अर्थ मंत्रालय
भांडवली नफ्यावरची कररचना झाली सुलभ आणि तर्कसंगत
अल्प मुदतीच्या नफ्यावर 20 टक्के आणि दीर्घकालीन नफ्यावर 12.5 टक्के दराने कर आकारला जाईल.
आर्थिक मालमत्तेवरील दीर्घकालीन भांडवली नफ्याची सवलत मर्यादा वार्षिक 1 लाख रुपयांवरून 1.25 लाख रुपये झाली
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2024 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2024
आज संसदेत 'केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25' सादर करताना, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भांडवली लाभ कराचे सुलभीकरण आणि तर्कसंगतीकरण हे केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 च्या मुख्य लक्ष्यित क्षेत्रांपैकी एक आहे.
सीतारामन म्हणाल्या की, आतापासून काही आर्थिक मालमत्तांवरील अल्प मुदतीच्या नफ्यावर 20 टक्के दराने कर आकारला जाईल तर इतर सर्व आर्थिक मालमत्ता आणि सर्व बिगर-आर्थिक मालमत्तांवर लागू होणारा कर दर पूर्वीप्रमाणे सुरू राहील.
अर्थमंत्र्यांनी असेही सांगितले की सर्व आर्थिक आणि बिगर-आर्थिक मालमत्तांवरील दीर्घकालीन नफ्यावर 12.5 टक्के कर आकारला जाईल. कमी आणि मध्यम उत्पन्न गटांना फायदा होण्यासाठी, त्यांनी विशिष्ट मालमत्तेवरील भांडवली नफ्याची सवलत मर्यादा वार्षिक 1 लाख रुपयांवरून 1.25 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला.
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवलेल्या सूचीबद्ध आर्थिक मालमत्ता दीर्घकालीन म्हणून वर्गीकृत केल्या जातील तर असूचीबद्ध आर्थिक मालमत्ता आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवलेल्या सर्व बिगर-आर्थिक मालमत्ता दीर्घकालीन म्हणून वर्गीकृत करण्यासाठी किमान दोन वर्षांसाठी ठेवाव्या लागतील.
अर्थमंत्र्यांनी असेही सांगितले की असूचीबद्ध बाँड्स आणि डिबेंचर्स, डेट म्युच्युअल फंड आणि मार्केट लिंक्ड डिबेंचर्स यांचा होल्डिंग कालावधी काहीही असो, सध्या लागू असलेल्या दराने भांडवली नफ्यावर कर लागू होईल.
* * *
S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2036060)
आगंतुक पटल : 166
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam