अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून स्थान देण्याचे आमचे प्रयत्न गुंतवणुकीला प्रोत्साहन देतील आणि इतर क्षेत्रांसाठी आर्थिक संधी उपलब्ध करून देतील: श्रीमती निर्मला सीतारामन


विष्णुपद मंदिर कॉरिडॉर आणि महाबोधी मंदिर कॉरिडॉर यांच्या सर्वसमावेशक विकासाला सहकार्य केले जाईल; जागतिक दर्जाची तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर केले जाईल

Posted On: 23 JUL 2024 2:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जुलै 2024

"देशाला मजबूत विकास आणि सर्वांगीण समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी जनतेने आमच्या सरकारला एक अनोखी संधी दिली आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी केले आहे.

2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना आपल्या भाषणात अर्थमंत्री सीतारामन पुढे म्हणाल्या की पर्यटन हा नेहमीच आपल्या सभ्यतेचा भाग राहिला आहे. भारताला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून स्थान देण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे नोकऱ्या निर्माण होतील, गुंतवणुकीला चालना मिळेल आणि इतर क्षेत्रांसाठी आर्थिक संधी उपलब्ध होतील.

"गया येथील विष्णुपद मंदिर आणि बिहारमधील बोधगया येथील महाबोधी मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे.  "विष्णुपद मंदिर कॉरिडॉर आणि महाबोधी मंदिर कॉरिडॉर यांना यशस्वी काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरप्रमाणे  जागतिक दर्जाची तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांमध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक विकासाला सहकार्य केले जाईल," अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.

त्या पुढे म्हणाल्या, राजगीरचे हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांसाठी खूप धार्मिक महत्त्व आहे आणि जैन मंदिर संकुलातील 20 वे तीर्थंकर मुनिसुव्रत मंदिर प्राचीन आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की सप्तर्षी किंवा 7 उष्णतेचे झरे एक पवित्र असे उबदार पाण्याचे ब्रह्मकुंड तयार करतात.राजगीरच्या विकासासाठी सर्वसमावेशक उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकार नालंदाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासोबतच नालंदा विद्यापीठाला त्याच्या गौरवशाली उंचीवर नेण्यासाठी मदत करेल.तसेच ओडिशाचे निसर्गसौंदर्य, मंदिरे, स्मारके, कलाकुसर, वन्यजीव अभयारण्ये, नैसर्गिक लँडस्केप आणि प्राचीन समुद्रकिनारे हे एक अप्रतिम पर्यटन स्थळ बनवतात. आमचे सरकार त्यांच्या विकासासाठी मदत करेल", असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले.


H.Akude/N.Mathure/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2035655) Visitor Counter : 80