गृह मंत्रालय

पोलीस दल, अग्निशमन दल, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण तसेच सुधारात्मक सेवा दलातील 1037 कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शौर्य/सेवा पदके जाहीर

Posted On: 14 AUG 2024 9:25AM by PIB Mumbai

पोलीस दल, अग्निशमन दल, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण तसेच सुधारात्मक सेवा दलातील 1037 कर्मचाऱ्यांना   2024 या वर्षीच्या स्वातंत्र्य दिननिमित्त शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात  आली आहेत-

2024 या वर्षीच्या  स्वातंत्र्य दिनानिमित्त एकूण 1037 पोलीस कर्मचारी, अग्निशमन, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण (HG&CD) आणि सुधारात्मक सेवा यांना शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत. तपशील खालीलप्रमाणे आहेत:-

1.     शौर्य पदके

Name of the Medals

Number of Medals Awarded

राष्ट्रपती शौर्य पदके (PMG)

01

शौर्य पदके (GM)

213*

* पोलिस दल-208, अग्निशमन दल-04, होम गार्ड आणि नागरी संरक्षण -01

 

राष्ट्रपतींचे शौर्य पदक (PMG) आणि शौर्य पदक (GM) अनुक्रमे जीव आणि मालमत्ता वाचवण्याच्यावेळी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी,अधिकाऱ्यांवर असलेल्या जोखीमीमुळे येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांच्या संदर्भात, रेअर कॉन्स्पिक्यूअस ॲक्ट  आणि कॉन्स्पिक्यूअस ॲक्ट यांच्या अंतर्गत    दिले जातात,

राष्ट्रपतींचे शौर्य पदक (PMG)

शौर्य पदक प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी, तेलंगणा पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल श्री चादुवु यादैया यांना राष्ट्रपती शौर्य पदक (PMG) प्रदान करण्यात आले आहे.त्यांनी 25.07.2022 रोजी एका दरोड्याच्या प्रकरणात  विशेष उल्लेखनीय शौर्य दाखवले.सोनसाखळी चोरी   आणि शस्त्रास्त्र व्यवहारात सहभागी असलेले दोन कुख्यात गुन्हेगार इशान निरंजन नीलमनल्ली आणि राहुल यांना 26.07.2022 रोजी, सायबराबाद पोलिसांनी   पकडले, तथापि,या गुन्हेगारांनी श्री चादुवु यादैया, यांच्यावर चाकूने उलट हल्ला चढवला आणि त्याच्या शरीराच्या विविध भागांवर, म्हणजे छाती, शरीराची मागील बाजू, डावा हात आणि पोटावर वारंवार वार केले.त्यामुळे  रक्तस्त्राव होऊन  चादुवु   यांना गंभीर जखमा झाल्या. गंभीर दुखापती झाल्या असूनही, ते त्यांना पकडण्यात यशस्वी झाले.  त्यांना 17 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले.

213 शौर्य पदकांपैकी (GM), 208 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक देण्यात आले आहे, यात  जम्मू आणि काश्मिर  पोलिस दलातील 31 कर्मचारी, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 17 कर्मचारी, छत्तीसगडचे 15 कर्मचारी, मध्य प्रदेशचे 12, झारखंडमधील प्रत्येकी 07 कर्मचारी,  पंजाब आणि तेलंगणामधील कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलीस दलातील 52 कर्मचारी, सशस्त्र सेनादलातील (एसएसबी)14 कर्मचारी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) मधील 10 कर्मचारी, सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ)06 कर्मचारी आणि इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) उर्वरित पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे..  शिवाय, दिल्ली आणि झारखंड येथील अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 03 GM आणि 01 GM आणि उत्तर प्रदेशातील HG आणि CD कर्मचारी यांना  प्रदान करण्यात आली आहेत.

 

सेवा पदके

विशिष्ट सेवेसाठी दिल्या जाणारे राष्ट्रपती पदक (PSM) हे सेवा काळातील  विशेष प्रशंसनीय कार्यासाठी तर संसाधन आणि कर्तव्यनिष्ठा या भावनेने वैशिष्ट्यपूर्ण अमूल्य सेवा बजावल्याबद्दल  गुणवत्ता  पदक (MSM)प्रदान केले जाते.

विशिष्ट सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या (PSM) 94 राष्ट्रपती पदकांपैकी 75 पोलिस दलातील,08 अग्निशमन सेवा दलातील,08 नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी आणि 03 सुधारात्मक सेवेसाठी देण्यात आली आहेत. उत्कृष्ट सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या (MSM) 729 पदकांपैकी 624 पदके पोलीस सेवा दलातील , 47 अग्निशमन सेवा दलातील, 47 नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवा दलातील आणि 11 सुधारात्मक सेवा दलातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहेत.

पदक मिळविलेल्या कर्मचाऱ्यांची यादी :

Sl No.

Subject

 

Number of Awardees

Annexure

 

1

राष्ट्रपती शौर्य पदक (PMG)

01

List-I

2

Medals for Gallantry (GM)

213

List-II

 

3

उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक (PSM)

94

List-III

4

Medal for Meritorious Service (MSM)

729

List-IV

 

5

State Wise/ Force Wise list of Medals Awardees

As per list

List -V

 

गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातील विविध गौरवांनी सन्मानित विजेत्यांची नावे तसेच तपशील खालील सूचींमध्ये दिले आहे.

सूची II

स्वातंत्र्यदिन 2024 रोजी देण्यात येणाऱ्या शौर्य पदक विजेत्यांच्या नावांची यादी
पोलीस दल

नाव

पदनाम

पदक

डॉ.कुणाल शंकर सोनावणे

उप-विभागीय पोलीस अधिकारी

शौर्यपदक

दीपक रंभाजी आवटे

पोलीस उपनिरीक्षक

शौर्यपदक

कै. धनाजी तानाजी होनमाने

पोलीस उपनिरीक्षक

शौर्यपदक (मरणोत्तर)

नागेशकुमार बोंड्यालू मदरबोईना

नाईक पोलीस शिपाई

शौर्यपदक

शकील युसुफ शेख

पोलीस शिपाई

शौर्यपदक

विश्वनाथ सामैय्या पेंदाम

पोलीस शिपाई

शौर्यपदक

विवेक मानकू नरोटे

पोलीस शिपाई

शौर्यपदक

मोरेश्वर नामदेव पोटावी

पोलीस शिपाई

शौर्यपदक

कैलाश चुंगा कुलमेथे

पोलीस शिपाई

शौर्यपदक

कोटला बोटू कोरामी

पोलीस शिपाई

शौर्यपदक

कोरके सन्नी वेलादी

पोलीस शिपाई

शौर्यपदक

महादेव विष्णू वानखेडे

पोलीस शिपाई

शौर्यपदक

अनुज मिलिंद तारे (आयपीएस)

अतिरिक्त पोलीस अधीक्षक

शौर्यपदक

राहुल नामदेवराव देव्हाडे

पोलीस उपनिरीक्षक

शौर्यपदक

विजय दादासो सकपाळ

पोलीस उपनिरीक्षक

शौर्यपदक

महेश बोरू मिच्छा

मुख्य शिपाई

शौर्यपदक

समय्या लिंगय्या आसाम

नाईक पोलीस शिपाई

शौर्यपदक

 

सूची III

राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदका(पीएसएम)चे मानकरी ठरलेल्यांचे तपशील
स्वातंत्र्यदिन 2024


पोलीस दल
गोवा
सुनिता सावलो सावंत, पोलीस महाअधीक्षक.

महाराष्ट्र
चिरंजीव रामछबीला प्रसाद, अतिरिक्त पोलीस महासंचालक.
राजेंद्र बाळाजीराव डहाळे, पोलीस संचालक.
सतीश रघुवीर गोवेकर, पोलीस उपायुक्त.

अग्निशमन दल
महाराष्ट्र
संतोष श्रीधर वारीक, मुख्य अग्निशमन अधिकारी.

 

सुधारात्मक सेवा


महाराष्ट्र

अशोक बोवाजी ओळंबा

सूची IV

MEDAL FOR MERITORIOUS SERVICE (MSM)
INDEPENDENCE DAY – 2024
अत्युत्कृष्ट सेवा पदक (एमएसएम)
स्वातंत्र्यदिन -2024
पोलीस दल


गोवा
दामोदर गणपत मयेकर, मुख्य शिपाई.


महाराष्ट्र
दत्तात्रय तुळशीदास शिंदे, उपमहानिरीक्षक
संदीप गजानन दिवाण, उपमहानिरीक्षक
शिवाजी ज्ञानदेव फडतरे, उप-महाधीक्षक
संजय मारुती खांदे, महाधीक्षक
विनीत जयंत चौधरी, उप महाधीक्षक
प्रकाश पांडुरंग गायकवाड, उपनिरीक्षक
विजय मोहन हातिसकर, पोलीस सहआयुक्त
महेश मोहनराव तराडे, उप महाधीक्षक
राजेश रमेश भागवत, निरीक्षक
गजानन कृष्णराव तांदूळकर, उपनिरीक्षक
राजेंद्र तुकाराम पाटील, उपनिरीक्षक
संजय साहो राणे, उपनिरीक्षक
गोविंद दादू शेवाळे, उपनिरीक्षक
मधुकर पोछा नैताम, उपनिरीक्षक
अशोक बापू होनमाने, निरीक्षक
शशिकांत शंकर तटकरे, उपनिरीक्षक
अक्षयवारनाथ जोखुराम शुक्ला, उपनिरीक्षक
शिवाजी गोविंद जुंदरे, उपनिरीक्षक
सुनील लयाप्पा हांडे, सहाय्यक उपनिरीक्षक
प्रकाश मोतीराम देशमुख, उपनिरीक्षक
दत्तू रामनाथ खुळे, सहाय्यक उपनिरीक्षक
रामदास नागेश पालशेतकर, निरीक्षक (पीए)
देविदास श्रावण वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक
प्रकाश शंकर वाघमारे, सहाय्यक उपनिरीक्षक
संजय दयाराम पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक
मोनिका सॅम्युअल थॉमस, सहाय्यक उपनिरीक्षक
बंडू बाबुराव ठाकरे, मुख्य शिपाई
गणेश मानाजी भामरे, मुख्य शिपाई
अरुण निवृत्ती खैरे, मुख्य शिपाई
दीपक नारायण टिल्लू, मुख्य शिपाई
राजेश तुकारामजी पैदलवार, मुख्य शिपाई
श्रीकृष्ण गंगाराम हिरपूरकर, सहाय्यक कमांडंट
राजू संपत सुर्वे, निरीक्षक
संजीव दत्तात्रेय धुमाळ, निरीक्षक
अनिल उत्तम काळे, सहाय्यक उपनिरीक्षक
मोहन रामचंद्र निखारे, सहाय्यक उपनिरीक्षक
द्वारकादास महादेवराव भांगे, सहाय्यक उपनिरीक्षक
अमितकुमार माताप्रसाद पांडे, उपनिरीक्षक

 

Click here to view List-I 

Click here to view List-II

Click here to view List-III

Click here to view List-IV

Click here to view List-V

 

अधिक माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या :  www.mha.gov.in and https://awards.gov.in.

***

JPS/Sampada/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2045169) Visitor Counter : 78