गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

अमेरिकेचा तीन-दिवसीय दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले अभिनंदन


क्वाड शिखर परिषद, ‘मोदी व यूएस’ महा सामुदायिक कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्रांची भविष्याचा वेध घेणारी शिखर परिषद या कार्यक्रमांनी घडवले पंतप्रधान मोदी यांच्या जागतिक स्तरावरील अतुलनीय लोकप्रियतेचे दर्शन

Posted On: 24 SEP 2024 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2024

 

केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेचा तीन-दिवसीय दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

X वरील आपल्या  संदेशात अमित शाह म्हणाले, “अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी जी अमेरिकेच्या तीन-दिवसीय दौऱ्याच्या यशस्वी पूर्ततेबद्दल.  गेल्या 10 वर्षांत भारताला शाश्वत विकासाच्या उदाहरणांमार्फत जागतिक परिवर्तनकाराच्या भूमिकेत पुढे नेणारी मोदी यांची मुत्सद्दी तत्त्वप्रणाली या दौऱ्यामुळे अधिक भक्कम झाली आहे. यशस्वी क्वाड शिखर परिषद, ‘मोदी व यूएस’ महा सामुदायिक  कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्रांची भविष्याचा वेध घेणारी शिखर परिषद या कार्यक्रमांनी पंतप्रधान मोदी यांच्या जागतिक स्तरावरील अतुलनीय लोकप्रियतेचे दर्शन घडवले आहे. मोदी यांच्या  नेतृत्वाने भारताची राष्ट्र म्हणून प्रतिमा उंचावली आणि ज्यांचे विचार प्रत्येकजण मानू  लागला इतकेच नव्हे तर मानवतेच्या उत्थानात भागीदार  राष्ट्र म्हणून  प्रत्येक देश स्वीकार करत  आहे.”

 

* * *

N.Chitale/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2058411) Visitor Counter : 16