राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला करणार संबोधित

Posted On: 13 AUG 2024 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 ऑगस्ट 2024

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (14 ऑगस्ट, 2024) 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करतील. 

राष्ट्रपतींचे संबोधन संध्याकाळी 7 वाजल्यापासून आकाशवाणीच्या संपूर्ण राष्ट्रीय वाहिन्यांवर आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर प्रथम हिंदीतले आणि त्यानंतर इंग्रजीतले संबोधन प्रसारित केले जाईल. दूरदर्शनवरील हिंदी आणि इंग्रजी प्रसारणानंतर दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये राष्ट्रपतींच्या संबोधनाचे प्रसारण केले जाईल. आकाशवाणी रात्री 9.30 वाजता राष्ट्रपतींचे संबोधन संबंधित प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रादेशिक भाषेत प्रसारित करेल.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2045003) Visitor Counter : 25