गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा, यांनी फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, 1947 मध्ये फाळणीचा तडाखा सहन करणाऱ्या लाखो लोकांना केले वंदन!


फाळणी वेदना स्मृती दिनी, आपल्या इतिहासातील या सर्वात भयंकर प्रसंगात ज्या लाखो लोकांना अमानुष वेदना सहन कराव्या लागल्या, प्राण गमवावे लागले, बेघर व्हावे लागले त्या सर्वांना माझे अभिवादन

जे राष्ट्र आपला इतिहास लक्षात ठेवते तेच आपले भविष्य घडवू शकते आणि एक शक्तिशाली अस्तित्व असणारे राष्ट्र म्हणून उदयास येऊ शकते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा दिवस पाळणे हे राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेतील एक मूलभूत कार्य आहे

Posted On: 14 AUG 2024 5:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री, अमित शाह यांनी फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, 1947 मध्ये फाळणीच्या संकटात सापडलेल्या लाखो लोकांना वंदन केले.

समाजमाध्यम एक्सवरील एका पोस्टमध्ये, अमित शाह म्हणाले, “फाळणी वेदना स्मृती दिनी, इतिहासातील या सर्वात भयंकर प्रसंगात ज्या लाखो लोकांना अमानुष वेदना सहन कराव्या लागल्या, आपले प्राण गमवावे लागले, बेघर व्हावे लागले त्या सर्वांना माझे अभिवादन. जे राष्ट्र आपला इतिहास लक्षात ठेवते तेच आपले भविष्य घडवू शकते आणि एक शक्तिशाली अस्तित्व असणारे राष्ट्र म्हणून उदयास येऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा दिवस पाळणे हे राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेतील एक मूलभूत कार्य आहे.”


S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2045315) Visitor Counter : 53