पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदर सेरी बेगवान येथील ओमर अली सैफुद्दीन मशिदीला दिली भेट

Posted On: 03 SEP 2024 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 सप्‍टेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंदर सेरी बेगवान येथील ओमर अली सैफुद्दीन मशिदीला भेट दिली.

ब्रुनेईचे धार्मिक व्यवहार मंत्री पेहीन दातो उस्ताज हाजी अवांग बदरुद्दीन यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. ब्रुनेईचे आरोग्य मंत्री दातो डॉ. हाजी मोहम्मद ईशाम हे देखील यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांना अभिवादन करण्यासाठी भारतीय समुदायाचे सदस्यही  यावेळी उपस्थित होते.

या मशिदीचे नाव ब्रुनेईचे 28 वे सुलतान ओमर अली सैफुद्दीन तिसरे (सध्याच्या सुलतानचे पिता, ज्यांनी त्याचे बांधकामही सुरू केले होते) यांच्या नावावरून ठेवले आहे आणि 1958 मध्ये तिचे बांधकाम पूर्ण झाले.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2051536) Visitor Counter : 58