पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा विकास आणि व्यावहारिक उपयोगाकरता क्वाडची तत्त्वे

Posted On: 21 SEP 2024 11:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 सप्‍टेंबर 2024

 

1.आम्ही क्वाडचे सदस्य, हे जाहीर करतो की समाजाचे समूळ रूपांतरण करण्याची क्षमता डिजिटल तंत्रज्ञान आणि प्रणालीत आहे तसेच शाश्वत विकासाच्या दृष्टीने आखलेली संयुक्त राष्ट्रांची 2030 विषयपत्रिका आणि त्याच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या ध्येयाला गती देण्यासाठी अभूतपूर्व संधी उपलब्ध आहेत. डिजिटलायझेशनच्या संभाव्यतेचे लाभ स्विकारताना आम्ही आपली सामायिक समृद्धी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी समावेशक, खुली, शाश्वत, न्याय्य, सुरक्षित, विश्वासार्ह आणि संरक्षित डिजिटल भविष्याचे महत्त्व देखील अधोरेखित करतो.

2. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राद्वारे समतल प्रवेश सुकर करण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक सेवा वितरण सुधारण्यासाठी निर्माण केलेल्या आणि याचा लाभ घेतलेल्या तसेच विकास, समावेश, सृजनशीलता, विश्वास आणि स्पर्धा तसेच मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्यांचा आदर राखत समान पातळीवर कामकाज आणि निष्पक्ष स्पर्धा प्रदान करण्याच्या हेतूने लागू केलेल्या कायदेशीर चौकटीत राहून आणि नियमांचे सक्षमीकरण करून उचित कारभार करण्याच्या उद्देशाने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) ही विकसित होत असलेली एक संकल्पना असून ती सुरक्षित, विश्वासार्ह आणि आंतर कार्यान्वयन असलेल्या सामायिक डिजिटल प्रणालींचा संच आहे. मानवी हक्क आणि मुलभूत स्वातंत्र्याचा आदर राखून तसेच आमच्या लोकशाही तत्त्वांचे समर्थन करणाऱ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी मूलभूत स्वातंत्र्य आणि मजबूत सायबर सुरक्षा उपाय दोन्ही आवश्यक आहेत. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा व्यावहारिक वापर करणाऱ्या सरकारांनी सर्व डिजिटल विभाजनांचे  उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत.

3. यासाठी, आम्ही डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि व्यावहारिक वापर करण्यासाठी खालील तत्वे जाहीर करीत आहोत:-

  1. समावेशकता: आर्थिक, तांत्रिक किंवा सामाजिक अडथळे दूर किंवा कमी करत समावेशन सक्षम करणे, अंतिम वापरकर्त्यांचे सबलीकरण, शेवटच्या घटकापर्यंत सुकर प्रवेश आणि दोषयुक्त पूर्वग्रह टाळा.
  2. आंतर कार्यान्वयन: योग्य सुरक्षिततेची तजवीज करताना तसेच कायदेशीर बाबी आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन शक्य असेल तिथे तंत्रज्ञानाच्या तटस्थ दृष्टिकोनासह खुली मानके आणि वैशिष्ट्यांचा वापर करून आणि बांधणी करून आंतर कार्यान्वयन सक्षम करा.
  3. एकरूपता आणि विस्तारीकरण : विस्तारीकरण म्हणजे बांधणी किंवा एकरूपता असलेल्या कार्यशैलीतील बदल/परिवर्तन अवाजवी व्यत्ययाशिवाय सामावून घेणे.
  4. प्रमाणता: मागणीत कोणतीही अनपेक्षित वाढ सहजतेने सामावून घेण्यासाठी आणि/किंवा विद्यमान प्रणाली न बदलता विस्तार आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लवचिक आराखडा वापरा.
  5. सुरक्षा आणि गोपनीयता: वैयक्तिक गोपनीयता, संकलित माहितीचे संरक्षण आणि सुरक्षेचे उचित स्तर प्रदान करणाऱ्या मानकांवर आधारित लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी मुख्य आराखड्यात गोपनीयता वर्धित करणारे तंत्रज्ञान आणि सुरक्षा वैशिष्ट्ये अंतर्भूत करणारा दृष्टिकोन स्वीकारा.
  6. सहयोग: मोकळेपणा आणि सहयोगाची संस्कृती सुलभ करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी नियोजन, रचना, बांधणी आणि संचालनाच्या विविध टप्प्यांवर समुदाय कलाकारांच्या सहभागास उत्तेजन द्या. वापरकर्ता-केंद्रित उपायांचा विकास सक्षम करा आणि व्यापक आणि शाश्वत अवलंबन सुलभ करा आणि नवनिर्मात्यांना नवीन सेवा विकसित करण्यास अनुमती द्या.
  7. सार्वजनिक लाभ, विश्वास आणि पारदर्शकतेसाठी शासन: विद्यमान संरचनेचा आदर करताना सार्वजनिक लाभ, विश्वास आणि पारदर्शकता वाढवा. याचा अर्थ कायदे, नियम, धोरणे आणि क्षमतांनी या प्रणाली सुरक्षित, संरक्षित, विश्वासार्ह आणि पारदर्शकपणे शासित आहेत याची खात्री करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि स्पर्धा तसेच समावेशाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि संकलित माहितीचे संरक्षण आणि गोपनीयतेच्या तत्त्वांचे पालन केले पाहिजे.
  8. तक्रार निवारण: तक्रार निवारणासाठी सुलभ आणि पारदर्शक यंत्रणा स्थापित करा, उदा. वापरकर्ता परिभाषा, प्रक्रिया, जबाबदार संस्था, निराकरणासाठी कृतींवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा.
  9. टिकाऊपणा: अखंडित क्रियान्वयन आणि अखंड वापरकर्ता-केंद्रित सेवा वितरण सुलभ करण्यासाठी पुरेसा वित्तपुरवठा आणि तांत्रिक समर्थन आणि सुधारणांच्या माध्यमातून  टिकाऊपणा सुनिश्चित करा.
  10. मानवी हक्क: नियोजन, रचना, बांधकाम आणि संचालनाच्या प्रत्येक टप्प्यावर मानवी हक्कांचा आदर राखणाऱ्या दृष्टिकोनाचा स्विकार करा.
  11. बौद्धिक संपदा संरक्षण: सध्याच्या कायदेशीर चौकटींवर आधारित तंत्रज्ञान आणि इतर सामग्रीच्या हक्क धारकांना बौद्धिक संपदा अधिकारांचे पुरेसे आणि प्रभावी संरक्षण आणि अंमलबजावणीचे अधिकार प्रदान करा.
  12. शाश्वत विकास: शाश्वत विकासासाठी 2030 विषयपत्रिका आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योगदान देणाऱ्या या प्रणाली विकसित करण्याचा आणि वापरात आणण्याचा प्रयत्न करा.

 

* * *

H.Akude/S.Naik/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2057515) Visitor Counter : 31