शिक्षण मंत्रालय
शिक्षण मंत्रालय “शिक्षा सप्ताह” या साप्ताहिक मोहिमेसह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा चौथा वर्धापन दिन साजरा करत आहे.
देशभरातील शाळा "शिक्षा सप्ताह" चा 7 वा दिवस "विद्यांजली आणि तिथी भोजनाद्वारे सामुदायिक सहभागासह" साजरा करणार.
Posted On:
28 JUL 2024 10:37AM by PIB Mumbai
शिक्षण मंत्रालय “शिक्षा सप्ताह” या साप्ताहिक मोहिमेसह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा चौथा वर्धापन दिन साजरा करत आहे. मोहिमेच्या 7 व्या दिवशी, देशभरातील शाळा विद्यांजली आणि तिथी भोजन उपक्रमाद्वारे शिक्षणात सामुदायिक सहभागावर भर देत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 7 सप्टेंबर 2021 रोजी शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत चालवला जाणारा विद्यांजली हा शाळा स्वयंसेवक व्यवस्थापन कार्यक्रम सुरू करण्यात आला. देशभरातील शाळांचे सबलीकरण करणे आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) आणि खासगी क्षेत्राच्या सहभागाद्वारे सामुदायिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने शाळांसाठी सुचविलेल्या उपक्रमांची यादी मोहिमेचा एक भाग म्हणून दिली आहे. शाळा स्वतःची विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करण्यावर आणि उपक्रमाला समर्थन देण्यासाठी स्थानिक स्वयंसेवकांचा सहभाग वाढवण्यावर भर देत आहेत. शाळांमधील "प्रसिद्धीफलक/नोटिस बोर्ड" वर सक्रिय स्वयंसेवकांची नावे देखील दर्शविली जाणार आहेत. याशिवाय, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी या स्वयंसेवकांना कृतज्ञता पत्रेही लिहीतील.
मोहिमा, पथनाट्य, भित्तीपत्रिका निर्मिती आणि स्वयंसेवी उपक्रमांबाबत कोष्टके तयार करणे यासारखे समुदाय जागरूकता उपक्रम देखील आयोजित केले जाणार आहेत. मोहीमेच्या यशस्वितेसाठी राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकारी यात सक्रिय सहभाग घेत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या शिक्षणात सामुदायिक सहभाग वाढवण्याच्या उद्दिष्टाशी हे प्रयत्न सुसंगत ठरत आहेत.
विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून (https://vidyanjali.education.gov.in/)
शाळा, स्वयंसेवक आणि समुदायाला एकत्र आणून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक मजबूत समर्थन प्रणाली तयार करणे, चांगले शैक्षणिक वातावरण तयार करणे हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे.
***
M.Iyengar/S.Naik/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2038053)
Visitor Counter : 161