गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी छत्तीसगढ मधील नक्षलवाद हिंसाचारातील पीडितांशी साधला संवाद


नक्षलवाद हा मानवता आणि देशाची अंतर्गत सुरक्षा या दोन्हींसाठी मोठा धोका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध

नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आवाहन

Posted On: 20 SEP 2024 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2024

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी छत्तीसगढ मधील नक्षलवादी हिंसाचारातील पीडितांशी संवाद साधला.यामध्ये बस्तर शांतता समितीच्या अंतर्गत छत्तीसगढ मधील नक्षलप्रभावित भागात नक्षली हिंसाचारामुळे बाधित 55 जणांचा समावेश होता.

यावेळी काही पीडितांनी आपली व्यथा गृहमंत्र्यांना सांगितली.

नक्षलवादी हिंसाचारातील पीडितांशी संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध आहे.मोदी सरकारच्या धोरणांमुळे आता डाव्या विचारसरणीचा नक्षलवाद केवळ छत्तीसगढ मधील काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहिला आहे, नक्षलवाद हा मानवता आणि देशाची अंतर्गत सुरक्षा या दोन्हींसाठी मोठा धोका आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार आणि छत्तीसगढ सरकार येत्या तीन महिन्यांमध्ये  नक्षल प्रभावित झालेल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सर्वसमावेशक योजना आणणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. या योजनेमुळे, देशभरात नक्षलवादाने प्रभावित झालेल्या लोकांना आरोग्यसेवा सुविधा, रोजगाराच्या संधी आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकेल, असे ते म्हणाले.

नक्षलवाद्यांच्या मानवाधिकारांबाबत बोलणाऱ्यांनी नक्षलवादामुळे त्रस्त झालेल्यांच्या मानवाधिकारांचाही विचार करावा, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले.

 
N.chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2057007) Visitor Counter : 46