेसह आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बळाचा वापर किंवा धमकीवर प्रतिबंध यासाठी मजबूत समर्थन समाविष्ट आहे.

2023 क्वाड शिखर परिषदेत नेत्यांनी जारी केलेले व्हिजन स्टेटमेंट  प्रतिबिंबित करत आम्ही जे काही करतो आणि यापुढेही  करत राहू त्यामध्ये आम्ही पारदर्शक  राहू. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघ (आसियान), प्रशांत द्वीप समूह फोरम (पीआयएफ) , आणि हिंद महासागर रिम संघटना  (आयओआरए) यासह प्रादेशिक संस्थांच्या नेतृत्वाचा आदर क्वाडच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहे आणि यापुढेही राहील.

लोककल्याणासाठी एक जागतिक शक्ती

आरोग्य सुरक्षा

कोविड-19 महामारीने जगाला आठवण करून दिली की आपल्या समाजासाठी, आपल्या अर्थव्यवस्थांसाठी आणि आपल्या प्रदेशाच्या स्थिरतेसाठी आरोग्य सुरक्षा किती महत्त्वाची आहे. 2021आणि 2022 मध्ये, हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांना 400 दशलक्षहून अधिक सुरक्षित आणि प्रभावी कोविड 19 प्रतिबंधक लस आणि जागतिक स्तरावर जवळजवळ 800 दशलक्ष लसी वितरित करण्यासाठी क्वाड एकत्र आले आणि अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना लस पुरवठ्यासाठी कोवॅक्स प्रगत बाजारपेठ वचनबद्धतेला 5.6 अब्ज डॉलर्स प्रदान केले. 2023 मध्ये, आम्ही क्वाड आरोग्य सुरक्षा भागीदारीची घोषणा केली, ज्याद्वारे क्वाड ने संपूर्ण प्रदेशातील भागीदारांसाठी काम करणे सुरु ठेवले आहे, ज्यामध्ये साथीच्या रोगासाठी सज्जतेच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे.

सध्याच्या क्लेड I mpox च्या उद्रेकाला, तसेच सध्या सुरु  असलेल्या clade II mpox उद्रेकाला प्रतिसाद म्हणून, आम्ही सुरक्षित, प्रभावी, गुणवत्ता-आश्वासित mpox लसींच्या समान उपलब्धतेला  प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधण्याची योजना आखत आहोत, ज्यामध्ये अल्प  आणि मध्यम  उत्पन्न असलेल्या देशांमध्ये  लस निर्मितीचा  विस्तार देखील समाविष्ट आहे.

आज आम्हाला क्वाड कॅन्सर मूनशॉटची घोषणा करताना अभिमान वाटत आहे , जी हिंद-प्रशांत क्षेत्रात जीव वाचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भागीदारी आहे . कोविड-19 महामारी दरम्यान क्वाडची यशस्वी भागीदारी, या प्रदेशातील कर्करोगाचा सामना करण्यासाठी आमची सामूहिक गुंतवणूक, आमची वैज्ञानिक आणि वैद्यकीय क्षमता आणि आमच्या खाजगी आणि बिगर -नफा क्षेत्रांच्या  योगदानाच्या आधारे आम्ही या प्रदेशात कर्करोगाचा भार  कमी करण्यासाठी भागीदार देशांसोबत सहकार्य करू.

क्वाड कॅन्सर मूनशॉट सुरुवातीला हिंद-प्रशांत क्षेत्रात गर्भाशय मुखाचा कर्करोग  कॅन्सर - एक प्रतिबंध करण्यायोग्य कर्करोग , ज्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावे लागत आहेत त्याविरोधात लढण्यावर लक्ष केंद्रित करत आहे  तसेच कर्करोगाच्या इतर प्रकारांवर उपाय शोधण्यासाठी पाया तयार करेल. या उपक्रमाला पाठिंबा देण्याचा अमेरिकेचा मानस आहे, ज्यामध्ये  2025 पासून सुरू होणाऱ्या वर्षात , या प्रदेशात  गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधाविषयी अमेरिकी नौदल वैद्यकीय प्रशिक्षण तसेच यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (DFC) च्या माध्यमातून गर्भाशय मुखाच्या कर्करोगासह कर्करोगाचे निदान आणि उपचारासाठी पात्र खाजगी क्षेत्र-चालित प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याचा समावेश आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रातील सर्वायकल कॅन्सर निर्मूलन कार्यक्रमासाठी ऑस्ट्रेलियन सरकार आणि मिंडरू फाउंडेशनच्या सहकार्याने 29.6 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स देण्याची घोषणा ऑस्ट्रेलियाने केली असून या क्षेत्रातील अकरा देशांना सहभागी करून घेतले जाईल जेणेकरून सर्वायकल  कॅन्सरसह  कर्करोग प्रतिबंध, निदान आणि उपचारांवर केंद्रित पूरक उपक्रमांचे समर्थन केले जाऊ शकेल. भारत हिंद-प्रशांत क्षेत्राला 7.5 दशलक्ष डॉलर्स  किमतीच्या एचपीव्ही नमुना  किट्स, डिटेक्शन किट आणि सर्वायकल कर्करोगाच्या लसी पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे. भारत, डब्ल्यूएचओच्या डिजिटल आरोग्यावरील जागतिक उपक्रमासाठी 10 दशलक्ष डॉलर्स वचनबद्धतेद्वारे, कॅन्सर तपासणी आणि देखभाल यामध्ये मदत करणाऱ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा अवलंब आणि अंमलबजावणीसाठी हिंद-प्रशांत क्षेत्रातील इच्छुक देशांना तांत्रिक सहाय्य प्रदान करेल. जपान कंबोडिया, व्हिएतनाम आणि तिमोर-लेस्टेसह सिटी आणि एमआरआय स्कॅनरसह सुमारे 27 दशलक्ष डॉलर्स किमतीची वैद्यकीय उपकरणे आणि इतर मदत पुरवत आहे आणि ‘गावी व्हॅक्सिन अलायन्स’  सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये योगदान देत आहे. आपापल्या राष्ट्रीय संदर्भात  कर्करोगाच्या क्षेत्रातील संशोधन आणि विकासामध्ये प्रगती करण्यासाठी आणि प्रदेशातील सर्वायकल कर्करोगाचा भार  कमी करण्याच्या समर्थनार्थ खाजगी क्षेत्र तसेच बिगर -सरकारी क्षेत्रातील गतिविधी  वाढवण्यासाठी काम करण्याचा क्वाड भागीदार देशांचा  मानस आहे. बिगर -सरकारी संस्थांच्या  अनेक नवीन, महत्त्वाकांक्षी वचनबद्धतेचे आम्ही स्वागत करतो, ज्यात गावी (Gavi) बरोबरच्या भागीदारीत  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सहभागी आहे, जी हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी आवश्यक मान्यतेच्या अधीन असलेल्या 40 दशलक्ष एचपीव्ही लसीच्या मात्रांच्या  ऑर्डरचे समर्थन करेल आणि जे मागणीनुसार वाढवले जाऊ शकते. आम्ही आग्नेय आशियातील सर्वायकल कर्करोगाचा सामना करण्यासाठी महिला आरोग्य आणि सक्षमीकरण नेटवर्कद्वारे 100 दशलक्ष डॉलर्सच्या नवीन वचनबद्धतेचे देखील स्वागत करतो.

एकूणच, आमच्या  वैज्ञानिक तज्ञांचे मत आहे की क्वाड कॅन्सर मूनशॉट आगामी  दशकांमध्ये लाखो लोकांचे जीव वाचवेल.

मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर)

हिंद महासागरातील 2004 मधील भूकंप आणि त्सुनामीनंतर  वीस वर्षांनी, जेव्हा क्वाड प्रथमच  मानवतावादी मदत वाढवण्यासाठी एकत्र आले, तेव्हा आम्ही हिंद-प्रशांत क्षेत्रात नैसर्गिक आपत्तींमुळे उद्भवलेल्या असुरक्षिततेवर उपाय शोधत आहोत. 2022 मध्ये, क्वाडने "हिंद-प्रशांत क्षेत्रात मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणावर क्वाड भागीदारी" स्थापन केली आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात एचएडीआर वर क्वाड भागीदारीसाठी मार्गदर्शक तत्त्वांवर स्वाक्षरी केली, ज्यामुळे क्वाड देशांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करताना वेगाने समन्वय साधता येईल. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी, आवश्यक मदत सामग्रीच्या पुरवठ्याच्या पूर्व-स्थितीसह, जलद प्रतिसाद देण्यासाठी तत्परता सुनिश्चित करण्यासाठी काम करत असल्याबद्दल आम्ही क्वाड सरकारांचे स्वागत करतो; हा प्रयत्न हिंद महासागराच्या प्रदेशापासून, आग्नेय आशियापर्यंत, प्रशांत क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे.

मे 2024 मध्ये, पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भीषण  भूस्खलनानंतर, क्वाड भागीदारांनी एकत्रितपणे 5 दशलक्ष डॉलर्सचे मानवतावादी मदतीचे योगदान दिले. टायफून यागीच्या विनाशकारी परिणामांच्या पार्श्वभूमीवर व्हिएतनामच्या लोकांना समर्थन देण्यासाठी क्वाड भागीदार 4 दशलक्ष डॉलर्सहून अधिक मानवतावादी सहाय्य प्रदान करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. क्वाड या प्रदेशातील भागीदारांना त्यांच्या दीर्घकालीन लवचिकतेच्या प्रयत्नांमध्ये समर्थन देत आहे.

सागरी सुरक्षा

2022 मध्ये, आम्ही या प्रदेशातील भागीदारांना वास्तविक वेळेत एकात्मिक आणि किफायतशीर सागरी क्षेत्र जागरूकता माहिती प्रदान करण्यासाठी हिंद-प्रशांत सागरी क्षेत्र जागरूकता  भागीदारीची घोषणा केली. तेव्हापासून, भागीदारांशी सल्लामसलत करून, आम्ही संपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्रात पॅसिफिक आयलंड्स फोरम फिशरीज एजन्सीद्वारे, आग्नेय आशियातील भागीदारांसह, इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर-इंडियन ओशन रीजन, गुरुग्रामपर्यंत हा कार्यक्रम यशस्वीपणे वाढवला आहे. हे करताना क्वाडने दोन डझनहून अधिक देशांना डार्क व्हेसेल  सागरी डोमेन जागरूकता डेटापर्यंत पोहचण्यास मदत केली आहे, जेणेकरून ते विशेष आर्थिक क्षेत्रांमधील हालचालींचे  अधिक चांगले निरीक्षण करू शकतील ज्यात बेकायदेशीर हालचाली देखील समाविष्ट आहेत.  पॅसिफिक आयलँड्स फोरम फिशरीज एजन्सीसह प्रशांत महासागर क्षेत्रात सॅटेलाइट डेटा, प्रशिक्षण आणि क्षमता निर्मितीच्या माध्यमातून प्रादेशिक सागरी क्षेत्र जागरुकता  वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलिया वचनबद्ध आहे.

आज आम्ही हिंद-प्रशांत क्षेत्रात प्रशिक्षणासाठी एक नवीन प्रादेशिक सागरी  उपक्रम (मैत्री ) जाहीर करत आहोत,ज्यामुळे या प्रदेशातील आमच्या भागीदारांना आयपीएमडीए आणि इतर क्वाड भागीदार उपक्रमांद्वारे प्रदान केलेल्या उपकरणांचा जास्तीत जास्त उपयोग करता येईल, त्यांच्या  जल क्षेत्राचे  निरीक्षण आणि सुरक्षा करता येईल , त्यांच्या कायद्यांची अंमलबजावणी करता येईल , आणि बेकायदेशीर व्यवहार रोखता येतील.  2025 मध्ये भारताकडून पहिल्या मैत्री कार्यशाळेच्या आयोजनासाठी आम्ही उत्सुक आहोत. त्याशिवाय, हिंद-प्रशांत क्षेत्रातील नियम-आधारित सागरी व्यवस्था कायम ठेवण्याच्या प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी आम्ही क्वाड सागरी कायदेशीर संवाद सुरू करण्याचे स्वागत करतो. याव्यतिरिक्त, पुढील वर्षभरात आयपीएमडीएमध्ये  नवीन तंत्रज्ञान आणि डेटा जोडण्याचा क्वाड भागीदारांचा मानस आहे, जेणेकरून प्रदेशात अत्याधुनिक क्षमता आणि माहिती प्रदान करणे सुरू ठेवता येईल.

आम्ही आज हे देखील घोषित करत आहोत की अमेरिकेचे तटरक्षक दल , जपानचे तटरक्षक दल, ऑस्ट्रेलियाचे सीमा दल  आणि भारतीय तटरक्षक दल  आंतर -परिचालन सुधारण्यासाठी आणि सागरी सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी  2025 मध्ये प्रथमच क्वाड-एट-सी जहाज देखरेख मोहीम सुरू करण्याची योजना आखत आहोत  आणि आगामी काळात हिंद-प्रशांत क्षेत्रात आणखी  मोहिमा सुरू ठेवू.

आम्ही आज क्वाड इंडो-पॅसिफिक लॉजिस्टिक नेटवर्क पायलट योजना सुरू करण्याची घोषणा करत आहोत ज्याचा उद्देश आपल्या देशांमध्ये सामायिक एअरलिफ्ट क्षमतेचा पाठपुरावा करण्यासाठी आणि आपल्या  सामूहिक लॉजिस्टिक सामर्थ्याचा लाभ उठवणे आहे जेणेकरून हिंद प्रशांत क्षेत्रात  नैसर्गिक आपत्तींना अधिक जलद आणि कार्यक्षमतेने प्रतिसाद देण्यास मदत होईल.

दर्जेदार पायाभूत सुविधा

दर्जेदार, लवचिक पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे प्रदेशाची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी क्वाड वचनबद्ध आहे.

भविष्यातील क्वाड बंदरांच्या भागीदारीची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे, जी  प्रादेशिक भागीदारांच्या सहकार्याने हिंद-प्रशांत क्षेत्रात शाश्वत आणि लवचिक बंदर पायाभूत सुविधांच्या विकासाला समर्थन देण्यासाठी क्वाडच्या कौशल्याचा उपयोग करेल. 2025 मध्ये, मुंबईत भारताकडून   क्वाड प्रादेशिक बंदरे आणि वाहतूक परिषदेचे आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. या नवीन भागीदारीद्वारे, समन्वय, माहितीची देवाणघेवाण, प्रदेशातील भागीदारांसोबत सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याचा आणि हिंद-प्रशांत प्रदेशातील दर्जेदार बंदर पायाभूत सुविधांमध्ये सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक एकत्रित करण्यासाठी संसाधनांचा लाभ घेण्याची क्वाड भागीदार देशांची इच्छा आहे.

क्वाड इन्फ्रास्ट्रक्चर फेलोशिपचा 2,200 पेक्षा जास्त तज्ञांपर्यंत विस्तार करण्याचे आम्ही कौतुक करतो आणि नमूद करतो  की गेल्या वर्षीच्या शिखर परिषदेत या उपक्रमाची घोषणा झाल्यापासून क्वाड भागीदारांनी आधीच 1,300 हून अधिक फेलोशिप प्रदान केल्या आहेत. भारतात आपत्ती रोधक पायाभूत विकास आघाडीद्वारे आयोजित कार्यशाळेचीही आम्ही प्रशंसा  करतो, जी ऊर्जा क्षेत्रातील लवचिकता बळकट करण्यासाठी संपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्रातील  भागीदारांना सक्षम बनवण्याचे काम करते.

केबल कनेक्टिव्हिटी आणि लवचिकतेसाठी क्वाड भागीदारीद्वारे, आम्ही हिंद-प्रशांत क्षेत्रात समुद्राखालील  दर्जेदार केबल नेटवर्कचे समर्थन आणि बळकटीकरण करत आहोत, ज्याची क्षमता, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता या क्षेत्राच्या आणि जगाच्या सुरक्षितता आणि समृद्धीशी अतूटपणे जोडलेली आहे. या प्रयत्नांच्या समर्थनार्थ, ऑस्ट्रेलियाने जुलैमध्ये केबल कनेक्टिव्हिटी आणि लवचिकता केंद्र सुरु केले, जे संपूर्ण प्रदेशातून प्राप्त विनंतीना अनुरूप कार्यशाळा आणि धोरण आणि नियामक सहाय्य प्रदान करत आहे. नाउरू आणि किरिबाटीमध्ये समुद्राखालील केबलसाठी सार्वजनिक आयसीटी  पायाभूत सुविधा व्यवस्थापन क्षमता सुधारण्यासाठी जपान तांत्रिक सहकार्य वाढवेल. अमेरिकेने हिंद-प्रशांत क्षेत्रातील 25 देशांमधील दूरसंचार अधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी 1,300 हून अधिक क्षमता निर्मिती प्रशिक्षण आयोजित केले आहे; आज अमेरिकन  काँग्रेससोबत  या प्रशिक्षण कार्यक्रमाचा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त 3.4 दशलक्ष डॉलर्स गुंतवून काम करण्याची इच्छा जाहीर केली आहे.

क्वाड भागीदारांद्वारे केबल प्रकल्पांमधील गुंतवणुकीमुळे सर्व प्रशांत  द्वीपराष्ट्रांना  2025 च्या अखेरीस  प्राथमिक दूरसंचार केबल कनेक्टिव्हिटी प्राप्त करण्यात मदत मिळेल. मागील क्वाड लीडर्स समिटनंतर क्वाड भागीदार देश  प्रशांत महासागरात  समुद्राखालील केबल निर्मितीसाठी इतर समविचारी भागीदारांच्या योगदानाबरोबरच 140 दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त योगदान देण्यासाठी  वचनबद्ध आहेत . समुद्राखालील नवीन केबल्समधील  गुंतवणुकीला पूरक म्हणून, भारताने हिंद-प्रशांत क्षेत्रात  समुद्राखालील केबल देखभाल आणि दुरुस्ती क्षमतेच्या विस्ताराचे परीक्षण करण्यासाठी एक व्यवहार्यता अभ्यास सुरू केला आहे.

आम्ही प्रशांत गुणवत्ता पायाभूत सुविधा तत्त्वांसाठी आमच्या समर्थनाची पुष्टी करतो, जे पायाभूत सुविधांवरील प्रशांत क्षेत्रांच्या आवाजाची अभिव्यक्ती आहे.

हिंद-प्रशांत क्षेत्रात आमची सामायिक समृद्धी आणि शाश्वत विकास पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वसमावेशक, मुक्त, शाश्वत, निष्पक्ष, सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुरक्षित डिजिटल भविष्याप्रति  आमची वचनबद्धता अधोरेखित करतो. या संदर्भात, आम्ही डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विकास आणि उपयोजनासाठी क्वाड तत्त्वांचे स्वागत करतो.

महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान

आज, व्यापक हिंद-प्रशांत क्षेत्रात विश्वासार्ह तंत्रज्ञान उपाय वितरित करण्यासाठी आमच्या भागीदारीच्या महत्त्वाकांक्षी विस्ताराची घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटतो.

गेल्या वर्षी, क्वाड भागीदारांनी सुरक्षित, लवचिक आणि परस्परसंबंधित दूरसंचार परिसंस्थेला समर्थन देण्यासाठी  पलाऊ येथे पहिले ओपन रेडिओ एक्सेस नेटवर्क (RAN) तैनात करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला. तेव्हापासून, क्वाडने या प्रयत्नासाठी अंदाजे 20 दशलक्ष डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले आहे.

क्वाड भागीदार देशांनी दक्षिणपूर्व आशियात अतिरिक्त ओपन रेडिओ एक्सेस नेटवर्क प्रकल्पांचा शोध घेण्याच्या संधीचे स्वागत केले.  फिलीपिन्समध्ये चालू असलेल्या ओपन रेडिओ एक्सेस नेटवर्क फील्ड ट्रायल्स आणि एशिया ओपन रेडिओ एक्सेस नेटवर्क अकादमी (एओआरए) साठी समर्थन विस्तारण्याची योजना आम्ही आखत आहोत. जी यावर्षीच्या सुरुवातीला  अमेरिका आणि जपानने दिलेल्या प्रारंभिक 8 दशलक्ष डॉलर्सच्या समर्थनाला पुढे नेईल . अमेरिका एओआरएच्या जागतिक विस्ताराला पाठिंबा देण्यासाठी 7 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे, ज्यात भारतीय संस्थांच्या भागीदारीतून  दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर ओपन रेडिओ एक्सेस नेटवर्क कार्यबल  प्रशिक्षण उपक्रम स्थापन करणे समाविष्ट आहे.

देशव्यापी 5G सेवा सुरु करण्यासाठी  देशाची सज्जता  सुनिश्चित करण्यासाठी क्वाड भागीदार तुवालु दूरसंचार निगमसह सहकार्याची चाचपणी करत आहेत. .

वैविध्यपूर्ण आणि स्पर्धात्मक बाजारपेठ साकारण्यासाठी आणि क्वाडच्या सेमीकंडक्टर पुरवठा साखळीची  लवचिकता वाढवण्यासाठी आमच्या पूरक सामर्थ्यांचा अधिक चांगला उपयोग करून सेमीकंडक्टरबाबत आमचे सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. सेमीकंडक्टर पुरवठा साखळी आकस्मिक नेटवर्कसाठी क्वाड देशांमधील सहकार्याच्या कराराचे आम्ही स्वागत करतो.

मागील वर्षीच्या शिखर परिषदेत घोषित केलेल्या नवीन पिढीच्या कृषी सक्षमीकरण  (AI-ENGAGE) उपक्रमासाठी प्रगत नवकल्पनांच्या माध्यमातून, आमची सरकारे कृषी दृष्टीकोनांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि संपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्रातील  शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि सेन्सिंग चा उपयोग करण्यासाठी अग्रणी  सहकार्य संशोधनाला बळकटी देत आहे. संयुक्त संशोधनासाठी 7.5+ दशलक्ष डॉलर्सहून अधिकच्या निधीची संधी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे तसेच आमच्या संशोधन समुदायांना जोडण्यासाठी आणि सामायिक संशोधन तत्त्वे पुढे नेण्यासाठी आमच्या विज्ञान संस्थांमधील  सहकार्य करारावर  स्वाक्षरी केल्याचे आम्ही स्वागत करतो.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान क्वाड जैव-अन्वेषण उपक्रम सुरु करण्यास उत्सुक आहेत—ही  एक अनुदानित व्यवस्था आहे  जी चारही देशांमधील विविध बिगर -मानवी जैविक डेटाच्या संयुक्त एआय -चालित अन्वेषणास समर्थन देईल.

हा प्रकल्प महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानमधील संशोधन आणि विकास सहकार्यासाठी आगामी क्वाड तत्वांद्वारे  देखील समर्थित असेल.

हवामान आणि स्वच्छ ऊर्जा

हवामान संकटामुळे उद्भवलेले  गंभीर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम अधोरेखित करत असताना, आम्ही हवामान आणि स्वच्छ ऊर्जा सहकार्य वाढवण्याबरोबरच  अनुकूलन आणि लवचिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी क्वाड क्लायमेट चेंज ॲडॉप्टेशन अँड मिटिगेशन पॅकेज (Q-CHAMP) यासह हिंद-प्रशांत क्षेत्रातील भागीदारांसह एकत्र काम करणार  आहोत. आम्ही आमच्या लोकांसाठी, आमच्या ग्रहासाठी आणि आमच्या सामायिक समृद्धीसाठी स्वच्छ ऊर्जा अर्थव्यवस्थेकडे संक्रमण करण्याच्या महत्त्वपूर्ण फायद्यांवर भर  देतो. उच्च दर्जाची, वैविध्यपूर्ण स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळी तयार करण्यासाठी धोरणे, प्रोत्साहन, मानके आणि गुंतवणुक संरेखित करण्यासाठी आमचे सहकार्य मजबूत करण्याचा आमचा विचार आहे ज्यामुळे जगभरात, विशेषतः हिंद-प्रशांत क्षेत्रात आमची सामूहिक ऊर्जा सुरक्षितता वाढेल, संपूर्ण प्रदेशात नवीन आर्थिक संधी निर्माण होतील आणि स्थानिक कामगार आणि समुदायांना फायदा होईल.

सहयोगी आणि भागीदार स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळींमध्ये पूरक आणि उच्च-मानक खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक उत्प्रेरित करण्याप्रति आमची वचनबद्धता कार्यान्वित करण्यासाठी आम्ही धोरण आणि सार्वजनिक वित्तपुरवठा यांच्या माध्यमातून एकत्र काम करू. यासाठी, ऑस्ट्रेलिया नोव्हेंबरमध्ये क्वाड स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळी विविधता  कार्यक्रमासाठी अर्ज आमंत्रित करेल जे हिंद-प्रशांत क्षेत्रात सौर  पॅनेल, हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर आणि बॅटरी सप्लाय चेन विकसित करणाऱ्या आणि वैविध्य आणणाऱ्या प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी 50 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स प्रदान करेल. भारत फिजी, कोमोरोस, मादागास्कर आणि सेशेल्समध्ये नवीन सौर प्रकल्पांमध्ये 2 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यास वचनबद्ध आहे. जपानने  हिंद-प्रशांत क्षेत्रातील  देशांमध्ये नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी 122 दशलक्ष डॉलर्स अनुदान आणि कर्ज देण्याचे वचन दिले आहे. अमेरिका डीएफसीच्या माध्यमातून पुरवठा साखळी विस्तारण्यासाठी आणि वैविध्यपूर्ण करण्यासाठी  सौर, पवन , शीतकरण, बॅटरी आणि महत्वपूर्ण  खनिजांसाठी खाजगी भांडवल  एकत्रित करण्याच्या संधींचा  शोध घेतच राहील.

ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी केंद्रित क्वाड प्रयत्नांची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे, ज्यात उच्च-कार्यक्षमतेच्या परवडणाऱ्या, कूलिंग प्रणालीचा वापर आणि उत्पादनाचा समावेश आहे ज्यामुळे हवामान-संवेदनशील समुदाय वाढत्या तापमानाशी जुळवून घेण्यास सक्षम  होईल आणि विज ग्रीडवरील ताण कमी करता येईल.

हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि बंदराच्या पायाभूत सुविधांची लवचिकता आणि टिकाऊपणा सुनिश्चित करण्याप्रति आम्ही संयुक्तपणे आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. क्वाड भागीदार आमच्या ज्ञान आणि कौशल्याचा लाभ घेऊन शाश्वत आणि लवचिक बंदर पायाभूत सुविधांच्या दिशेने मार्ग तयार करतील, ज्यात आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा विकास आघाडी देखील सहभागी होईल.

क्वाडच्या 2023 च्या सुरक्षित सॉफ्टवेअर संयुक्त तत्त्वांचे समर्थन करणारी  सुरक्षित सॉफ्टवेअर विकास मानके आणि प्रमाणन पुढे नेण्याप्रति आमच्या वचनबद्धतेचा विस्तार करण्यासाठी क्वाड देश सॉफ्टवेअर उत्पादक, उद्योग व्यापार गट आणि संशोधन केंद्रांसह भागीदारी करत आहेत. सरकारी नेटवर्कसाठी सॉफ्टवेअरचा विकास, खरेदी आणि अंतिम वापर अधिक सुरक्षित व्हावा  यासाठी आम्ही या मानकांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी कार्य करू, तसेच आमच्या पुरवठा साखळी, डिजिटल अर्थव्यवस्था आणि समाजांची सायबर लवचिकता एकत्रितपणे सुधारली जाईल हे सुनिश्चित करू. या दरम्यान क्वाड देशांपैकी प्रत्येकाने जबाबदार सायबर परिसंस्था , सार्वजनिक संसाधने आणि सायबर सुरक्षा जागरूकता यांना चालना देण्यासाठी वार्षिक क्वाड सायबर चॅलेंज म्हणून मोहिमा आयोजित करण्याची योजना आखली आहे. केबल कनेक्टिव्हिटी आणि लवचिकतेसाठी क्वाड भागीदारीसाठी पूरक प्रयत्न म्हणून क्वाड सीनियर सायबर ग्रुपने विकसित केलेल्या समुद्राखालील दूरसंचार केबल्सचे संरक्षण करण्यासाठी क्वाड कृती योजनेत आम्ही रचनात्मकपणे सहभागी आहोत. कृती आराखड्याद्वारे निर्देशित  जागतिक दूरसंचार पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी आमच्या समन्वित कृती , भविष्यातील डिजिटल कनेक्टिव्हिटी, जागतिक वाणिज्य आणि समृद्धीप्रति आमचे सामायिक दृष्टीकोन पुढे नेतील.

अंतराळ

हिंद-प्रशांत क्षेत्रात अंतराळ संबंधित अ‍ॅप्लीकेशन आणि तंत्रज्ञानाचे अत्यावश्यक योगदान आम्ही जाणतो. हवामान विषयक पूर्व सूचना देणारी यंत्रणा बळकट करण्यासाठी आणि तीव्र हवामानाच्या घटना व्यवस्थापनासाठी, हिंद- प्रशांत देशांमध्ये  भू निरीक्षण डाटा आणि अंतराळ संबंधित इतर अ‍ॅप्लीकेशन जारी ठेवण्याचा आमच्या चार देशांचा उद्देश आहे. यासंदर्भात हवामानविषयक तीव्र घटना आणि हवामान प्रभाव यावर देखरेखीसाठी खुल्या विज्ञानाच्या संकल्पनेला पाठींबा देतो आणि  मॉरिशस साठी  भारताच्या अंतराळ आधारित वेब पोर्टल  स्थापनेचे स्वागत करतो.

क्वाड गुंतवणूकदार जाळे (क्यूयुआयएन)

स्वच्छ उर्जा,सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिजे आणि क्वांटम यासह  धोरणात्मक तंत्रज्ञानात गुंतवणूक सुलभ करणाऱ्या क्वाड गुंतवणूकदार जाळे (क्यूयुआयएन)सह खाजगी क्षेत्रांच्या उपक्रमांचे आम्ही स्वागत करतो.पुरवठा साखळी लवचिक करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता, प्रगत संशोधन आणि विकास,नव्या तंत्रज्ञानाचे व्यवसायीकरण आणि भविष्यातल्या मनुष्यबळासाठी गुंतवणूक यासाठी   क्यूयुआयएन अनेक गुंतवणूकीना चालना देत आहे.

जनतेमधला परस्पर संवाद

क्वाड आपल्या जनतेमधला आणि आपल्या भागीदारांमधला सखोल आणि चिरकालीन संबंध भक्कम करण्यासाठी कटिबद्ध आहे. क्वाड फेलोशिपच्या माध्यमातून विज्ञान,तंत्रज्ञान आणि धोरण नेत्यांचे अद्ययावत जाळे आम्ही उभारत आहोत. क्वाड फेलोशिपची अंमलबजावणी करण्यात आघाडीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांसमवेत क्वाड सरकारे,क्वाड फेलोच्या दुसऱ्या तुकडीचे आणि आसियान देशांमधल्या विद्यार्थ्यांचा प्रथमच समावेश करण्यासाठीच्या कार्यक्रम विस्ताराचे स्वागत करतात.क्वाड फेलोजना जपानमध्ये अध्ययन शक्य व्हावे यासाठी जपान सरकार या कार्यक्रमाला समर्थन देत आहे. क्वाड फेलोजच्या पुढच्या तुकडीसाठी गुगल,प्रॅट फाउंडेशन  आणि वेस्टर्न डिजिटल सह खाजगी क्षेत्रातल्या भागीदारांच्या उदार समर्थनाचे स्वागत करतो.

भारत सरकारद्वारे अर्थ सहाय्य लाभलेल्या तंत्र संस्थांमध्ये, हिंद-प्रशांत क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना 4 वर्षांच्या  पदवीपूर्व अभियांत्रिकी कार्यक्रम अध्ययनासाठी 5,00,000 डॉलर्सच्या 50 क्वाड शिष्यवृत्ती देण्याच्या नव्या उपक्रमाची भारत आनंदाने घोषणा करत आहे.

प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांच्या निराकरणासाठी एकत्रित काम  करणे

आसियानचे मध्यवर्ती स्थान आणि ऐक्य यासाठी आज आम्ही आमचा अखंड आणि अतूट समर्थनाचा पुनरुच्चार करतो. हिंद-प्रशांत क्षेत्रावर आसियान आउटलुक (एओआयपी) च्या अंमलबजावणीला आमचा पाठींबा आम्ही जारीच ठेवू आणि आसियानची तत्वे आणि आणि प्राधान्ये यांना अनुसरत क्वाडचे काम चालेल याची सुनिश्चिती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

पूर्व आशिया शिखर परिषदेसह, धोरणात्मक संवादासाठी प्रदेशाचा प्रमुख नेताधारी मंच आणि  आसियान प्रादेशिक मंचासह आसियानच्या  प्रादेशिक नेतृत्वाची भूमिका आम्ही अधोरेखित करतो. आसियानचे समावेशक धोरणात्मक भागीदार म्हणून आमचे चार देश,आसियानशी आपापले संबंध जारी राखू इच्छितो आणि एओआयपीच्या समर्थनार्थ अधिकाधिक क्वाड सहयोग संधींचा शोध घेऊ इच्छितो.

सामायिक आकांक्षांची पूर्तता आणि सामायिक आव्हानांचे निराकरण करण्यासाठी प्रशांत द्वीप देशांसमवेत भागीदारीत काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रदेशाची मान्यवर राजकीय आणि आर्थिक धोरण संस्था असलेल्या पीआयएफसह अनेक वर्षे या प्रांताची उत्तम सेवा करणाऱ्या प्रशांत प्रादेशिक संस्थाना आमच्या समर्थनाचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि 2024-25 या वर्तमान काळासाठी पीआयएफचे अध्यक्ष म्हणून टोंगाच्या नेतृत्वाचे हार्दिक स्वागत करतो. नील प्रशांत  खंडासाठी 2050 धोरणाच्या उद्दिष्टाना आम्ही समर्थन जारी ठेवू. आम्ही आणि आमची सरकारे, हवामानविषयक कृती,महासागर प्रकृती,लवचिक पायाभूत सुविधा,सागरी सुरक्षा आणि वित्तीय एकात्मता यासह  प्रशांत क्षेत्र प्राधान्ये लक्षपूर्वक ऐकत त्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक पाऊल उचलत राहू. प्रशांत क्षेत्रातली उपजीविका,सुरक्षा आणि जनतेचे कल्याण यासाठी हवामान बदल हा एकमेव मोठा धोका असल्याचे आम्ही स्वीकारले   असून हवामान बदलासंदर्भात प्रशांत द्वीप देशांच्या जागतिक नेतृत्वाची प्रशंसा करतो.

हिंद महासागर क्षेत्रात सहकार्य दृढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.प्रदेशाच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी हिंद महासागर प्रदेशातला प्रतिष्ठीत मंच म्हणून आयओआरए ला आम्ही भक्कम पाठींबा देतो.हिंद- प्रशांत (आयओआयपी) संदर्भात आयओआरए आउटलुकला अंतिम रूप देण्यात भारताच्या नेतृत्वाला आम्ही मान्यता देत असून त्याच्या अंमलबजावणीसाठी आमचा पाठींबा व्यक्त करतो.या वर्षी आयओआरए अध्यक्ष म्हणून नेतृत्व जारी राखल्याबद्दल आम्ही श्रीलंकेचे आभार मानतो आणि 2025 मध्ये भारत  आयओआरए अध्यक्ष बनण्याची प्रतीक्षा करतो.

नेते म्हणून आमचे ठाम मत आहे की सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मता यांच्या सन्मानासह आंतरराष्ट्रीय कायदा,सागरी क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि सुरक्षितता आणि स्थैर्य जारी राखणे हिंद- प्रशांत क्षेत्राचा शाश्वत विकास आणि समृद्धीचा आधार आहेत.

सागरी दाव्यांसंदर्भात जागतिक सागरी नियमाधारित व्यवस्थेसमोरच्या  आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदा विशेषकरून संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात ( युएनसीएलओएस)प्रतिबिंबित आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पालनावर आम्ही भर देतो. पूर्व आणि दक्षिण चीनी सागरातल्या परिस्थितीबाबत आम्ही अतिशय चिंतीत आहोत. दक्षिण चीनी समुद्रात वादग्रस्त मुद्यांचे लष्करीकरण आणि  बळ आणि धमकीवजा युद्धाभ्यासाबाबत आम्ही तीव्र चिंता व्यक्त करणे जारी राखतो.धोकादायक युद्धाभ्यासाच्या वाढत्या उपयोगासह तटरक्षक आणि सागरी जहाजांच्या   धोकादायक वापराचा आम्ही निषेध करतो. इतर देशांच्या अपतटीय  संसाधन वापर कार्यात अडथळे आणण्याच्या प्रयत्नाचाही आम्हीं  निषेध करतो. सागरी तंटे हे आंतरराष्ट्रीय कायद्यांना अनुसरून शांततापूर्वक आणि   युएनसीएलओएसला अनुलक्षून सोडवले पाहिजेत याची आम्ही पुष्टी करतो.नेव्हिगेशन आणि उड्डाणक्षेत्र स्वातंत्र्य, सागराचे वैध उपयोग आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार विना अडथळा व्यापार कायम राखण्याच्या महत्वावर आम्ही पुन्हा भर देतो. युएनसीएलओएसच्या  सार्वत्रिक आणि एकीकृत स्वरूपावर आम्ही पुन्हा भर देतो आणि महासागर आणि सागरी क्षेत्रातल्या सर्व घडामोडींसाठी   युएनसीएलओएस कायदेशीर चौकट पुरवते याची पुष्टी करतो. दक्षिण चीन  सागरासंदर्भात 2016 चा  लवाद निवाडा हा अतिशय महत्वाचा असून संबंधित पक्षांमधला तंटा शांतेतेने सोडवण्यासाठी पाया आहे हे आम्ही अधोरेखित करतो.

आमच्या जागतिक आणि प्रादेशिक  भागीदारांसमवेत  जागतिक शांतता,समृद्धी आणि शाश्वत विकासाला  आधारदायी ठरणारे उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय संस्थाना आम्ही  समर्थन जारी ठेवू.

संयुक्त राष्ट्र सनद आणि संयुक्त राष्ट्र व्यवस्थेच्या तीन स्तंभाना आमच्या ठाम समर्थनाचा आम्ही पुनरुच्चार करतो. संयुक्त राष्ट्रे,त्यांची  सनद आणि त्यांच्या एजन्सीच्या एकात्मतेला एकतर्फी खिळखिळी करण्याच्या प्रयत्नांवरच्या  उपायांसाठी  आमच्या भागीदारांशी सल्ला मसलत करून आम्ही सामुहिकरित्या कार्य करू.संयुक्त  राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या स्थायी आणि अस्थायी श्रेणीतल्या सदस्यत्वाच्या विस्ताराद्वारे  ती    अधिक प्रातिनिधिक,समावेशक,पारदर्शक, कार्यक्षम, प्रभावी, लोकशाही आणि उत्तरदायी होण्याची तातडीची आवश्यकता लक्षात घेऊन आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा करू. सुधारित सुरक्षा परिषदेत, स्थायी जागांच्या विस्तारात  आफ्रिका,आशिया, लॅटिन अमेरिका आणि   कॅरेबियन प्रतिनिधित्वाचा समावेश असला पाहिजे.      

प्रादेशिक अखंडता,सर्व राष्ट्रांचे  सार्वभौमत्व आणि तंट्यांचे  शांततेने निराकरण यासह आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन आणि संयुक्त राष्ट्र सनद तत्वांचा आदर यासाठी आम्ही ठाम उभे आहोत.  युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाबाबत,भयावह आणि दुःखद  परिणामाबाबत आम्ही तीव्र चिंता व्यक्त करतो. युद्ध सुरु झाल्यापासून आमच्यापैकी प्रत्येकाने युक्रेनला भेट दिली असून स्वतः हे पाहिले आहे. सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांच्या  आदरासह संयुक्त राष्ट्र सनद उद्देश आणि तत्वे यांना अनुसरत आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार समावेशक, न्याय्य आणि चिरशांतीपूर्ण तोडग्याच्या आवश्यकतेचा आम्ही पुनरुच्चार करतो.युक्रेन मधल्या युद्धाचा जागतिक अन्नधान्य आणि उर्जा सुरक्षितता विशेष करून विकसनशील आणि कमी विकसित देशांसाठी नकारात्मक परिणामांची आम्ही दखल घेतली आहे.या युद्धाच्या संदर्भात आण्विक शस्त्रास्त्रांचा  वापर किंवा त्यांच्या वापराची धमकी स्वीकारार्ह नाही हा आमचा दृष्टीकोन आम्ही सामायिक करत आहोत. आंतरराष्ट्रीय कायदा राखण्याचे महत्व आम्ही अधोरेखित करत आहोत आणि संयुक्त राष्ट्र सनद अनुसरत  कोणत्याही राष्ट्राची प्रादेशिक एकात्मता आणि सार्वभौमत्व किंवा राजकीय स्वातंत्र्य याविरोधात प्रत्येक राष्ट्राने बळाचा वापर किंवा त्याच्या वापराची धमकी यापासून स्वतः ला दूर ठेवले पाहिजे याचा आम्ही पुनरुच्चार करतो.

उत्तर कोरियाकडून अस्थिर  करणाऱ्या  बॅलेस्टीक  क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा  आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अनेक ठरावांचे उल्लंघन करत आण्विक शस्त्रास्त्रांचा  सातत्याने पाठपुरावा करण्याचा आम्ही निषेध करतो. ही प्रक्षेपणे आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्य यांना गंभीर धोका निर्माण करतात. युएनएससीआर अंतर्गत सर्व दायीत्वांचे पालन करत पुढील चिथावणी टाळत भरीव संवादाचा मार्ग अवलंबावा असे आवाहन आम्ही उत्तर कोरियाला करत आहोत.  युएनएससीआर अनुरुप कोरीयन द्वीपकल्पात पूर्णपणे अण्वस्त्र प्रसारबंदी राहावी या आमच्या कटिबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत असून  या युएनएससीआरच्या संपूर्ण अंमलबजावणीचे आवाहन सर्व राष्ट्रांना करत आहोत.उत्तर कोरिया प्रदेशात आणि त्याबाहेर आण्विक आणि  क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा प्रसार रोखण्याच्या गरजेवर आम्ही भर देत आहोत.सामूहिक विनाशाची अवैध हत्यारे   आणि बॅलेस्टीक क्षेपणास्त्र कार्यक्रमाना निधीसाठी प्रसार नेटवर्क,दुर्भावनायुक्त सायबर हालचाली आणि विदेशी कामगार यांचा उत्तर कोरियाकडून केल्या जाणाऱ्या वापराबाबत आम्ही गंभीर चिंता व्यक्त करत आहोत.यासंदर्भात,उत्तर कोरियाला शस्त्रास्त्रे आणि संबंधित सामग्री हस्तांतरण मनाई  किंवा उत्तर कोरियाकडून याची खरेदी करायला मनाई यासह संबंधित युएनएससीआरशी बांधिलकी राखण्याचे आवाहन आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्यांना करत आहोत. उत्तर कोरिया समवेत लष्करी सहकार्य अधिक दृढ करणाऱ्या देशांबाबत आम्ही तीव्र चिंता व्यक्त करत आहोत हे सहकार्य जागतिक  अण्वस्त्र प्रसारबंदी व्यवस्थेला थेट कमकुवत करत आहे. उत्तर कोरियाशी संबंधित युएनएससीआर निर्बंधांच्या  उल्लंघनावर  देखरेख ठेवणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या  तज्ञ पॅनेलच्या जनादेशाचे  वर नूतनीकरण करण्यात आले नाही  म्हणून संबंधित युएनएससीआरच्या सातत्यपूर्ण अंमलबजावणी प्रति आमच्या कटिबद्धतेचा  आम्ही पुनरुच्चार करतो, जी पूर्णपणे लागू आहे. अपहरण मुद्यावर तातडीने तोडगा काढण्याच्या आवश्यकतेचा आम्ही पुनरुच्चार करतो.

राखीन राज्यासहित म्यानमार मधल्या बिघडत चाललेल्या राजकीय,सुरक्षा आणि मानवतावादी परिस्थितीबाबत आम्ही अतिशय चिंतीत आहोत आणि हिंसाचार तातडीने थांबवण्याचे, अन्यायकारक आणि मनमानी पद्धतीने ताब्यात घेतलेल्या सर्वाना ताबडतोब  मुक्त करण्याचे, सुरक्षित आणि विना अडथळा मानवी सहाय्य पोहोच , सर्व संबंधितांमध्ये ठोस आणि समावेशक चर्चेद्वारे संकटावर तोडगा आणि समावेशक लोकशाहीच्या मार्गावर परतण्याचे आवाहन आम्ही पुन्हा  करत आहोत.  आसियान अध्यक्ष आणि म्यानमार बाबत आसियान अध्यक्षांचे विशेष दूत यांच्या कार्यासह आसियान – नेतृत्वाखालील प्रयत्नांना आम्ही आमच्या भक्कम पाठिंब्याची पुष्टी करतो. आसियान पंचसूत्री मतैक्याअंतर्गत सर्व वचनबद्धतांच्या संपूर्ण अंमलबजावणीचे  आवाहन आम्ही करतो.  सध्या सुरु असलेला संघर्ष आणि  अस्थिरतेमुळे सायबर गुन्हे,अवैध अंमली पदार्थ व्यापार,मानव तस्करी यासारख्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांमध्ये वाढ यासह  गंभीर परिणाम या प्रदेशावर होत आहेत. जेट इंधनासह शस्त्रास्त्रांचा  आणि दुहेरी वापराच्या सामग्रीचा ओघ रोखण्याच्या आमच्या आवाहनाचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत.म्यानमारच्या जनतेप्रति आमचे समर्थन दृढ असून सर्व संबंधितांशी  ठोस आणि  व्यावहारिक मार्गाने काम जारी ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जेणेकरून म्यानमारच्या लोकांच्या नेतृत्वा खाली एका अशा प्रक्रियेत संकटावर  शाश्वत तोडगा काढता येईल आणि म्यानमार लोकशाहीच्या मार्गावर परतेल.

बाह्य अंतराळाचा सुरक्षित, शांततापूर्ण, दायित्वपूर्ण आणि शाश्वत वापरासाठी योगदान देण्याचे आवाहन आम्ही सर्व राष्ट्रांना करत आहोत. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि पारदर्शकता वाढवण्यासह  सर्व राष्ट्रांसाठी,बाह्य अंतराळाची सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशासह विश्वास  बांधणी उपायांसाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. बाह्य अंतराळ करार आणि बाह्य अंतराळ उपक्रमांसाठी सध्याची  आंतरराष्ट्रीय कायदा चौकट कायम राखण्याच्या महत्वाची आम्ही पुष्टी करतो.तसेच करारातल्या  सर्व राष्ट्रांनी   पृथ्वीच्या  कक्षेत आण्विक शस्त्र किंवा सामूहिक विनाशकारक असणारे कोणत्याही प्रकारचे शस्त्र स्थापित न करण्याचे तसेच अशी शस्त्रे आकाशीय पिंडामध्ये किंवा बाह्य अंतराळात इतर कोणत्याही प्रकारे स्थापित न करण्यासंदर्भात राष्ट्रांच्या दायीत्वाची  पुष्टी करतो. 

क्वाडने माध्यम स्वातंत्र्याला समर्थन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये  विश्वासाला सुरुंग लावत मतभेदाचे  बीज पेरणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीसह विदेशी माहिती हेराफेरी आणि हस्तक्षेप यांची दखल घेण्यासाठी अशा माहितीविरोधातल्या आपल्या  कृती गटाच्या माध्यमातून लवचिक माहिती वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या आपल्या कटिबद्धतेला पुष्टी दिली आहे. अशा प्रयुक्त्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हितामध्ये ढवळाढवळ करण्याच्या उद्देशाने केल्या जातात याची आम्ही नोंद घेतली असून आमच्या प्रादेशिक भागीदारांसमवेत आमचे  सामुहिक तज्ञआणि प्रतिसाद देण्याच्या क्षमतेचा लाभ घेण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.आंतरराष्ट्रीय मानव हक्क कायद्यांचा आदर,नागरी समाज बळकटीकरण,माध्यम स्वातंत्र्याला समर्थन,तंत्रज्ञानाच्या आधारे लिंगाधारित हिंसाचारासह ऑनलाईन छळ आणि दुर्व्यवहार यांवर उपाय आणि अनैतिक प्रथांना शह देणे यासाठीच्या आपल्या कटिबद्धतेची आम्ही पुष्टी करत आहोत.

सीमापार दहशतवादासह  कोणत्याही स्वरूपातला दहशतवाद  आणि हिंसक कट्टरतावाद  यांचा आम्ही स्पष्टपणे निषेध करतो.दहशतवादी कारणांसाठी नव्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा उपयोग करत निर्माण केलेल्या धोक्यासह दहशतवाद  आणि हिंसक कट्टरतावाद रोखण्यासाठी,शोधण्यासाठी आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमच्या प्रादेशिक भागीदारासमवेत आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरत काम करण्यासाठी तसेच  आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.अशा दहशतवादी हल्ल्यांच्या सूत्रधारासाठी जबाबदारी निश्चित करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.मुंबईवरच्या 26/11 चा हल्ला, पठाणकोट हल्ल्यासह दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधाचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि  संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषद 1267 निर्बंध समिती द्वारा योग्य पदनामांचा  पाठपुरावा जारी ठेवण्यासाठी आमच्या कटिबद्धतेचा  पुनरुच्चार करतो.

दहशतवादाला आळा घालण्यासाठी पहिल्या क्वाड कृती गटात झालेल्या भरीव चर्चेचे आणि गेल्या वर्षी होनोलुलू इथे झालेल्या चौथ्या टेबलटॉप अभ्यासाचे आम्ही स्वागत करतो आणि नोव्हेंबर 2024 मध्ये जपानच्या यजमानपदाखाली होणाऱ्या पुढच्या बैठकीची आणि टेबलटॉप अभ्यासाची प्रतिक्षा करतो.

मध्य पूर्वेमध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यात आम्हाला रुची आहे.7 ऑक्टोबर 2023   मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही  स्पष्टपणे निषेध करतो. गाझामधली मोठ्या प्रमाणातली नागरी जीवितहानी आणि मानव  संकट अस्वीकारार्ह आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या सर्वांची सुटका सुनिश्चित करणे अनिवार्य असल्याची आम्ही पुष्टी करत आहोत आणि ओलिसांची सुटका  गाझामध्ये तातडीने आणि प्रदीर्घ युद्धविराम आणेल यावर आम्ही भर देत आहोत. संपूर्ण गाझामध्ये जीवन रक्षक मानवी सहाय्य लक्षणीयरीत्या वाढवण्याची तातडीची आवश्यकता त्याचबरोबर प्रादेशिक तणाव रोखण्याची तातडीची आवश्यकता आम्ही अधोरेखित करतो. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यासह आंतरराष्ट्रीय कायद्याचे अनुपालन करण्याचे आवाहन आम्ही सर्व पक्षांना करतो. UNSCR S/RES/2735 (2024) चे आम्ही स्वागत करतो आणि सर्व ओलिसांच्या सुटकेसाठी आणि तातडीच्या युद्धविरामाच्या दिशेने तात्काळ आणि सातत्यपूर्ण काम करण्याचे संबंधित पक्षांना आवाहन करतो. सहाय्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी आणि नागरिकांना जलद, सुरक्षित आणि विनाअडथळा मानवी सहाय्य सुलभ होण्यासाठी सर्व पक्षांनी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.तिथे असलेल्या तीव्र मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी हिंद-प्रशांत क्षेत्रासह इतर देशांनी आपले सहाय्य वाढवण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. गाझाची पुनर्बांधणी  आणि भविष्य पुनर्प्राप्ती यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचे सहाय्य आम्ही अधोरेखित करतो. द्वि- राष्ट्र  तोडग्याचा भाग म्हणून इस्रायलच्या वैध सुरक्षा चिंतांची दखल घेत  सार्वभौम,व्यवहार्य आणि स्वतंत्र पॅलेस्टाईन   देशासाठी आम्ही कटीबद्ध आहोत जो  इस्रायली आणि पॅलेस्टीनीना न्याय्य,स्थायी, सुरक्षित आणि शांततामय जीवनासाठी  सक्षम करतो. द्वि - राष्ट्र  तोडग्याचे भविष्य डळमळीत करणारी  कोणतीही एकतर्फी कृती ज्यामध्ये इस्रायली वस्तींचा विस्तार आणि सर्व पक्षांच्या हिंसक कट्टरता वादाचा समावेश आहे, अशी कृती संपुष्टात आणली पाहिजे. संघर्ष वाढण्यापासून  आणि प्रदेशामध्ये  पसरण्यापासून  रोखण्याची गरज आम्ही अधोरेखित करतो.

तांबडा समुद्र आणि एडनच्या आखातातून  प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि  वाणिज्यिक जहाजांवर हुती आणि त्यांच्या समर्थकांकडून होणाऱ्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. हे हल्ले प्रदेशात अस्थिरता निर्माण करत असून नेव्हिगेशनल अधिकार आणि स्वातंत्र्य आणि व्यापारी ओघ यामध्ये अडथळे आणण्याबरोबरच जहाजावरचे खलाशी आणि इतर कर्मचाऱ्यांसह जहाजाची सुरक्षा धोक्यात आणत आहेत.

2030 अजेंडाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्याची शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी ) साध्य करण्याप्रति  आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो. अशा निवडक  उद्दिष्टांचा संक्षिप्त गट करत त्याला प्राधान्य न देता  समावेशक पद्धतीने एसडीजी साध्य करण्याचे महत्व आम्ही अधोरेखित करत आहोत आणि त्याच्या अंमलबजावणी मध्ये देशांना सहाय्य करण्यात संयुक्त राष्ट्रांची  मध्यवर्ती भूमिका असल्याची पुष्टी करत आहोत. सहा वर्ष बाकी असून शाश्वत विकासासाठीच्या 2030 च्या  अजेंड्याच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी आणि सर्व एसडीजीची समावेशक पद्धतीने म्हणजेच आर्थिक,सामाजिक आणि पर्यावरण या तीन पैलूंमध्ये  समतोल राखत प्रगतीला वेग देण्याकरिता आम्ही कटीबद्ध आहोत. जागतिक आरोग्यापासून ते  ते शाश्वत विकास आणि हवामान बदलापर्यंत या सर्व आव्हानांमध्ये सर्व संबंधीताना योगदान देण्याची संधी मिळते तेव्हाच जागतिक समुदायाचा लाभ होतो. महिला,शांतता आणि सुरक्षितता (डब्ल्यूपीएस ) अजेंड्याप्रति योगदान आणि अंमलबजावणी  तसेच लिंगभाव समानता आणि सर्व महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठीच्या आमच्या कटिबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत. भविष्यविषयक परिषदेसह  शाश्वत विकासाच्या प्रगतीबाबत आशयघन चर्चेत सहभागी होण्याप्रति आमची वचनबद्धता आम्ही अधोरेखित करत आहोत.सुरक्षित जग जिथे मानवी अधिकार आणि मानवाची प्रतिष्ठा जपली जाते जी एसडीजीच्या ‘कोणीही मागे राहता कामा नये’ या मध्यवर्ती तत्वावर आधारीत असलेले जग साकारण्याचे क्वाडने जारी ठेवले आहे.   आम्ही, क्वाड नेते,आमचे भविष्य घडवण्यासाठी आणि ज्यामध्ये आम्हाला राहायचे आहे अशा प्रदेशाला आकार देण्यासाठी हिंद-प्रशांत देशांसमवेत भागीदारीने काम करण्यासाठी समर्पित राहू.

हिंद-प्रशांत साठी स्थायी भागीदार

गेल्या चार वर्षात क्वाड नेते सहा वेळा भेटले त्यापैकी दोन भेटी दूरस्थ पद्धतीने झाल्या.गेल्या पाच वर्षात क्वाड परराष्ट्र व्यवहार मंत्री आठ वेळा भेटले.क्वाड राष्ट्र प्रतिनिधी नियमितपणे सर्व स्तरावर भेटतात,यामध्ये चार देशांच्या व्यापक राजनैतिक नेटवर्कमध्ये  राजदुतांसह, परस्परांशी चर्चा करण्यासाठी, सामायिक  प्राधान्यांवर  प्रगतीसाठी विचारांचे आदान-प्रदान आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात भागीदारांसह आणि त्यांच्यासाठी लाभ पोहोचवण्यासाठी भेटतात.येत्या महिन्यांमध्ये प्रथमच भेटण्याची तयारी करणाऱ्या आमच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचे आम्ही स्वागत करतो.हिंद-प्रशांत क्षेत्रात या चार देशांकडून भविष्यातल्या गुंतवणुकीच्या शक्यता आजमावण्यासाठी भेटण्याचा निर्णय घेणाऱ्या आपल्या वित्त विकास संस्थाच्या नेत्यांचेही  आम्ही स्वागत करतो.एकंदरीत आपले चार देश अभूतपूर्व प्रमाण आणि  वेगाने सहकार्य करीत आहेत.

आमच्यापैकी प्रत्येक सरकारने,स्थायी प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी हिंद-प्रशांत क्षेत्रात क्वाड प्राधान्यांकरिता  भक्कम वित्तपुरवठ्यासाठी    आपल्या संबंधित अर्थसंकल्पीय प्रक्रियेद्वारे काम करण्यासाठी प्रतिबद्धता दर्शवली आहे. आंतरसंसदीय आदान-प्रदान करण्यासाठी

आणि इतर संबंधितानीही क्वाड समकक्षांसमवेत संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने आम्ही आपल्या विधानमंडळांसमवेत काम करू इच्छितो.

2025 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी आणि भारताच्या यजमानपदाखाली 2025 मध्ये होणाऱ्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. क्वाडचे अस्तित्व सदैव राहील.

***

S.Patil/S.Kane/N.Chitale/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2059765) Visitor Counter : 145