गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाचा पाठपुरावा करत,गृह मंत्रालयाने देशात सुरक्षित सायबर स्पेस निर्माण करण्याचा संकल्प केला आहे-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) देश सायबर सुरक्षित करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
सायबर-सुरक्षित भारत निर्माण करण्याच्या मोहिमेला गती देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचे दिलेल्या सक्रीय सहभागाबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी आभार मानले
Posted On:
11 SEP 2024 3:16PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाचा पाठपुरावा करत, केंद्रीय गृहमंत्रालयाने देशात सुरक्षित सायबर स्पेस निर्माण करण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केले आहे
आपल्या ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले,की भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. सायबर-सुरक्षित भारत निर्माण करण्याच्या मोहिमेला गती देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या सक्रीय योगदानाबद्दल त्यांचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी आभार मानले.
देशात आणि जगातील वाढती सायबर गुन्हेगारी ही चिंतेची बाब आहे, असे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की,गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र,सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अथक परिश्रम करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विनंतीवरून आपण या मोहिमेत सहभागी झालो असल्याचे, बच्चन यांनी सांगितले. देशाला या समस्येतून मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, असेही ते यावेळी म्हणाले.आपली थोडी सतर्कता आणि सावधगिरी आपल्याला सायबर गुन्हेगारांपासून वाचवू शकते.
**
S.Patil/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2053857)
Visitor Counter : 45
Read this release in:
Telugu
,
Khasi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam