माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी "क्रिएट इन इंडिया चॅलेंज - सीझन 1" अंतर्गत वेव्हज् या कार्यक्रमासाठी 25 आव्हाने केली प्रसिद्ध
सर्जकांची अर्थव्यवस्था, आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि जीवनपद्धती दर्शविण्यासाठी एक अद्भुत साधन : अश्विनी वैष्णव
Posted On:
22 AUG 2024 9:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2024
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) साठी ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज- सीझन 1’ चा भाग म्हणून 25 आव्हाने प्रसिद्ध केली. आजचा कार्यक्रम आपल्या वाढत्या आणि विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब आहे, असे वैष्णव याप्रसंगी बोलताना म्हणाले. एक पूर्णपणे नवीन सर्जकांची अर्थव्यवस्था तयार केली गेली आहे. पंतप्रधानांनी देखील याची दखल घेतली आहे. याचे प्रतिबिंब मार्च 2024 मध्ये प्रदान केलेल्या पहिल्या-वहिल्या राष्ट्रीय सर्जक पुरस्कारामध्ये दिसून येते.
वाढती सर्जकांची अर्थव्यवस्था : संधी, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती
या अर्थव्यवस्थेतील अफाट क्षमतांवर प्रकाश टाकताना केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले की, सर्जकांची अर्थव्यवस्था ही आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा, जीवनशैली , योग, पारंपारिक औषध पद्धती तसेच आपल्या पाककृतींमधील वैविध्य दाखवण्याचे एक अद्भुत साधन बनले आहे. भारत सरकार या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही आणि म्हणूनच, आम्हाला या क्षेत्रातील प्रतिभा आणि कौशल्य विकास तसेच आवश्यक पायाभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असेही वैष्णव म्हणाले.
या सर्जक अर्थव्यवस्थेचा आणखी विकास करण्यासाठी, सरकार जागतिक दर्जाचे प्रतिभा विकास कार्यक्रम आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत आहे, असेही त्यांनी सांगितले.
चित्रपट निर्मितीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर: रोजगार निर्मिती
चित्रपट सृष्टी हे आपले बलस्थान आहे, असे प्रतिपादन करून अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले की, आजच्या युगात या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि साधने वापरण्यास मोठा वाव आहे, त्यामुळे रोजगार निर्मितीला चांगला वाव मिळू शकतो. हा कार्यक्रम जर यशस्वीरित्या अंमलात आला तर या क्षेत्रात 2-3 लाख रोजगार निर्माण होऊ शकतात, असा अंदाज असल्याचे ते म्हणाले
सामाजिक जबाबदारी
त्याचबरोबर या प्रवासात आपल्या समाजाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल आणि ही जबाबदारी केवळ सरकारची नाही तर समाज, उद्योग आणि आपल्या सर्वांची आहे, याचे स्मरणही केंद्रीय मंत्र्यांनी करून दिले.
या क्षेत्रातील अफाट क्षमतेचा फायदा घेण्यासाठी, ‘WAVES’ चे आयोजन केले जात आहे आणि भविष्यात आयोजन म्हणून नावारूपास येणार आहे, असेही ते म्हणाले.
'डिझाइन इन इंडिया, डिझाइन फॉर द वर्ल्ड'
यावेळी बोलतांना संजय जाजू यांनी नमूद केले की, भारतामधील सर्जनशील परिसंस्थेला बळ देण्यासाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी आम्ही सुरू केलेल्या मोहिमेमध्ये हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण असून तो मैलाचा दगड ठरणार आहे. ‘’ पंतप्रधानांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ‘डिझाईन इन इंडिया, डिझाइन फॉर द वर्ल्ड’ असे आवाहन केले होते. त्यांच्या या दूरदर्शी आवाहनाला ही मोहीम संरेखित केली आहे, ‘’ असे त्यांनी सांगितले. आपल्या राष्ट्रातील अफाट क्षमता आणि प्रतिभा अधोरेखित करून ते म्हणाले की, ‘WAVES’ या क्षमतेचा दाखला ठरणार आहे आणि एक जागतिक व्यासपीठ म्हणून काम करेल. त्यामध्ये जगभरातील तेजस्वी विचारांचे, बुदिधमान, सर्वात प्रतिभावंत निर्माते आणि दूरदर्शी नेते ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र येतील. विचारांची देवाणघेवाण करताना सर्जनशीलतेला सीमेचे बंधन असणार नाही, अमर्याद सर्जकतेने नवनिर्मिती केली जाईल.
'क्रिएट इन इंडिया चॅलेंज - सीझन 1'
अग्रगण्य उद्योग संघटना आणि संघटनांद्वारे आयोजित केलेल्या या आव्हानांच्या स्पर्धेमध्ये ॲनिमेशन, फिल्ममेकिंग, गेमिंग, संगीत आणि व्हिज्युअल आर्ट्स यासह विविध विषयांचा समावेश आहे. यामधील आव्हाने मुख्य स्पर्धेमध्ये पार पाडावी लागणार आहेत.
'क्रिएट इन इंडिया' चैलेंज - सीजन 1 यादी:
- मीडिया अँड एंटरटेनमेंट एसोसिएशन ऑफ इंडिया द्वारा एनिमे चैलेंज
- डांसिंग एटम्स द्वारा एनिमेशन फिल्ममेकर्स स्पर्धा
- इंडिया गेम डेवलपर कॉन्फ्रेंस द्वारा गेम जैम
- ईस्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा ईस्पोर्ट्स टूर्नामेंट
- ई-गेमिंग फेडरेशन द्वारा सिटी क्वेस्ट: शेड्स ऑफ भारत
- इंडियन डिजिटल गेमिंग सोसाइटी द्वारा हैंडहेल्ड एजुकेशनल वीडियो गेम डेवलपमेंट
- इंडियन कॉमिक्स एसोसिएशन द्वारा कॉमिक्स क्रिएटर चैंपियनशिप
- फेडरेशन ऑफ इंडियन चैंबर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री और व्हिसलिंग वुड्स इंटरनेशनल द्वारा यंग फिल्ममेकर्स चैलेंज
- वेवलैप्स और एक्सडीजी द्वारा एक्सआर क्रिएटर हैकाथॉन
- इनवीडियो द्वारा एआई फिल्म मेकिंग स्पर्धा
- वेव्स प्रोमो वीडियो चैलेंज इंडियन ब्रॉडकास्टिंग एंड डिजिटल फाउंडेशन
- इंडिया सेलुलर एंड इलेक्ट्रॉनिक्स एसोसिएशन द्वारा ट्रुथटेल हैकाथॉन
- कम्युनिटी रेडियो एसोसिएशन द्वारा कम्युनिटी रेडियो कंटेंट चैलेंज
- इंडियन म्यूजिक इंडस्ट्री द्वारा थीम म्यूजिक स्पर्धा
- एडवरटाइजिंग एजेंसीज एसोसिएशन ऑफ इंडिया द्वारा वेव्स हैकाथॉन: एडस्पेंड ऑप्टिमाइजर
- इंटरनेट एंड मोबाइल एसोसिएशन ऑफ इंडिया द्वारा वेव्स एआई आर्ट इंस्टॉलेशन चैलेंज
- इंटरनेट एंड मोबाइल एसोसिएशन ऑफ इंडिया द्वारा वेव्स एक्सप्लोरर
- इंटरनेट एंडमोबाइल एसोसिएशन ऑफ इंडिया द्वारा रील मेकिंग चैलेंज
- फिल्म पोस्टर मेकिंग प्रतियोगिता नेशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया- नेशनल फिल्म डेवलपमेंट कॉरपोरेशन
- एवीटीआर मेटा लैब्स द्वारा वर्चुअल इन्फ्लुएंसर क्रिएशन कॉन्टेस्ट
- प्रसार भारती द्वारा बैटल ऑफ द बैंड्स
- प्रसार भारती द्वारा सिम्फनी ऑफ इंडिया
- ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड द्वारा इंडिया: ए बर्ड्स आई व्यू
- भारतीय उद्योग परिसंघ द्वारा एंटी-पायरेसी चैलेंज
- फेडरेशन ऑफ इंडियन चैंबर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री द्वारा ट्रेलर मेकिंग कॉम्पिटिशन
या आव्हानांसाठी नोंदणी लवकरच सुरू होईल. अधिक माहितीसाठी कृपया http://wavesindia.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.
* * *
S.Kane/Shraddha/Suvarna/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2047862)
Visitor Counter : 61
Read this release in:
Odia
,
Manipuri
,
Telugu
,
Bengali
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada
,
Malayalam