पर्यटन मंत्रालय
पर्यटन मंत्रालयाने पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी उपक्रमांचा केला आरंभ - जबाबदार पर्यटनासाठी राष्ट्रीय उपक्रम
Posted On:
27 SEP 2024 7:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2024
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 27 सप्टेंबर रोजी, जागतिक पर्यटन दिनी ‘पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी’ या नावाने राष्ट्रीय जबाबदार पर्यटन उपक्रम सुरू केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार पर्यटनाच्या माध्यमातून सामाजिक समावेश, रोजगार आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने ओरछा (मध्य प्रदेश), गंडीकोटा (आंध्र प्रदेश), बोधगया (बिहार), ऐझॉल (मिझोरम), जोधपूर (राजस्थान), आणि श्री विजया पुरम (अंदमान आणि निकोबार बेटे) या भारतातील 6 पर्यटन स्थळांमध्ये पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यटकांना त्या त्या पर्यटन स्थळांचे स्थानिक निवासी असलेले राजदूत आणि कथा सांगणाऱ्या पर्यटनस्नेही लोकांच्या भेटीतून पर्यटनस्थळाचा परिपूर्ण अनुभव घेता येईल, असा पर्यटन मंत्रालयाचा उद्देश आहे. यासाठी पर्यटनस्थळी पर्यटकांच्या संपर्कात येणाऱ्या आणि त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्या, संवाद साधणाऱ्या सर्व लोकांना पर्यटनाशी निगडित प्रशिक्षण देऊन जनजागृती केली जाणार आहे.
अतिथी देवो भव या तत्वाप्रमाणे कारचालक, रिक्षाचालक, रेल्वे स्थानकातील कर्मचारी, विमानतळ, बस स्थानके, हॉटेल कर्मचारी, रेस्टॉरंटमधील कामगार, होमस्टे मालक, पर्यटक मार्गदर्शक, पोलीस कर्मचारी, पदपथ विक्रेते, दुकानदार, विद्यार्थी आणि अशा अनेक जणांना पर्यटनाचे महत्व, सर्वसाधारण स्वच्छता, शाश्वतता आणि पर्यटकांप्रति अतिशय उच्च दर्जाची आदरातिथ्याची भावना व्यक्त करणे आणि त्यांची काळजी घेणे इत्यादींचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात जनजागृती केली जाणार आहे.
'पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी' या उपक्रमाच्या माध्यमातून विशेषतः महिला आणि युवक युवतींना पर्यटनविषयक नवीन उत्पादने तसेच हेरिटेज वॉक, खाद्यपदार्थ टूर्स, हस्तकला टूर, निसर्ग ट्रेक, होमस्टे असे अनुभव आणि त्या त्या पर्यटनस्थळाशी निगडित इतर नाविन्यपूर्ण पर्यटन उत्पादने विकसित करण्याच्या उद्देशाने सक्षम करण्यासाठी प्रशिक्षणावर विशेष भर दिला जात आहे.
पर्यटन केंद्रित प्रशिक्षणाच्या बरोबरीने डिजिटल साक्षरता आणि डिजिटल उपकरणांबाबत देखील एक सर्वसाधारण प्रशिक्षण दिले जात आहे.
यावर्षी 15 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा आरंभ झाल्यापासून पर्यटन मित्र म्हणून आतापर्यंत सुमारे 3,000 जणांनी सहा पर्यटन स्थळांमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.
प्रभाव
पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी या प्रयत्नांमुळे पर्यटनविषयक प्रशिक्षणाचा एक भाग म्ह्णून आणि पर्यटन परिसंस्थेचा एक घटक म्हणून स्थानिक लोकांचा पर्यटनाविषयीचा उत्साह वाढीला लागला आहे.
जागतिक पर्यटन दिनी, पर्यटन मंत्रालयाने आज देशातील खालील 50 पर्यटन स्थळांवर पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी उपक्रमाचा आरंभ केला आहे.
State/Union Territory
|
Destination 1
|
Destination 2
|
Andaman & Nicobar Islands
|
Sri Vijaya Puram
|
|
Andhra Pradesh
|
Gandikota
|
Tirupati
|
Arunachal Pradesh
|
Tawang
|
|
Assam
|
Guwahati
|
|
Bihar
|
Bodhgaya
|
Nalanda
|
Chandigarh
|
Chandigarh
|
|
Chhattisgarh
|
Raipur
|
|
Dadra & Nagar Haveli and Daman & Diu
|
Daman
|
|
Delhi
|
Delhi
|
|
Goa
|
Goa
|
|
Gujarat
|
Ahmedabad
|
Kevadia
|
Haryana
|
Kurukshetra
|
|
Himachal Pradesh
|
Shimla
|
|
Jammu & Kashmir
|
Srinagar
|
|
Jharkhand
|
Ranchi
|
|
Karnataka
|
Hampi
|
Mysore
|
Kerala
|
Thiruvananthapuram
|
Kochi
|
Ladakh
|
Leh
|
|
Lakshadweep
|
Kavaratti
|
|
Madhya Pradesh
|
Orchha
|
Ujjain
|
Maharashtra
|
Aurangabad
|
Nasik
|
Manipur
|
Imphal
|
|
Meghalaya
|
Shillong
|
|
Mizoram
|
Aizawl
|
|
Nagaland
|
Dimapur
|
|
Odisha
|
Puri
|
|
Puducherry
|
Puducherry
|
|
Punjab
|
Amritsar
|
Patiala
|
Rajasthan
|
Jodhpur
|
Jaipur
|
Sikkim
|
Gangtok
|
|
Tamil Nadu
|
Mahabalipuram
|
Thanjavur
|
Tripura
|
Agartala
|
|
Telangana
|
Hyderabad
|
|
Uttar Pradesh
|
Varanasi
|
Agra
|
Uttar Pradesh
|
Ayodhya
|
|
Uttarakhand
|
Haridwar
|
Rishikesh
|
West Bengal
|
Darjeeling
|
Kolkata
|
* * *
S.Kakade/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2059631)
Visitor Counter : 47