आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
केंद्रीय मंत्रिमंडळाने 50,655 कोटी रुपये एकूण भांडवली खर्चाच्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना दिली मंजुरी, यामुळे लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारेल , वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशभरातील कनेक्टिव्हिटी वाढेल
पुणे आणि नाशिक दरम्यान 8-पदरी उन्नत उड्डाणपूल कॉरिडॉर खंड लॉजिस्टिक खर्च कमी करेल
Posted On:
02 AUG 2024 8:42PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने देशभरात 50,655 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांच्या विकासाला मंजुरी दिली आहे. . या 8 प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे सुमारे 4.42 कोटी मनुष्यदिवस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.
प्रकल्पांबाबत संक्षिप्त माहिती :
1. 6-पदरी आग्रा - ग्वाल्हेर राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर:
88-किमीचा हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित 6-पदरी कॉरिडॉर म्हणून विकसित केला जाईल आणि यासाठी 4,613 कोटी रुपये एकूण भांडवली खर्च येईल.
2. 4-पदरी खरगपूर - मोरेग्राम राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर:
खरगपूर आणि मोरेग्राम दरम्यान 231-किमीचा 4-पदरी प्रवेश-नियंत्रित हाय-स्पीड कॉरिडॉर हा हायब्रीड ॲन्युइटी मोड वर विकसित केला जाईल. याचा एकूण भांडवली खर्च 10,247 कोटी रुपये आहे.
3. 6-पदरी थरड - दिसा - मेहसाणा - अहमदाबाद राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर:
214-किमीचा 6-पदरी हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा - वापरा - हस्तांतरित करा तत्वावर 10,534 कोटी रुपये एकूण भांडवली खर्चासह विकसित केला जाईल. 10,534 कोटी.
4. 4-पदरी अयोध्या रिंग रोड:
68-किमीचा 4-पदरी प्रवेश-नियंत्रित अयोध्या रिंगरोड हा हायब्रीड ॲन्युइटी मोड मध्ये 3,935 कोटी रुपये एकूण भांडवली खर्चासह विकसित केला जाईल. .
5. रायपूर-रांची राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉरचा पथलगाव आणि गुमला दरम्यान 4-पदरी खंड :
रायपूर - रांची कॉरिडॉरचा 137-किमीचा 4-पदरी प्रवेश-नियंत्रित पथलगाव - गुमला खंड हायब्रीड ॲन्युइटी मोड मध्ये विकसित केला जाईल. संपूर्ण कॉरिडॉर पूर्ण करण्यासाठी 4,473 कोटी रुपये एकूण भांडवली खर्च येईल.
6. 6-पदरी कानपूर रिंग रोड:
कानपूर रिंगरोडचा 47-किमीचा 6-पदरी प्रवेश-नियंत्रितखंड अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम पद्धतीने एकूण. 3,298 कोटी रुपये भांडवली खर्चासह विकसित केला जाईल.
7. 4- पदरी उत्तर गुवाहाटी बायपास आणि विद्यमान गुवाहाटी बायपासचे रुंदीकरण/सुधारणा:
121-किमीचा गुवाहाटी रिंगरोड बांधा, वापरा, टोल (बीओटी) मोडमध्ये विकसित केला जाईल. यासाठी एकूण भांडवली खर्च 5,729 कोटी रुपये येईल.
8. पुण्याजवळ 8-पदरी उन्नत नाशिक फाटा - खेड कॉरिडॉर:
पुण्याजवळ नाशिक फाटा ते खेड दरम्यान 30-किमीचा 8-पदरी उन्नत राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा-वापरा -हस्तांतरित करा तत्वावर विकसित केला जाईल. यासाठी 7,827 कोटी रुपये भांडवली खर्च येईल. उन्नत कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यानच्या NH-60 वरील चाकण, भोसरी इत्यादी औद्योगिक केंद्रांवरून जाणाऱ्या /येणाऱ्या वाहतुकीसाठी वेगवान हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या कॉरिडॉरमुळे पिंपरी-चिंचवडमधील मोठी वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
नाशिक फाटा ते खेड कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंच्या 2 पदरी सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे 4/6 पदरी रस्त्यात रूपांतर करण्यासह सिंगल पिलरवर टियर - 1 वर 8 पदरी उन्नत उड्डाणपूल महाराष्ट्र राज्यातील NH-60 च्या खंड (Pkg-1: from km 12.190 to km 28.925 & Pkg-2: from km 28.925 to km 42.113) वर बांधण्यात येईल.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2041056)
Visitor Counter : 200
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam