राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अमृत उद्यान उद्या केवळ शिक्षकांसाठी खुले असेल

Posted On: 04 SEP 2024 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2024

अमृत उद्यान शिक्षक दिनानिमित्त उद्या (5 सप्टेंबर, 2024) केवळ  सर्व शिक्षकांसाठी खुले असेल. नॉर्थ अव्हेन्यू रोड जवळ राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 35 मधून ते येऊ शकतात. त्यांच्या सोयीसाठी केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशन ते गेट क्रमांक 35 दरम्यान  मोफत शटल बस सेवा देखील उपलब्ध असेल.

अमृत उद्यान उन्हाळी वार्षिक आवृत्ती, 2024 सोमवार वगळता 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत , सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत (शेवटचा प्रवेश - 5:15 PM) जनतेसाठी  खुली आहे.

प्रवेश विनामूल्य आहे. राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर  (https://visit.rashtrapatibhavan.gov.in/) अभ्यागत त्यांचे स्लॉट ऑनलाइन आरक्षित  करू शकतात. वॉक-इन अभ्यागत गेट क्रमांक 35 च्या बाहेर ठेवलेल्या सेल्फ सर्व्हिस किऑस्कद्वारे स्वतःची नोंदणी करू शकतात.

आजपर्यंत, अमृत उद्यान उन्हाळी वार्षिक आवृत्ती, 2024 मध्ये 1.5 लाखांहून अधिक अभ्यागतांनी अमृत उद्यानाला भेट दिली आहे. या भेटीदरम्यान, अभ्यागतांना पर्यावरणाविषयी जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी एक सीड पेपर दिला जात आहे.

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2051940) Visitor Counter : 40