अर्थ मंत्रालय
पंतप्रधान पॅकेज अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणाची चौथी योजना म्हणून एक नवीन केंद्र पुरस्कृत योजना
5 वर्षांच्या कालावधीत 20 लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण
1,000 औद्योगिक प्रशिक्षण संस्था अद्ययावत केल्या जाणार आहेत
7.5 लाखांपर्यंत कर्ज सुविधा देण्यासाठी मॉडेल कौशल्य ऋण योजनेमध्ये होणार बदल, या उपाययोजनांमुळे 25,000 विद्यार्थ्यांना मदत होण्याची अपेक्षा
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2024 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2024
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान पॅकेज अंतर्गत चौथी योजना म्हणून राज्य सरकार आणि उद्योग यांच्या सहकार्याने कौशल्य प्रशिक्षणासाठी नवीन केंद्र प्रायोजित योजना जाहीर केली आहे.
आज संसदेत 2024-25चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, 5 वर्षांच्या कालावधीत 20 लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल आणि 1,000 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना परिणामाभिमुख दृष्टिकोनाने योग्य पद्धतीने अद्ययावत केले जाईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की अभ्यासक्रमांची सामग्री आणि त्याचे आरेखन उद्योगाच्या कौशल्याच्या गरजेनुसार तयार केले जाईल आणि नवीन उदयोन्मुख गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन अभ्यासक्रम सुरू केले जातील.
कौशल्य कर्जाच्या संदर्भात, अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की वर्धित निधी हमीसह 7.5 लाखांपर्यंत कर्जाची सुविधा देण्यासाठी सरकार मॉडेल कौशल्य ऋण योजनेमध्ये बदल करेल. या उपायामुळे दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना मदत होईल अशी अपेक्षा आहे.
* * *
H.Akude/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2036028)
आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam