माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालय विशेष अभियान 4.0 मध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज होत आहे
अभियानात 2 ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीत स्वच्छतेत सुधारणा आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार
Posted On:
19 SEP 2024 9:31AM by PIB Mumbai
स्वच्छतेला संस्थात्मक रूप देण्याच्या आणि सरकारमधील प्रलंबितपणा कमी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून प्रेरणा घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आपल्या क्षेत्रीय कार्यालयांसह 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीत विशेष अभियान 4.0 मध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज होत आहे. या अंतर्गत अधिक चांगल्या पद्धतीने जागा व्यवस्थापन, प्रलंबित बाबींचा निपटारा, स्वच्छता संस्थात्मक करणे यासाठीच्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यावर आणि संज्ञापनाच्या विविध माध्यमातून जागरूकता निर्माण करणे यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी 6 सप्टेंबर 2024 रोजी प्रलंबित बाबींचा निपटारा आणि स्वच्छता यासाठी विशेष अभियान 4.0 राबविण्याच्या प्रगतीबाबत सर्व माध्यम प्रमुखांसह आढावा बैठक घेतली. संपूर्ण सरकार दृष्टिकोनासह विविध कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्याबाबतही चर्चा झाली.
विशेष अभियान 3.0
विशेष अभियान 3.0 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला मोठे यश मिळाले. एकूण 1013 बाह्य मोहिमा राबविण्यात आल्या आणि 1972 जागा शोधून त्यांची स्वच्छता करण्यात आली. 28,574 फायली निकाली काढण्यात आल्या. 2.01 लाख किलो भंगाराची विल्हेवाट लावण्यात आली आणि 3.62 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. मंत्रालयाने CPGRAMS म्हणजेच केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीअंतर्गत सार्वजनिक तक्रारी आणि सार्वजनिक तक्रार अपीलांचे निराकरण करण्याचे 100% लक्ष्य साध्य केले आहे.
नोव्हेंबर 2023 ते ऑगस्ट 2024 या कालावधीतील कामगिरी
या कालावधीत मंत्रालयाने स्वच्छता संस्थात्मकीकरणाचा आणि प्रलंबित बाबींचा निपटारा करण्याचा वेग कायम ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
या कालावधीतील महत्त्वपूर्ण कामगिरी पुढीलप्रमाणे आहे :
- भंगाराच्या विल्हेवाटीतून 1.76 कोटीरुपये महसूल प्राप्त
- 1.47 लाख किलो भंगाराची विल्हेवाट
- 18,520 फायली काढून टाकण्यात आल्या
- 110 वाहने बाद करण्यात आली
- 2,422 ठिकाणे स्वच्छ करण्यात आली
- 33,546 चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली
- एकूण 1,345 बाह्य मोहिमा राबविण्यात आल्या
- 3,044 सार्वजनिक तक्रारी आणि 737 अपील निकाली काढण्यात आल्या
***
SonalT/SonaliK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2056594)
Visitor Counter : 54
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam