दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने संदेश सेवांचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्यासाठी –‘ऍक्सेस’सेवा प्रदात्यांना निर्देश केले जारी
Posted On:
20 AUG 2024 3:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2024
ग्राहकांचे फसवणुकीपासून रक्षण करण्यासाठी तसेच संदेश सेवांचा गैरवापर रोखण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
ट्रायने काटेकोरपणे देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी ऍक्सेस सेवा प्रदात्यांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 140 मालिकेपासून सुरू होणारे टेलीमार्केटिंग कॉल्स ऑनलाइन डीएलटी प्लॅटफॉर्मवर (डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजीज) स्थलांतरित करण्याचे बंधनकारक केले आहे.
अ. 1 सप्टेंबर 2024 पासून सर्व ऍक्सेस सेवा प्रदात्यांना URL, APK, OTT लिंक्स किंवा प्रेषकांद्वारे श्वेतसूचीबद्ध नसलेले कॉल बॅक क्रमांक असलेले संदेश प्रसारित करण्यास प्रतिबंधित केले जाईल.
ब . संदेशाचे मूळ ठिकाण शोधण्याच्या कार्यात अधिक प्रगती व्हावी यासाठी ट्रायने 1 नोव्हेंबर 2024 पासून प्रेषकांकडून प्राप्तकर्त्यांपर्यंतच्या सर्व संदेशांचा माग शोधून काढण्यासारखा असणे अनिवार्य केले आहे. अपरिभाषित किंवा जुळत नसलेल्या टेलीमार्केटर साखळीसह कोणताही संदेश नाकारला जाईल.
क. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या टेम्पलेट्सचा गैरवापर रोखण्यासाठी,ट्रायने शिस्तभंग करणाऱ्यांवर दंडात्मक तरतुदी लागू केल्या आहेत.चुकीच्या श्रेणी अंतर्गत नोंदणीकृत केलेल्या सामग्री टेम्पलेट काळ्या यादीत टाकले जातील आणि वारंवार हाच गुन्हा केल्यास एक महिन्यासाठी प्रेषकाच्या सेवा निलंबित केल्या जातील.
हितधारकांनी हे निर्देश पाहण्यासाठी ट्राय चे संकेतस्थळ www.trai.gov.in ला भेट द्यावी.
S.Bedekar/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2046940)
Visitor Counter : 70
Read this release in:
Odia
,
English
,
Manipuri
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam