पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अबुधाबीच्या युवराजांचे स्वागत


भारत-संयुक्त अरब अमिराती संबंध मजबूत करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी फलदायी चर्चा केली

Posted On: 09 SEP 2024 10:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत अबुधाबीचे युवराज शेख खालिद  बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे स्वागत केले. उभय  नेत्यांमध्ये विविध विषयांवर फलदायी चर्चा झाली.

भारत-यूएई मैत्री वृध्दिंगत करण्‍यासाठी युवराज शेख खालिद यांनी दाखवलेल्या उत्कटतेचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.

पंतप्रधानांनी समाज माध्‍यम ‘एक्स’वर पोस्ट केले;

“अबू धाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे स्वागत करताना आनंद झाला. आमची विविध विषयांवर फलदायी चर्चा झाली. भारत-यूएई  मैत्री मजबूत व्हावी याविषयी  त्यांना असलेली तळमळ स्पष्टपणे दिसून येते.”

N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2053317) Visitor Counter : 47