पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी वाढदिवसा निमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पंतप्रधानांनी मानले आभार
Posted On:
17 SEP 2024 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
राष्ट्रपतींना दिलेल्या उत्तरात पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“आदरणीय @rashtrapatibhvn जी, आपल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी आपले प्रेरणादायी मार्गदर्शन खूप प्रोत्साहन देणारे आहे. देश आणि देशवासियांप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडण्यात आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही.”
उपराष्ट्रपतींना दिलेल्या उत्तरात पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी कृतज्ञ आहे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड जी. आपले मार्गदर्शन आणि विविध विषयांवरील दृष्टीकोन देखील मला भावतो.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले आहेत. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ही आपुलकी मला लोकांसाठी अधिक परिश्रम करण्याचे मोठे बळ देते.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे:
“जनतेचा हा स्नेह विनम्रतेने स्वीकारताना सन्मानित झालो आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. ही आपुलकी मला लोकांसाठी अधिक परिश्रम करण्याचे मोठे बळ देते.
आज आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण होण्याचा दिवसही आहे. गेले 100 दिवस लोकाभिमुख आणि विकासाभिमुख निर्णयांच्या मालिकेने परिपूर्ण राहिले, याचा मला आनंद वाटतो, जे विकसित भारत निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ देईल.
आज अनेक जणांनी सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. त्यांच्या उर्जेला मी सलाम करतो, आणि त्यांच्या या प्रयत्नांची प्रशंसा करतो.”
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055837)
Visitor Counter : 56
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam