पंतप्रधान कार्यालय
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीतल देवी आणि राकेश कुमार या खेळाडूंचे केले अभिनंदन.
प्रविष्टि तिथि:
02 SEP 2024 11:40PM by PIB Mumbai
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत मिश्र सांघिक कंपाऊंड खुल्या तिरंदाजीमध्ये कांस्य पदक जिंकून शीतल देवी आणि राकेश कुमार या खेळाडूंनी दाखवलेल्या सांघिक भावनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"सांघिक कामगिरीचा विजय!
मिश्र सांघिक कंपाऊंड खुल्या तिरंदाजीमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल शीतल देवी आणि राकेश कुमार यांचे अभिनंदन. त्यांनी उल्लेखनीय कौशल्य आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन केले. या पराक्रमामुळे संपूर्ण भारत आनंदी झाला आहे. #Cheer4Bharat"
***
JPS/S.Mukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2051178)
आगंतुक पटल : 98
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam