माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“ई-सिनेप्रमाणमध्ये सुलभता मानक मॉड्युल यशस्वीरित्या समाविष्ट करण्यात आले”
श्रवणदोष आणि दृष्टीदोष असलेल्यांना किमान एक वापरसुलभता सुविधा फीचर फिल्म्स उपलब्ध करून देणार
Posted On:
16 SEP 2024 4:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024
ई-सिनेप्रमाणमध्ये सुलभता मानक मॉड्युल निर्धारित म्हणजे 15 सप्टेंबर 2024 या कालमर्यादेनुसार यशस्वीरित्या समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे आता अर्जदार त्यांचे चित्रपट विहीत केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार श्रवणदोष आणि दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना सुलभता देणाऱ्या वैशिष्ट्यांसह अर्ज करू शकतात/सादर करू शकतात. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी 15 सप्टेंबर 2024 ही तारीख निश्चित केली होती.
नवी मार्गदर्शक तत्वे आणि वाढीव सुलभता निकष
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींसाठी चित्रपट पाहण्याचा अनुभव अधिक समावेशक आणि सुलभ बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 15 मार्च 2024 रोजी एका कार्यालयीन आदेशाद्वारे मंत्रालयाने श्रवणदोष आणि दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींसाठी चित्रपटगृहात फीचर फिल्म्सचे प्रदर्शन करताना आवश्यक असलेल्या सुलभता मानकांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली होती.
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने(CBFC) चित्रपटगृहे/ थिएटर्समध्ये व्यावसायिक उद्देशाने चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी प्रमाणित केलेल्या चित्रपटांना ही मार्गदर्शक तत्वे लागू आहेत.
एकापेक्षा जास्त भाषांमध्ये प्रमाणित केल्या जाणार असलेल्या सर्व फीचर फिल्म्स*मध्ये श्रवणदोष आणि दृष्टीदोष असलेल्यांना प्रत्येकी एक वापरसुलभता सुविधा म्हणजेच क्लोज्ड कॅप्शनिंग/ ओपन कॅप्शनिंग आणि ऑडियो डिस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055382)
Visitor Counter : 51
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam