पंतप्रधान कार्यालय
माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
11 AUG 2024 8:17AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री नटवर सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
कुशल बुद्धीवादी आणि समृद्ध लिखाण यासाठी ते ओळखले जात त्याबरोबरच त्यांनी जागतिक राजनीतीमध्ये तसेच परराष्ट्र धोरणामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले , या त्यांच्या स्मृती पंतप्रधानांनी जागवल्या.
“श्री नटवर सिंग जी यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे त्यांनी परराष्ट्र धोरण तसंच जागतिक राजनीती यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि चाहते यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती. “, अशा शब्दांत आपल्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केल्या आहेत.
***
M.Iyengar/V.Sahajrao/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2044247)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam