वस्त्रोद्योग मंत्रालय

केंद्र सरकार 7 ऑगस्ट 2024 रोजी 10 वा राष्ट्रीय हातमाग दिन करणार साजरा


वस्त्रोद्योग मंत्र्यांसमवेत उपराष्ट्रपती देखील नवी दिल्लीतील कार्यक्रमाला राहणार उपस्थित

देशभरात हा दिवस साजरा केला जाणार

Posted On: 06 AUG 2024 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2024

नवी दिल्लीत विज्ञान भवन  येथे  बुधवार, 7 ऑगस्ट 2024 रोजी 10 वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जाणार आहे . या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह, परराष्ट्र व्यवहार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा, वस्त्रोद्योग सचिव रचना शाह आणि डॉ. एम. बीना, विकास आयुक्त (हातमाग) यांच्यासह  खासदार, प्रतिष्ठित व्यक्ती, डिझायनर, निर्यातदार, वरिष्ठ सरकारी अधिकारी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच देशभरातील किमान 1,000 विणकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात , 5 संत कबीर पुरस्कार आणि 17 राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार कॅटलॉग आणि कॉफी टेबल बुक- “परंपरा- भारताची शाश्वत हातमाग परंपरा” चे प्रकाशन केले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार, केंद्रसरकारने 7 ऑगस्ट 2015 रोजी अशा प्रकारचा पहिला उत्सव आयोजित करून राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करायला सुरुवात केली. देशात 7 ऑगस्ट, 1905 रोजी स्वदेशी चळवळीचा आरंभ झाला म्हणून त्या तारखेचे औचित्य ठेवून 7 ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली होती. या माध्यमातून देशांतर्गत उद्योग आणि विशेषतः हातमाग विणकरांना प्रोत्साहन मिळते. या माध्यमातून भारतातील हातमाग कामगारांचा सन्मान करण्याचा आणि हातमाग क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न आहे.

हा दिवस देशातील हातमाग कामगारांचा सन्मान करण्याचा आणि देशाच्या सांस्कृतिक, पारंपारिक आणि आर्थिक पटलावर  त्यांच्या योगदानाचे कौतुक करून हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा आणि अभिमानाची भावना रुजवण्याचा प्रयत्न आहे.हातमाग क्षेत्राचे महत्त्व आणि सामाजिक-आर्थिक विकासातले त्याचे योगदान याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी देशभरात हा दिवस साजरा केला जातो.

10 वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यासाठी देशात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे राज्य सरकार, विणकर सेवा केंद्रे (WSC), प्रख्यात हातमाग क्लस्टर्स (150 समूह ), भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था  (IIHTs), राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था (एनआयएफटी) परिसर , राष्ट्रीय हातमाग विकास मंडळ (NHDC), वस्त्रोद्योग समिती, विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे हातमाग विभाग यांसह देशभरात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जाणार असून त्यातील काही उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत..  

  • My Gov पोर्टलद्वारे समाज माध्यम मोहीम सुरु करण्यात आली असून त्यात प्रतिज्ञा, सेल्फीज, स्मरणिका डिझाईन, प्रश्नमंजुषा स्पर्धायांचा समावेश
  • नवी दिल्लीत (3 ते 16 ऑगस्ट दरम्यान ) हँडलूम हाट येथे राष्ट्रीय हातमाग विकास मंडळाद्वारे संकल्पनेवर आधारित विरासत प्रदर्शन आणि थेट प्रात्यक्षिकांसह पुरस्कार विजेत्यांचे विशेष प्रदर्शन (B2C),
  • विरासत- राष्ट्रीय डिजाइन केंद्रातर्फे (1 ते 15 ऑगस्ट दरम्यान) नवी दिल्लीत हाट INA येथे विशेष प्रदर्शन
  • हातमाग निर्यात प्रोत्साहन परिषद (HEPC) द्वारे वाराणसी येथे (7 ते 9 ऑगस्ट दरम्यान) विशेष सोर्सिंग शो(B2B)
  • हस्तकला संग्रहालय (1 ते 14 ऑगस्ट) येथे तुमच्या विणकरांविषयी जाणून घ्या हा विशेष उपक्रम
  • राज्य सरकार/त्यांच्या I.A. द्वारे हातमाग प्रदर्शन, विणकर सेवा केंद्रांच्या वतीने महाविद्यालयांमध्ये जागरूकता उपक्रम
  • विणकर सेवा केंद्र/राष्ट्रीय हातमाग विकास मंडळ कार्यालये आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध महोत्सव
  • भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने जागरूकता उपक्रम
  • राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था कॅम्पस द्वारे  “MyHandloomMyPride”, साडी ड्रेपिंग वर्कशॉप, हातमाग क्लस्टर्सविषयी  रील बनवणे आणि समाज माध्यमावर पोस्ट करणे इत्यादी कार्यक्रम  शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबवले जाणार आहेत.

 

Jaydevi PS/B.Sontakke/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2042115) Visitor Counter : 61